पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

i college che diwas

इंदापूर महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला असे जाहीर झाले आणि , मला मागील चार वर्षांचा भूतकाळ आठवला … पुणे सोडून जिथे मी जवळ जवळ ३० वर्षे राहिलो ते सोडून इंदापूर सारख्या खेड्यात येतांना सगळ्याच मित्रांचा कुटुंबाचा विरोध होताच,… पुणे विद्यापीठात असतांना रा से यो चा कार्यक्रम समन्वयक म्हणून काम करताना खेड्याची नाळ जोडली गेली होती. विशेषत: समर्थ भारत अभियान हा एक महत्वाकांक्षी प्रयोग राबविला होता. आणि खेड्यात काम करायचे हे नक्की केले . मला पाठींबा होता तो म्हणजे डॉ अरुण अडसूळ यांचा। .      रुजू होण्यापूर्वी  सविस्तर मार्गदर्शन अर्थात चर्चात्मक आदरणीय हर्षवर्धन पाटील  यांचेबरोबर झाली होती.त्यांच्या कल्पना म्हणजे भन्नाटच. मी रुजू होण्याच्या  महिन्यापासून बापू (वडील) सह्याद्री हॉस्पिटल मध्ये admit होते. त्यांना न  सांगता  मी पहिल्यांदाच एवढा मोठा निर्णय घेतला होत। २० जुलै २०१० रोजी रुजू झालो.एक छोटी केबिन , धुलीचा थर , डुगडुग करणारी खुर्ची,२००३ सालातले टेबलवरच कॅलेंडर , नसलेली बेल, शिपायाचा पत्ता नाही, अत्यंत थंड पने झालेले स्वागत,   मधूनच कोणीतरी येउन डोकाऊन  जात होत