पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इन्दापुरची माती

*इन्दापुरची माती*                 इंदापूरच्या मातीत एकदा आलं की इथल्या मातीशी आपसुक नाळ जुळते. नाळ जुळली की प्रेमात रूपांतर होतं. दूरदेशीचा फ्लेमिंगो इथल्या मातीवर, उजनी धरणावर प्रेम करणारा, यांच्या जोड्या प्रेमाची उपमा सार्थ करणाऱ्या. इंदापूरच्या मातीत प्रेम कुणावरही करावं! पळसनाथाच्या मंदिरातील शिलालेखावर करावं, अहिल्यादेवींनी बांधलेल्या पिटकेश्वराच्या बारवेवर करावं, नंदिकेश्वराच्या गळ्यातील घंटीवर करावं ! उजनीच्या विस्तीर्ण जलशयावर करावं!  कर्मयोगीवर जसं करावं, तसं दानशूर नाराबाप्पावर करावं. शहीदांच्या स्तंभावर करावं, नेहरू चौकातल्या भाषणांवर करावं , इथल्या भिमथडीच्या वडापांवर करावं, चिलापीवर जसं करावं तसं भांडगावच्या म्हसोबावर करांव रूईच्या बाबीरावर तर करावंच पण चाँदशाहवलीवर पण करावं, पठाणाच्या विहीरीवर कराव, व्यंकटेशावर जसं करावं तसं मालोजीराजांच्या फतेहमंगल गढीवर करावं, मोरोपंत पिंगलेंच्या वाड्यावर करावं, इंदेश्वराच्या शिखरावर करावं, इथून जाणाऱ्या शंभूमहादेवाच्या कावडीवर करावं तसंच जानवर्धन  करणाऱ्या माणसांवर करावा. प्रेम कुणावरही करावं, माणुसकी जपणारं करावं, . मुक्या जन

इर्जिक

*इर्जिक* इर्जिक, हलमा म्हणतात आदिवासी, इर्जिक असायची नांगरणीला इर्जिक असायची काढणिला खुरपायला , भाळणीला इर्जिक असायची मुळी भलरी गायला, तरवाट गडयानं *भलरी दादा भलरी* सुरु केलं की काय अवसान यायचं, येग रामाच्या बाणाचा वाढलाच म्हणायचा , इर्जिकीतल्या तेलच्यागुळवण्याची सय अजूनही येते, गुढघ्यावर थापलेल्या तेलच्या काळ्या गुळाच्या गुळवण्यात कुस्करुन खातांना धमाल यायची, कारण तांब्या पितळी आपलीच असायची , कोण म्हणतं इर्जिका संपल्या ? आजही इर्जिक होते , इर्जिका होतात चावडीवर, इर्जिका होतात यस्टीच्या थांब्यावर, इर्जिका होतात हापिसात वांझोटया झाल्यात इर्जिका , वायफळ असतात चर्चा अमेरिकेच्या अध्यक्षाला अक्कल नाही इथपासून, अंत कशालाच नसतो, त्यांच्या लेखी कुणीच सुटत नाही, धोनीलाही कळत नाही न सानियानी बुरखा घालून खेळलं पाहिजे काहिच वर्ज्य नसतं बडवलेल्या बैलांना : . . ' . भारत उन्नत बनवायचा असेल तर , इर्जिकीच्या तुताऱ्या नव्याने फुंकाव्या लागतील , पांढरे डगले टाकून, बाहुबेंडकुळ्या टराराव्या लागतील लंगोटी कसाव्या लागतील, ढोल बडवावे लागतील बैलांना माज आणावाच लाग
ज्ञानवारी कशाला जाऊ आषाढी कार्तिकी पंढरपुरी I शाळेचे ज्ञानमंदिर माझी रोजचीच वारी ॥ माझे वर्गातले भान हरपून शिकवणे | माझे रोजचेच ब्रम्हानंदी टाळी लागणे ॥ खडू ,फळा, डस्टर माझे टाळ वीणा नी मृदंग | ज्ञानाची पखरण माझा रोजचाच अभंग ॥ पोरं सोरं येतात मन मोकळं कराया I माझ्यासाठी तोच चंद्रभागेतिरी विसावा ॥ पालक येतात सुख दुःख सांगावया | विठ्ठल -रुक्मिणी त्यांच्या रूपे भेटावया ॥ *ज्ञानसुत* १९ ऑगस्ट १८
*सहल / ट्रेक / गिर्यारोहण का व कशासाठी ?*           मागील वर्षी चावंडगड अर्थात प्रसन्नगड, नाणेघाट व कुकडेश्वर असा ट्रेक झाला, 250 मुले / मुली ३० प्राध्यापक अशा लवाजम्यासह धमाल आली,         मी खुप भटकंती केली आहे. दरवेळी नव्याने शिकायला मिळतं. कालच्या ट्रेक मध्ये एका तरूणाने मला एक प्रश्न  विचारला की सर काय हो या ट्रेकचा फायदा ?      वर्षातून एकदा मेडिकल चेक अप करायची गरज नाही, कारण , फुफुसांची, ह्रदयाची क्षमता, आपोआप तपासली जाते, दमा, धाप लागते का ? हे कळते . पाय लटपटतात का ? वय झालयं का,? घाम आल्यावर, चक्कर येते का ? उत्तर *नाही*आले की, तुम्ही *धडधाकट* आहात हे सिद्ध होते . शुद्ध निर्सगात गेलं की ओझोन च्या बरोबरीने शुध्द हवा अर्थात भरपूर प्राणवायू छातीच्या भात्यात जातो. रक्ताभिसरण जोरात होते. ह्रदयाला बळकटी येते, हालचाली वाढतात, त्वचेला तुकतुकी येते, डोळे झळाळतात, *पेशी न पेशी उत्तेजीत होतात*. सकारात्मक उर्जा मिळते.                 अजुन मला स्वतःला  एकही गोळी घ्यावी लागत नाही . हेही नसे थोडके, चला तर दोन / तिन महिन्यातून एखादया गडावर, किल्ल्यावर , डोंगरात, सहयाद्रीच्या कडे