पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
उर्जा संवर्धन करताना सर्वात महत्वाची काळजी

*माझी गडगीरी भाग – १*

 शुरांचा गड सिंहगड -               सिंहगडवर तसा मी अनेकदा गेलो. राष्ट्रीय छात्र सेनेत असताना अंबुशसाठी ८ दिवस गडावर मुक्काम केला. खेड शिवापूरवरुन येऊन पोटॅटो पॉईंट पासून आम्ही गड चढला होता. कात्रज ते सिंहगड  असा सात टेकड्यांचा ट्रेक, कल्याण दरवाजापासून मणेरवाडीतून अर्थातच घोरपडीच्या वाटेवरुन पुण्याकडुन अर्थात डोणजावरुन, तसेच खेड शिवापूरवरुन असा सगळ्या वाटांनी सिंहगड चढुन झाला आहे. पण सिंहगड लक्षात राहिलला तो म्हणजे एकदा शनी आमावास्येला पुरुषोत्तम आवदे आणि मी सायकलवरुन डबलसिट कोथरुड वरुन सायंकाळी ५ ला निघालो. तसा हा आमचा बऱ्यापैकी नित्याचा उपक्रम होता. सायकलवर डबलशीट उधळत यायचं, दोघांनी पँडल मारायचे, डोणजाला सायकल लाऊन कमीत कमी वेळात गड चढुन नरवीर तानजीचे दर्शन घेऊन देव टाक्याचे पाणी पिऊन परत यायचे. पण यावेळी मात्र *शनी आमावस्येला गड सर करायचा अस भूत दोघांच्या डोक्यात घुसल होतं* मग कायं डोणज्याच्या पायथ्याला सायकल झाडाला लावली. साधारणत: ८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली.            निम्या गडावर गेल्यानंतर एक पांढरी आकृती जंगलातून आमच्याकडे यायला लागली. एकतर शनिवार त्यात आमाव