पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*शिरगोळे अर्थात गारगोटी*      रांगोळीचे दर्शन आपणा सर्वांना अत्यंत मनमोहक नेत्रसुखकारक असते, हल्ली तर नानाविध प्रकारच्या रांगोळ्या काढ्ल्या जातात. रांगोळीचे वर्ग असतात. त्यात भडक रंग भरले की नजारा आणखी उठावदार, प्रफुल्लीत चित्ताकर्षक होतो. आपण कधी विचार केलाय का ? रांगोळी कशी बनते ? रंग कसे तयार होतात ?  वापरले जाणारे रंग बहुतांशी मेटॅलोथॅलोसायनाईडचे बनतात जे विषारी असतात आमच्या लहाणपणी दिवाळीच्या आधी, रानोमाळ हिंडून शिरगोळे / गोटे गोळी करण्याची अहमहमिका लागायची. ते गोळा करायचे, उखळात किंवा बत्त्यात घणाने किंवा दगडाने कुठायचे त्याची जाङ धोतरातून वस्त्र गाळ पुड करायची ' अंगण शेणाने सारवायचे व सुबक  रांगोळी रेखाटायची. हळदी, कुंकुं, अबीर, बुक्का, काव जागोजागी पेरायची. असा शिरस्ता ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हे सर्व पडद्याआड गेले  नुकतेच  सिन्नर जवळील गारगोटी संग्रहालय पाहिले, व खुप हळहळ वाटली की आजपावेतो आपण निसर्गाचा किती ऱ्हास केलाय . प्रत्येक निसर्गसपन्न गारगोटीला केव्हढी किंमत आहे . नानाविध आकाराच्या या गारगोटी पाचू , निलम , पुष्कराज, माणिक लसण्या, पोवळे, जिवाश्म , प्र
माझी गडगिरी भाग:- 17 पांडे पेडगांवचा धर्मवीर गड -           मी तसा मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील चांडगांव या गावचा पेडगांव आमच्यापासून हाकेच्या आंतरावर पण तरीसुध्दा कधी जाणं झालं नव्हतं इंदापूरला आल्यानंतर कधीतरी एकदा या धर्मवीर गडावर अर्थात बहाद्दर गडावर किंवा अर्थात पांडे पेडगांवच्या किल्ल्यावर जाव असं ठरवत होतो परंतु होत नव्हतं. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असं दरवर्षी कुठल्यातरी किल्ल्यावर शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवरीला कुठल्यातरी किल्ल्यावर सायकलने प्रवास करतो. मागच्या वर्षी हा प्रवास बहाद्दुरगड अर्थात पांडे पेडगांवला करायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे इंदापूर ते पांडे पेडगांव हे आंतर 70 कि.मी. पांडे पेडगांव म्हटलं की, पेडगांवचा शहाणा ही म्हण आपल्या लक्षात येते हा वाक्यप्रचार जो पडलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बहाद्दुर खानाला जो चकवा दिला तेव्हापासून पेडगांवचा शहाणा असं संबोधलं जातं. पेडगांवचा धर्मवीर गड हा भिमेच्या काठावर आहे. त्याच्यातील दक्षिणेकडील तटबंदी भिमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या या किल्ल्याला तीन ते चार प्रवेशद्वारे आहेत.

गडगिरी I6

माझी गडगिरी भाग:- 16 *शितल आल्हाददायी कळसुबाई* कळसुबाई म्हटलं की महाराष्ट्रातलं सहयाद्री रांगेतले सर्वात उंच शिखर अशी आपली धारणा होते आणि स्वाभाविकच आहे. अदमासे 1550 मीटर उंच अर्थात 5400 फुटावर असलेलं हे शिखर.  महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेकर्सला कायम आकर्षित करणारं ठिकाण. तसा कळसुबाई शिखरावर मी चारदा गेलो. पण आठवणीत राहिलं ते श्रावणातलं वनसचेतन शिबिरा अतंर्गत केलेली गडगिरी आम्ही दोन गाडया करुन 150 जण भारतीय जैन संघटना महाविद्यालयातून 1997 साली कळसुबाईला गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. राजन वेळुकर यांनी वनसचेतन ही एक अफलातुन संकल्पना मांडली होती.     आम्हाला आलं होतं ते भंडारदरा वन . भंडारदरा करुन  कळसुबाई करायचं असा सगळा योजनेचा भाग होता. भारतीय जैन संघटनेचे कार्यवाहक श्री. डुंगरवाल आणि आम्ही 150 जण अस कळसुबाईला जायचं ठरलं. अतिशय उत्तम नियोजन आम्ही केलं होतं. आणि त्या प्रमाणे रात्री 11:00 वाजता पुण्याजवळच्या वाघोलीहुन  आम्ही निघालो. पहाटे पोहोचलो संगमनेरमध्ये आन्हीके उरकल्यानंतर पहाटे पाच -सव्वापाचला भंडारदऱ्याला  पोहोचलो. ठरलं की आ