पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारी म्हणजे विदयापीठ

* वारी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ*                   मी २००४ मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वक म्हणून रुजू झालो. राज्य संपर्क अधिकारी प्रा निलुफ़र अहमद, मा . कुलगुरू डॉ अशोक कोळस्कर व मी अशी आमची बैठक चालू होती, एखादा मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रम आयोजित करायचा असे ठरले .       सकाळीच दिंडीच्या कार्यक्रमाची माहिती ओझरती वाचली होती. लहानपणापासून दिंडी बद्दल ऐकले होते. सासरे वर्षानुवर्ष दिंडीला जातात , मी सहज मुद्दा मांडला आपण पुणे ते पंढरपूर २०० स्वयंसेवक घेउन जायचे का ? तत्काळ होकार . , कोळस्कर सर तर अत्यंत उत्साही होते, २० दिवसांचा अवधी हाताशी होता, दुसऱ्याच दिवशी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर पायलट टिम घेऊन जायचे ठरले , पहिले भोजन प्राचार्य रावळ एच् ही देसाई महI, दुपारी नाश्ता डॉ नितीन घोरपडे संध्या मगर महा असं करत पंढरपूर पर्यंतचे नियोजन ठरले , सावंत सरांनी वृक्षारोपण दिंडी अर्थात वृक्षदिंडी अशी संकल्पना मांडली, नियोजन चोख झाले उद्घाटनास ११ कुलगुरू, सर्व कार्यक्रम समन्वयक (बाईंचा धाकच होता ) महामहिम राज्यपाल फजल *अहमद* शिक्षणमंत्री निहाल *अह