पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
सदाफुली सदा फुलणारी ' चित्रकलेच्या परिक्षेत पहिल्यांदा हिला चितारल एकदा निसर्ग चित्र म्हणून तर एकदा काल्पनिक चित्र म्हणून परवा आमच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात गेलो ही फुललेली दिसली ' आसपास ही कुठेही नाही आली असावी पारव्याच्या विष्ठेतुन किंवा चोचीतुन काय सांगाव आली असेल वाऱ्याच्या झुळूकीतुन पेवर ब्लॉक च्या बेचकीत चपखल अडकली दवबिंदूच्या पाण्यावर अंकुरली बहरली कळ्या उमलुन बहरली फुले तरारलीत शेंगाही येतीलच पारवे आहेतच नवांकुरांना जन्म देण्यासाठी काल चक्र पुढे नेण्यासाठी सावित्री तू फुलायलाचं हवं सदाफुली सारखं ज्ञानसुत २८ डिसें २०१८
इमेज
*ज्ञान लुटण्याचा दसरा*               दसरा '  विजया दशमी दहा दिवसांच्या मातीच्या उत्सवाचा आनंद, पृथेला पाण्याची आच , घटाला लागणारे तृणधान्य  त्यातून टरारून येणारे कोंभ, माती परीक्षण, पाणी परीक्षण , धान्य परीक्षण , सगळं दहा दिवसात कमी खर्चात. पुण्यात म्हणे घटाची माती पण विकतच आणतात. कर्मकांड उरलीत.  का ? कशासाठी , प्रश्नच पडत नाहीत.        आपट्याची पानं म्हणून सर्रास अंजन वा कांचन वृक्षाची  मोठया प्रमाणात कत्तल होतीय , आपट्या ला पर्याय शोधता येतील का ? आपट्याची रोपेच ,बिया लुटल्या तर ? चला,  विचार तर करु या ? गेला बाजार ज्ञानच लुटलं तर विजया दशमीच्या निमित्ताने इानपिपासु अर्थात ज्ञानलुटेरे होऊ या . दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संजय ज्ञानेश्वर चाकणे  ( *ज्ञानसुत* )
इमेज
सर काय वाचू,? सर काय वाचू ? असे अनेकजण विचारतात, मी मात्र काय वाट्टेल ते वाचा,! ज्यात मन रमतय ते वाचा! असे सांगत असतो  अगदी बाबा कदम किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीपासून सुरुवात करून  *हिंदू एक जगण्याची अडगळ* पर्यंत काहीही वाचावे, कुठलेही लिखाण वर्ज्य असता कामा नये, कप्तान बेलवळकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पासून श्रीमान योगी मृत्युन्जय , जिप्सी, ययाती, छावा , मूकनायक, युगंधर, काळेपाणी , बुद्ध व त्याचा धम्म, समग्र फुले, उचल्या, झोंबी, अक्करमाशी, बलुतं,  निळी पहाट, समग्र पुलं, समग्र व पु, दमा,  धनंजय कीरांची सगळी चरित्र, गो निदांच बये दार उघड, तुंबाडचे खोत ताम्रपट, पानिपत, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, बुधभूषण, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण,संत तुकारामांची गाथा, भारुड सर्व संत साहित्य दासबोध, अच्युत गोडबोले  यांचे मनात, किमयागार,अर्थात, अर्थाच्या शोधात, पूर्वरंग, अपूर्वाई, माझी गडगिरी, राष्ट्रीय सेवा योजना वरची पुस्तक, आपत्ती व्यवस्थापनाची पुस्तक, दलित साहित्य ग्रामीण साहित्य अशा  लिखानापासून महेंद्र कदमाच्या आगळ सारख्या, पुपुल जयकर किन्वा अशोक जैन यांच्या अनु
*भांडगाव म्हसोबा चे तेल*                   माझे मित्र प्रा. उत्तम माने यांच्या आग्रहा खातर मी भांडगावच्या म्हसोबाला गेलो होतो. वास्तविक भांडगाव हे नॉनव्हेज टुरिझम अर्थात  मांसाहारी पर्यटनासाठी पुणे जिल्हयातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत धार्मिक गाव. गेल्या सात वर्षात भांडगावला जाण्याचा माझा हा दुसरा प्रसंग. यावेळी मात्र देवस्थानात जाता आले. खोबरेल तेल जळाल्याचा वास येत होता करवंट किंवा शेंडी जाळल्यानंतर येतो तसा, अर्थात एखादा यज्ञ चालू असावा असे वाटले ,परंतू लक्षात असे आले की मंदीरा शेजारीच लोखंडी बंब ढॅन् ढॅन ' पेटलेले होते आणि त्यातूनच हा वास येत होता पावले आपसूकच तिकडे वळली देवस्थानच्या मंडळींनी कुणीतरी उत्सुकता दाखवतय?  म्हणून अतिशय तन्मयतेने प्रकल्प समजावून सांगितला एकंदरीतच सगळ्या देवस्थानांनी आदर्श घ्यावा असा हा प्रकल्प देवाला फोडलेले नारळ एकत्र करूण ते एका ड्रायरमध्ये टाकले जातात मग शेंडी व करवंट्या वेगळ्या केल्या जातात , खोबरे व त्याचे तुकडे  क्रशरमध्ये घालून घाण्यात आणले जातात त्यातून पेंड वेगळी होते व तेलाचे गाळप होते. तेल फिल्टरमधून काढल्या नंतर शुद्ध स्वर
*नव्याने नयी तालीम* हे थोर महात्म्या, म्हणता म्हणता एकशे पन्नास वर्षे होऊन गेली. तुझ्या नई तालीम ची पुन्हा नव्याने उजळणी करणे गरजेचे आहे, वास्तविक आम्ही पुन्हा नयी तालीम कडे वळलो आहोत,  स्वच्छता अभियान असेल, खेड्याकडे चला चा नारा असेल, खेडी स्मार्ट किंवा विकसित करण्याचा प्रयत्न असेल, पंचक्रोशी विकसित करण्याचा प्रयत्न असेल शैक्षणिक बाबींचा विचार असेल समाज एकत्र करण्याचा विचार असेल,  तुझ्याच विचारांची आम्हा सगळ्यांना नाळ जोडावी लागणार आहे,  नव्हे नव्हे सगळं विश्व एकत्र करण्याची ताकद फक्त तुझ्या त्या अहिंसा वादात आहे, तुझे विचार कधीच संपले नाहीत, संपले नव्हते,  संपणारही नाहीत,  एक ना एक दिवस बुद्ध, महावीर, आणि  हे महात्म्या, तुला अंगीकारावेच लागेल, 150 व्या जयंती निमित्ताने मनपूर्वक अभिवादन *ज्ञानसुत* 🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱
इमेज
स्वर्णवर्ख रासेयोचा भाग 1   दिल्ली मध्ये19 नोव्हेंबर 2015 रोजी मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय भोसले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार घेत असताना, मागच्या 25 वर्षाचा सगळा आलेख सारीपाटा सारखा सरसर सरकत होता. पुरस्काराची रंगीत तालीम करण्यापासून पुरस्कार घेऊन दिल्लीहून पुणे व परत इंदापूरला येईपर्यंत एकएका प्रसंगात कितीतरी वेळा मिरवत होतो. सगळ्या कडू-गोड आठवणींनी मन सैरभैर झालं होतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात 1990 साली प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्राचार्य के एस पाटील होते, व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ई जे  जगताप होते. बाणेर ला रासेयोचे शिबिर होते. आम्ही चौघे सकाळी कॉलेज करून सायकलवर सांगवी ते बाणेर असं डबल सीट जाय चो. मुक्काम करायचा उत्साह असायचा. 1992 लागले व  डॉक्टर एस एन पठाण आमचे प्राचार्य झाले. त्यांनी मला कार्यक्रमाधिकारी केले. तसा मी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट. अकरावी ते टीवाय पर्यंत एनसीसी अतिशय उत्साहाने भान विसरून जूनियर अंडरऑ
इमेज
*Once nss is always nss* 9890171857 रासेयो म्हणजे नवचैतन्य रासेयो नाही नुस्ती योजना , ती तर श्रमाची जोपासना , राष्ट्र म्हणजे नकाशाचा तुकडा नव्हेच , ती तर युवा स्पदंनांची चेतना , तो नुसतो हुंकार नसून, अन्यायाच्या विरोधातला आक्रोश, सेवा हे असिम त्यागाचे प्रतिक. त्या महात्मानी सांगितलेले , समाजाप्रती चं देणं म्हणजे रासेयो, तळागाळाची जाण म्हणजे रासेयो, विज्ञानाची कास म्हणजे रासेयो , सृजनाची आस म्हणजे रासेयो, नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे रासेयो , चला रासेयोमय होऊ या | *रासेयो दिनाच्या शुभेच्छा* संजय चाकणे 24 sep18 9890171857
*मी ही गोष्ट खुपदा  वाचलीय. प्रत्येकदा नविन काहीतरी शिकायला मिळत म्हणुन अनुवादित करतोय.*     एका दिव्यांग शाळेच्या उभारणी साठी चंदा गोळा करण्यासाठीच्या रात्रीच्या जेवणाच्या सभेत, दिव्यांग शॉय च्या वडिलांनी सांगितलेली ही घडलेली कथा.  वक्त्याने सुरुवातीसच एका प्रश्नाने स्तब्ध केले . तो म्हणाला शॉय सारखी  अपंग व मतिमंद मुल जेव्हा जन्म घेतात. त्यावेळी आपल्याला निसर्ग समजुन घ्यायची केव्हढी संधी असते. जर बाहेरचा प्रभाव नसेल तर निसर्ग हा किती तंतोतंत आहे हे कळत!    हो माझ्या शॉय ला इतर मुलांसारखं शिकता येत नाही व कळतही नाही. मग यातली नैसर्गिकता कुठे गेली. या प्रश्नाने स्तब्धता स्वाभाविक होती.    शॉय सारख्या मुलांना समाज कस वागवतो? यावर त्या समाजाची मानवी मुल्य ठरतात यात निसर्गाचा काहिच दोष नसतो.  पुढे तो बोलत राहिला त्याने ओघवत्या शैलीत एक गोष्ट पेश केली.    मी आणी शॉय एकदा एका बागेजवळुन चाललो होतो. काही मुलं बेसबॉल खेळत होती, त्यातले काही शॉयला ओळखत होती. शॉय म्हणाला तुम्हाला काय वाटत ते मला खेळु देतील?      मला कळत होत शॉय सारख्या पोराला बऱ्याच पोरान्नी खेळायला कधीच होकार दिला नस

माझा ऑस्ट्रेलिया दौरा

पु णे विद्यापीठात विद्यावाचस्पती पदवीसाठी संशोधन करीत असताना मी करीत असलेल्या संशोधन संदर्भात मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथून मला बोलावण्यात आले. पहिलाच विमान प्रवास म्हटल्यावर पहलटकरणीचा आनंद झाला होता. पासपोर्ट (पारपत्र), व्हिसा अशा शब्दांची ओळख व्हायला लागली. या सगळ्या धामधुमीत जाण्याच्या आदल्या दिवशी व्हिसा मिळाला. "व्हिसा' म्हणजे पारपत्रावर मारलेला एक शिक्का असतो हे पहिल्यांदाच कळले. अर्थात तोपर्यंत पासपोर्टची किंमत कळली होतीच. जसजसे जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले. तसतसे लग्न जमलेल्या मित्राला, त्याचे मित्र अनेक विविधांगी सल्ले देतात व तो बावचळून, गोंधळून जातो, तसेच माझेही काहीसे व्हायले लागले. कारण यापूर्वी विमानाने प्रवास न केलेले असे मित्र सल्ला देत होते. अर्थात ते फुकटचेच, कारण त्यात त्यांच्या बापाचं काहीच जात नव्हतं. मी मात्र पटेल तोच सल्ला अत्यंत गांभीर्याने घेत होतो. सल्ले तरी काय? पारपत्र ठेवण्यासाठी बंडीवजा बनियान विकत घ्या, मी कापड बाजारात हिंडून दोन तास घालवून तशा प्रकारची बंडी मिळविली. लाडू, चिवडा, पुरणपोळ्या, शंकरपाळ्या , रव्याचे लाडू असं काय-काय बायकोने आणि आईने
* माय म्हटले की माऊली आणि माऊली म्हटले की विठ्ठल अर्थात पंढरपूर. इंदापूर आणि पंढरपूर हे नातं साधलय ते भीमेने आणि चंद्रभागेने . भीमेचीच पुढे चंदभागा होते. माऊली म्हटल की सारं विश्व त्यात सामावल्याचा भास होतो, माय अर्थात आई. इंदापूर मध्ये कोणीही यावे आणि मायेने सर्वांना समावून घ्यावे असच इथल सगळ वैशिष्टय . फ्लेमिंगो जसे दूरदेशीवरून इथे येतात आपल्या पिल्लांना जन्म देतात. मायेचे प्रेम देतात . त्यांना वाढवून पुन्हा घेउन जातात. तसंच काहीस इथे झालेले आहे. ती आईची बख्खळ प्रेम देणारी माया. मुळातच माया हा शब्द मायवरून आला आहे. माय जे प्रेम करते आणि त्यातून जे उत्पन्न होते त्यालाच माया म्हणतात. म्हणून हे जे मायाळू स्वरूप आहे, आईच्या या प्रेमापोटी प्रत्येकाने भरभरून लिहीलेलं आहे. आई, माय, ममता, माँ, मदर या सगळ्याच शब्दांमधून विविध भाषेतील साहित्य समृद्घ झालेली आहे. कवी ग्रेसपासून ते फ. मु. शिंदेपर्यत अनेकांनी आईवर लिहीले आहे. अर्थात नव कवी जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या आईबद्दल काहीतरी लिहितोच. जसा तो प्रेमावर लिहतो तसा तो आईवर ही लिहतो.  म्हणूनच या आईबद्दलच्या प्रेमाला अत्यंत महत

इन्दापुरची माती

*इन्दापुरची माती*                 इंदापूरच्या मातीत एकदा आलं की इथल्या मातीशी आपसुक नाळ जुळते. नाळ जुळली की प्रेमात रूपांतर होतं. दूरदेशीचा फ्लेमिंगो इथल्या मातीवर, उजनी धरणावर प्रेम करणारा, यांच्या जोड्या प्रेमाची उपमा सार्थ करणाऱ्या. इंदापूरच्या मातीत प्रेम कुणावरही करावं! पळसनाथाच्या मंदिरातील शिलालेखावर करावं, अहिल्यादेवींनी बांधलेल्या पिटकेश्वराच्या बारवेवर करावं, नंदिकेश्वराच्या गळ्यातील घंटीवर करावं ! उजनीच्या विस्तीर्ण जलशयावर करावं!  कर्मयोगीवर जसं करावं, तसं दानशूर नाराबाप्पावर करावं. शहीदांच्या स्तंभावर करावं, नेहरू चौकातल्या भाषणांवर करावं , इथल्या भिमथडीच्या वडापांवर करावं, चिलापीवर जसं करावं तसं भांडगावच्या म्हसोबावर करांव रूईच्या बाबीरावर तर करावंच पण चाँदशाहवलीवर पण करावं, पठाणाच्या विहीरीवर कराव, व्यंकटेशावर जसं करावं तसं मालोजीराजांच्या फतेहमंगल गढीवर करावं, मोरोपंत पिंगलेंच्या वाड्यावर करावं, इंदेश्वराच्या शिखरावर करावं, इथून जाणाऱ्या शंभूमहादेवाच्या कावडीवर करावं तसंच जानवर्धन  करणाऱ्या माणसांवर करावा. प्रेम कुणावरही करावं, माणुसकी जपणारं करावं, . मुक्या जन

इर्जिक

*इर्जिक* इर्जिक, हलमा म्हणतात आदिवासी, इर्जिक असायची नांगरणीला इर्जिक असायची काढणिला खुरपायला , भाळणीला इर्जिक असायची मुळी भलरी गायला, तरवाट गडयानं *भलरी दादा भलरी* सुरु केलं की काय अवसान यायचं, येग रामाच्या बाणाचा वाढलाच म्हणायचा , इर्जिकीतल्या तेलच्यागुळवण्याची सय अजूनही येते, गुढघ्यावर थापलेल्या तेलच्या काळ्या गुळाच्या गुळवण्यात कुस्करुन खातांना धमाल यायची, कारण तांब्या पितळी आपलीच असायची , कोण म्हणतं इर्जिका संपल्या ? आजही इर्जिक होते , इर्जिका होतात चावडीवर, इर्जिका होतात यस्टीच्या थांब्यावर, इर्जिका होतात हापिसात वांझोटया झाल्यात इर्जिका , वायफळ असतात चर्चा अमेरिकेच्या अध्यक्षाला अक्कल नाही इथपासून, अंत कशालाच नसतो, त्यांच्या लेखी कुणीच सुटत नाही, धोनीलाही कळत नाही न सानियानी बुरखा घालून खेळलं पाहिजे काहिच वर्ज्य नसतं बडवलेल्या बैलांना : . . ' . भारत उन्नत बनवायचा असेल तर , इर्जिकीच्या तुताऱ्या नव्याने फुंकाव्या लागतील , पांढरे डगले टाकून, बाहुबेंडकुळ्या टराराव्या लागतील लंगोटी कसाव्या लागतील, ढोल बडवावे लागतील बैलांना माज आणावाच लाग
ज्ञानवारी कशाला जाऊ आषाढी कार्तिकी पंढरपुरी I शाळेचे ज्ञानमंदिर माझी रोजचीच वारी ॥ माझे वर्गातले भान हरपून शिकवणे | माझे रोजचेच ब्रम्हानंदी टाळी लागणे ॥ खडू ,फळा, डस्टर माझे टाळ वीणा नी मृदंग | ज्ञानाची पखरण माझा रोजचाच अभंग ॥ पोरं सोरं येतात मन मोकळं कराया I माझ्यासाठी तोच चंद्रभागेतिरी विसावा ॥ पालक येतात सुख दुःख सांगावया | विठ्ठल -रुक्मिणी त्यांच्या रूपे भेटावया ॥ *ज्ञानसुत* १९ ऑगस्ट १८
*सहल / ट्रेक / गिर्यारोहण का व कशासाठी ?*           मागील वर्षी चावंडगड अर्थात प्रसन्नगड, नाणेघाट व कुकडेश्वर असा ट्रेक झाला, 250 मुले / मुली ३० प्राध्यापक अशा लवाजम्यासह धमाल आली,         मी खुप भटकंती केली आहे. दरवेळी नव्याने शिकायला मिळतं. कालच्या ट्रेक मध्ये एका तरूणाने मला एक प्रश्न  विचारला की सर काय हो या ट्रेकचा फायदा ?      वर्षातून एकदा मेडिकल चेक अप करायची गरज नाही, कारण , फुफुसांची, ह्रदयाची क्षमता, आपोआप तपासली जाते, दमा, धाप लागते का ? हे कळते . पाय लटपटतात का ? वय झालयं का,? घाम आल्यावर, चक्कर येते का ? उत्तर *नाही*आले की, तुम्ही *धडधाकट* आहात हे सिद्ध होते . शुद्ध निर्सगात गेलं की ओझोन च्या बरोबरीने शुध्द हवा अर्थात भरपूर प्राणवायू छातीच्या भात्यात जातो. रक्ताभिसरण जोरात होते. ह्रदयाला बळकटी येते, हालचाली वाढतात, त्वचेला तुकतुकी येते, डोळे झळाळतात, *पेशी न पेशी उत्तेजीत होतात*. सकारात्मक उर्जा मिळते.                 अजुन मला स्वतःला  एकही गोळी घ्यावी लागत नाही . हेही नसे थोडके, चला तर दोन / तिन महिन्यातून एखादया गडावर, किल्ल्यावर , डोंगरात, सहयाद्रीच्या कडे
इमेज
महामहीम अब्दुल कलामसाहेबांचे . स्वप्न पहा ... .........स्वप्न पहा ..........आणी स्वप्न पहा .. हे खुपदा ऐकले होते परंतु त्यांच्याच मुखातुन ऐकण्याची संधी मिळाली ती 2001 साली जेव्हा ते भारतीय जैन संघटना भुकंपग्रस्त पुनर्वसन प्रकल्प वाघोली येथे आले होते .....मी प्रभारी प्राचार्य असल्याने प्रोटोकॉल प्रचंड धास्ती घेतली होती .  त्यांच्या कार्यालयाने कळविल्याप्रमाणे विद्यार्थ्यान्ना प्रश्न विचारु द्यायचे आणी त्यान्नी उत्तरे द्यायची असा कार्य्क्रम होता. वेळ दिली होती ती 45 मिनिटे .  आम्ही सगळे कामाला लागलो होतो पहिलाच प्रसंग असल्याने खुप तयारी केली होती अगदी कोणत्या मुलाने कोणता प्रश्न आणी कुठल्या क्रमाने विचारायचा हेही ठरवले होते .खर सांगतो पण रंगीत तालीम ही घेतली होती. .मुलानी प्रश्न मराठीतुन विचारायचा व तो मी इंग्रजीतुन त्यान्न भाषांतरीत करुन सांगायचा. अस साध सरळ होत. . . . ते आले ते सरळ व्यासपिठावर. सगळ्यान्नी उभे राहुन 7 ते आठ मिनीटे कडाडुन टाळ्या वाजवल्या तो आरव मी आजही विसरु शकत नाही .त्यांचे मिश्कील हसन हात उंचाउन अभीवादन करण ... . मी एकटाच व्यासपीठ आणी प्रेक्षाक
*शिरगोळे अर्थात गारगोटी*      रांगोळीचे दर्शन आपणा सर्वांना अत्यंत मनमोहक नेत्रसुखकारक असते, हल्ली तर नानाविध प्रकारच्या रांगोळ्या काढ्ल्या जातात. रांगोळीचे वर्ग असतात. त्यात भडक रंग भरले की नजारा आणखी उठावदार, प्रफुल्लीत चित्ताकर्षक होतो. आपण कधी विचार केलाय का ? रांगोळी कशी बनते ? रंग कसे तयार होतात ?  वापरले जाणारे रंग बहुतांशी मेटॅलोथॅलोसायनाईडचे बनतात जे विषारी असतात आमच्या लहाणपणी दिवाळीच्या आधी, रानोमाळ हिंडून शिरगोळे / गोटे गोळी करण्याची अहमहमिका लागायची. ते गोळा करायचे, उखळात किंवा बत्त्यात घणाने किंवा दगडाने कुठायचे त्याची जाङ धोतरातून वस्त्र गाळ पुड करायची ' अंगण शेणाने सारवायचे व सुबक  रांगोळी रेखाटायची. हळदी, कुंकुं, अबीर, बुक्का, काव जागोजागी पेरायची. असा शिरस्ता ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हे सर्व पडद्याआड गेले  नुकतेच  सिन्नर जवळील गारगोटी संग्रहालय पाहिले, व खुप हळहळ वाटली की आजपावेतो आपण निसर्गाचा किती ऱ्हास केलाय . प्रत्येक निसर्गसपन्न गारगोटीला केव्हढी किंमत आहे . नानाविध आकाराच्या या गारगोटी पाचू , निलम , पुष्कराज, माणिक लसण्या, पोवळे, जिवाश्म , प्र
माझी गडगिरी भाग:- 17 पांडे पेडगांवचा धर्मवीर गड -           मी तसा मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील चांडगांव या गावचा पेडगांव आमच्यापासून हाकेच्या आंतरावर पण तरीसुध्दा कधी जाणं झालं नव्हतं इंदापूरला आल्यानंतर कधीतरी एकदा या धर्मवीर गडावर अर्थात बहाद्दर गडावर किंवा अर्थात पांडे पेडगांवच्या किल्ल्यावर जाव असं ठरवत होतो परंतु होत नव्हतं. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असं दरवर्षी कुठल्यातरी किल्ल्यावर शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवरीला कुठल्यातरी किल्ल्यावर सायकलने प्रवास करतो. मागच्या वर्षी हा प्रवास बहाद्दुरगड अर्थात पांडे पेडगांवला करायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे इंदापूर ते पांडे पेडगांव हे आंतर 70 कि.मी. पांडे पेडगांव म्हटलं की, पेडगांवचा शहाणा ही म्हण आपल्या लक्षात येते हा वाक्यप्रचार जो पडलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बहाद्दुर खानाला जो चकवा दिला तेव्हापासून पेडगांवचा शहाणा असं संबोधलं जातं. पेडगांवचा धर्मवीर गड हा भिमेच्या काठावर आहे. त्याच्यातील दक्षिणेकडील तटबंदी भिमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या या किल्ल्याला तीन ते चार प्रवेशद्वारे आहेत.

गडगिरी I6

माझी गडगिरी भाग:- 16 *शितल आल्हाददायी कळसुबाई* कळसुबाई म्हटलं की महाराष्ट्रातलं सहयाद्री रांगेतले सर्वात उंच शिखर अशी आपली धारणा होते आणि स्वाभाविकच आहे. अदमासे 1550 मीटर उंच अर्थात 5400 फुटावर असलेलं हे शिखर.  महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेकर्सला कायम आकर्षित करणारं ठिकाण. तसा कळसुबाई शिखरावर मी चारदा गेलो. पण आठवणीत राहिलं ते श्रावणातलं वनसचेतन शिबिरा अतंर्गत केलेली गडगिरी आम्ही दोन गाडया करुन 150 जण भारतीय जैन संघटना महाविद्यालयातून 1997 साली कळसुबाईला गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. राजन वेळुकर यांनी वनसचेतन ही एक अफलातुन संकल्पना मांडली होती.     आम्हाला आलं होतं ते भंडारदरा वन . भंडारदरा करुन  कळसुबाई करायचं असा सगळा योजनेचा भाग होता. भारतीय जैन संघटनेचे कार्यवाहक श्री. डुंगरवाल आणि आम्ही 150 जण अस कळसुबाईला जायचं ठरलं. अतिशय उत्तम नियोजन आम्ही केलं होतं. आणि त्या प्रमाणे रात्री 11:00 वाजता पुण्याजवळच्या वाघोलीहुन  आम्ही निघालो. पहाटे पोहोचलो संगमनेरमध्ये आन्हीके उरकल्यानंतर पहाटे पाच -सव्वापाचला भंडारदऱ्याला  पोहोचलो. ठरलं की आ
माझी गडगिरी भाग :- 15 *हिरवा–पिवळा–लाल मल्हार गड* लहाणपणापासून जेजुरीला जाण्याचा अनेकदा प्रसंग आला, विशेषत : घरातील कोणाचेही लग्न झाले की आमची स्वारी नवरानवरी बरोबर हमखास असायची . गावातल्या नगाऱ्याला चामडं बसवायला बैलगाडीतून प्रवास केला होता .       2005 साली आम्ही पुणे – सासवड – निरा – फलटण रस्त्यावरील दौंडज या गावात सलग समपातळी चराची 10 दिवसांची साखळी पध्दतीने राष्ट्रीय सेवा योजनेची अनेक शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरातून दौंडजच्या पिण्याचा प्रश्न काळाच्या ओघात सुटला. तिथे चार महिने येणारे पाण्याचे टँकर बंद झाले. ही शिबिरे चालु असतांना सातत्याने जेजुरीवरुन दौंडजला जावे लागत होते. त्यामुळे दोन – तिन वेळा जेजुरीला गडावर जाणं झालं डॉ. राजकुमार रिकामे, प्राचार्या अर्चना ढेकणे बरोबर असायचे. एकदा भर दुपारी गड चढत असतांना चर्चा चालु होती की, गडावर झाडं लावणं फारच गरजेचे आहे. जेजुरीचा गड म्हणजे सोनेरी गड – नवलाख पायरीचा गड – देवी म्हाळसा बानुबाईचा गड, राजे शहाजी व छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट जिथे झाली व ज्या पितळी कासवामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिले तो मार्तंड गड, ज्या प

बीजमटका

इमेज
बीज मटका आम्ही जुलै २००४ साली मोठया प्रमाणात वृक्षारोपन करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही मोठे नियोजन केले होते. तथापी,जेथे माणसालाही पोहचता येत नाही अशा ठिकाणी कसे वृक्षारोपन  करायचे यावर खुप खल झाला सहाजिकच अशा डोंगर उतारावर बीजारोपन करायचे अशी टूम निघाली व मटका बीजाचा जन्म झाला . *दिवाळीच्या लक्ष्मीपुजनातील बोळकी व संक्रांतीतील ओवसायची सुगडी,खण* ही घरोघरी, माजघरात किंवा अडगळीच्या ठिकाणी छतावर वर्षानुंवर्षे तशीच पडून असतात. आम्ही २० जुलै रोजी वेगवेगळया महाविद्यालयांनी गड ,देवस्थाने ,किल्ले अशा ठिकाणी मटका बीजाच्या साहयाने बीजारोपन करावयाचे ठरले. मटका बीज तयार करण्यासाठी आदल्या दिवसी बियां कोमट पाण्यात तासभर भिजवून मातीत व शक्य असल्यास खतामध्ये एकजीव करून मटक्यात भरून मटका  शेणाने किंवा मातीने लींपून रात्रभर तसाच ठेवला जातो. व दुसऱ्या दिवशी उंच कड्यावरून अशी अनेक मडकी दऱ्याखोऱ्यात फेकली जातात . त्यावेळी आम्ही तीन ते चार हजार विद्यार्थांनी सप्तशृंगी गड,भीमाशंकर ,कळसूबाई, सिंहगड,तिकोणा,लोहगड, शिवनेरी,राजगड अशा अनेक ठिकाणी ख प्रकारचे बीजारोपन मटका बिजाच्या सहाय्याने केले होते
*माझी गडगिरी भाग :- ११* *भिमाशंकरची भुतं:-* भिमाशंकर म्हणजे भिमा नदीचे उगमस्थान. वास्तविक हा महादेवाचा डोंगर म्हणून प्रसिध्द. बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिध्द असलेले ठिकाण. त्यामुळे कायम गजबजलेले. *शिवपुराणातील* २० व्या अध्यायात ०१ ते २० श्लोकामध्ये या ज्योतिलिंगाची महती वर्णीली आहे  २१ व्या  अध्यायात श्लोक ०१ ते ५४ मध्ये माहिती आहे. त्याचप्रमाणे *भिमा पुराणात* याच्या पहिल्या ०३ अध्यायात भिमाशंकरचा उल्लेख येतो. एकदा आम्हा मित्रांनी डॉ प्र.के. घाणेकर सरांचे भाषण ऐकले होते. आणि त्यात भिमाशंकरला भुते बघायला मिळतात असे त्यांनी सांगितल्याने १९८७ साली आम्ही भिमाशंकरला भुतं बघायला गेलो. भिमाशंकरला जायला तशा अनेक वाटा त्यातील महत्वाच्या ०२ वाटा एक म्हणजे राजगुरुनगर व वरून भोरगिरी किल्ल्यापासून वर जाता येते, किंवा मंचर वरुन  घोडेगांव मार्गे जाता येते. डॉ. प्र. के. घाणेकर यांच्या कडून एकदा भिमाशंकरच्या भुतांबद्दल ऐकलं होतं. तेच मनात ठेऊन आम्ही १० – १२ जणांनी भिमाशंकरला जाण्याचं ठाण मांडलं. शिवाजीनगर वरुन दुपारच्या एस.टी. ने डिंभे धरणाचा रम्य परिसर न्याहाळत भिमाशंकर गाठले. वन विभागाच्या अति
       jk”Vªh; lsok ;ks            19 uksOgsacj 2015 jksth ek- jk”Vªirh ;kaP;k gLrs jk”Vªh; lsok ;kstusps mRd`”B egkfo|ky; o bankiwj egkfo|ky;krhy izk- /kuat; Hkkslys ;kauk mRd`”B dk;Zdze vf/kdkjh iqjLdkj ?ksr vlrkuk ekxP;k 25 o”kkZapk lxGk vkys[k lkjhikVklkj[kk ljlj ljdr gksrk- iqjLdkjkph jaxhr rkyhe dj.;kiklwu iqjLdkj ?ksÅu fnYyhgwu iq.ks o ijr bankiwjyk ;sbZi;Zar ,d ,dk izlaxkr fdrhrjh osG eh jer gksrks- lxG;k dVw xksM vkBo.khauk eu lSjHkSj >kya gksra-      iq.ks ftYgk f’k{k.k eaMGkP;k ckcqjkoth ?kksyi egkfo|ky;kr 1990 lkyh izk/;kid Eg.kqu :tw >kyks- izkpk;Z ds- ,l- ikVhy gksrs o jk”Vªh; lsok ;kstusps dk;Zdze vf/kdkjh bZ- ts- txrki gksrs- ck.ksjyk jkls;ks ps f’kfcj gksrs- vkEgh pkS?ks ldkGh dkWyst d:u lk;dyoj lkaxoh rs ck.ksj vla McyflV tk;pks- eqDdke djk;pks] mRlkgh vlk;pks- 1992 lkyh MkW- ,l- ,u- iBk.k vkeps izkpk;Z >kys o eyk dk;Zdze vf/kdkjh dsys- rlk eh jk”Vªh; Nk= lsuspk dWMsV] 11 oh rs Vh- ok;- i;Zar ,u-lh-lh- vfr’k; mRlkgkus ch o lh lfVZfQdsV d:u T;qfuvj