पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
स्वर्णवर्ख रासेयोचा भाग 1   दिल्ली मध्ये19 नोव्हेंबर 2015 रोजी मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय भोसले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार घेत असताना, मागच्या 25 वर्षाचा सगळा आलेख सारीपाटा सारखा सरसर सरकत होता. पुरस्काराची रंगीत तालीम करण्यापासून पुरस्कार घेऊन दिल्लीहून पुणे व परत इंदापूरला येईपर्यंत एकएका प्रसंगात कितीतरी वेळा मिरवत होतो. सगळ्या कडू-गोड आठवणींनी मन सैरभैर झालं होतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात 1990 साली प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्राचार्य के एस पाटील होते, व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ई जे  जगताप होते. बाणेर ला रासेयोचे शिबिर होते. आम्ही चौघे सकाळी कॉलेज करून सायकलवर सांगवी ते बाणेर असं डबल सीट जाय चो. मुक्काम करायचा उत्साह असायचा. 1992 लागले व  डॉक्टर एस एन पठाण आमचे प्राचार्य झाले. त्यांनी मला कार्यक्रमाधिकारी केले. तसा मी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट. अकरावी ते टीवाय पर्यंत एनसीसी अतिशय उत्साहाने भान विसरून जूनियर अंडरऑ
इमेज
*Once nss is always nss* 9890171857 रासेयो म्हणजे नवचैतन्य रासेयो नाही नुस्ती योजना , ती तर श्रमाची जोपासना , राष्ट्र म्हणजे नकाशाचा तुकडा नव्हेच , ती तर युवा स्पदंनांची चेतना , तो नुसतो हुंकार नसून, अन्यायाच्या विरोधातला आक्रोश, सेवा हे असिम त्यागाचे प्रतिक. त्या महात्मानी सांगितलेले , समाजाप्रती चं देणं म्हणजे रासेयो, तळागाळाची जाण म्हणजे रासेयो, विज्ञानाची कास म्हणजे रासेयो , सृजनाची आस म्हणजे रासेयो, नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे रासेयो , चला रासेयोमय होऊ या | *रासेयो दिनाच्या शुभेच्छा* संजय चाकणे 24 sep18 9890171857
*मी ही गोष्ट खुपदा  वाचलीय. प्रत्येकदा नविन काहीतरी शिकायला मिळत म्हणुन अनुवादित करतोय.*     एका दिव्यांग शाळेच्या उभारणी साठी चंदा गोळा करण्यासाठीच्या रात्रीच्या जेवणाच्या सभेत, दिव्यांग शॉय च्या वडिलांनी सांगितलेली ही घडलेली कथा.  वक्त्याने सुरुवातीसच एका प्रश्नाने स्तब्ध केले . तो म्हणाला शॉय सारखी  अपंग व मतिमंद मुल जेव्हा जन्म घेतात. त्यावेळी आपल्याला निसर्ग समजुन घ्यायची केव्हढी संधी असते. जर बाहेरचा प्रभाव नसेल तर निसर्ग हा किती तंतोतंत आहे हे कळत!    हो माझ्या शॉय ला इतर मुलांसारखं शिकता येत नाही व कळतही नाही. मग यातली नैसर्गिकता कुठे गेली. या प्रश्नाने स्तब्धता स्वाभाविक होती.    शॉय सारख्या मुलांना समाज कस वागवतो? यावर त्या समाजाची मानवी मुल्य ठरतात यात निसर्गाचा काहिच दोष नसतो.  पुढे तो बोलत राहिला त्याने ओघवत्या शैलीत एक गोष्ट पेश केली.    मी आणी शॉय एकदा एका बागेजवळुन चाललो होतो. काही मुलं बेसबॉल खेळत होती, त्यातले काही शॉयला ओळखत होती. शॉय म्हणाला तुम्हाला काय वाटत ते मला खेळु देतील?      मला कळत होत शॉय सारख्या पोराला बऱ्याच पोरान्नी खेळायला कधीच होकार दिला नस

माझा ऑस्ट्रेलिया दौरा

पु णे विद्यापीठात विद्यावाचस्पती पदवीसाठी संशोधन करीत असताना मी करीत असलेल्या संशोधन संदर्भात मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथून मला बोलावण्यात आले. पहिलाच विमान प्रवास म्हटल्यावर पहलटकरणीचा आनंद झाला होता. पासपोर्ट (पारपत्र), व्हिसा अशा शब्दांची ओळख व्हायला लागली. या सगळ्या धामधुमीत जाण्याच्या आदल्या दिवशी व्हिसा मिळाला. "व्हिसा' म्हणजे पारपत्रावर मारलेला एक शिक्का असतो हे पहिल्यांदाच कळले. अर्थात तोपर्यंत पासपोर्टची किंमत कळली होतीच. जसजसे जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले. तसतसे लग्न जमलेल्या मित्राला, त्याचे मित्र अनेक विविधांगी सल्ले देतात व तो बावचळून, गोंधळून जातो, तसेच माझेही काहीसे व्हायले लागले. कारण यापूर्वी विमानाने प्रवास न केलेले असे मित्र सल्ला देत होते. अर्थात ते फुकटचेच, कारण त्यात त्यांच्या बापाचं काहीच जात नव्हतं. मी मात्र पटेल तोच सल्ला अत्यंत गांभीर्याने घेत होतो. सल्ले तरी काय? पारपत्र ठेवण्यासाठी बंडीवजा बनियान विकत घ्या, मी कापड बाजारात हिंडून दोन तास घालवून तशा प्रकारची बंडी मिळविली. लाडू, चिवडा, पुरणपोळ्या, शंकरपाळ्या , रव्याचे लाडू असं काय-काय बायकोने आणि आईने
* माय म्हटले की माऊली आणि माऊली म्हटले की विठ्ठल अर्थात पंढरपूर. इंदापूर आणि पंढरपूर हे नातं साधलय ते भीमेने आणि चंद्रभागेने . भीमेचीच पुढे चंदभागा होते. माऊली म्हटल की सारं विश्व त्यात सामावल्याचा भास होतो, माय अर्थात आई. इंदापूर मध्ये कोणीही यावे आणि मायेने सर्वांना समावून घ्यावे असच इथल सगळ वैशिष्टय . फ्लेमिंगो जसे दूरदेशीवरून इथे येतात आपल्या पिल्लांना जन्म देतात. मायेचे प्रेम देतात . त्यांना वाढवून पुन्हा घेउन जातात. तसंच काहीस इथे झालेले आहे. ती आईची बख्खळ प्रेम देणारी माया. मुळातच माया हा शब्द मायवरून आला आहे. माय जे प्रेम करते आणि त्यातून जे उत्पन्न होते त्यालाच माया म्हणतात. म्हणून हे जे मायाळू स्वरूप आहे, आईच्या या प्रेमापोटी प्रत्येकाने भरभरून लिहीलेलं आहे. आई, माय, ममता, माँ, मदर या सगळ्याच शब्दांमधून विविध भाषेतील साहित्य समृद्घ झालेली आहे. कवी ग्रेसपासून ते फ. मु. शिंदेपर्यत अनेकांनी आईवर लिहीले आहे. अर्थात नव कवी जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या आईबद्दल काहीतरी लिहितोच. जसा तो प्रेमावर लिहतो तसा तो आईवर ही लिहतो.  म्हणूनच या आईबद्दलच्या प्रेमाला अत्यंत महत