पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
महामहीम अब्दुल कलामसाहेबांचे . स्वप्न पहा ... .........स्वप्न पहा ..........आणी स्वप्न पहा .. हे खुपदा ऐकले होते परंतु त्यांच्याच मुखातुन ऐकण्याची संधी मिळाली ती 2001 साली जेव्हा ते भारतीय जैन संघटना भुकंपग्रस्त पुनर्वसन प्रकल्प वाघोली येथे आले होते .....मी प्रभारी प्राचार्य असल्याने प्रोटोकॉल प्रचंड धास्ती घेतली होती .  त्यांच्या कार्यालयाने कळविल्याप्रमाणे विद्यार्थ्यान्ना प्रश्न विचारु द्यायचे आणी त्यान्नी उत्तरे द्यायची असा कार्य्क्रम होता. वेळ दिली होती ती 45 मिनिटे .  आम्ही सगळे कामाला लागलो होतो पहिलाच प्रसंग असल्याने खुप तयारी केली होती अगदी कोणत्या मुलाने कोणता प्रश्न आणी कुठल्या क्रमाने विचारायचा हेही ठरवले होते .खर सांगतो पण रंगीत तालीम ही घेतली होती. .मुलानी प्रश्न मराठीतुन विचारायचा व तो मी इंग्रजीतुन त्यान्न भाषांतरीत करुन सांगायचा. अस साध सरळ होत. . . . ते आले ते सरळ व्यासपिठावर. सगळ्यान्नी उभे राहुन 7 ते आठ मिनीटे कडाडुन टाळ्या वाजवल्या तो आरव मी आजही विसरु शकत नाही .त्यांचे मिश्कील हसन हात उंचाउन अभीवादन करण ... . मी एकटाच व्यासपीठ आणी प्रेक्षाक