पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
सदाफुली सदा फुलणारी ' चित्रकलेच्या परिक्षेत पहिल्यांदा हिला चितारल एकदा निसर्ग चित्र म्हणून तर एकदा काल्पनिक चित्र म्हणून परवा आमच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात गेलो ही फुललेली दिसली ' आसपास ही कुठेही नाही आली असावी पारव्याच्या विष्ठेतुन किंवा चोचीतुन काय सांगाव आली असेल वाऱ्याच्या झुळूकीतुन पेवर ब्लॉक च्या बेचकीत चपखल अडकली दवबिंदूच्या पाण्यावर अंकुरली बहरली कळ्या उमलुन बहरली फुले तरारलीत शेंगाही येतीलच पारवे आहेतच नवांकुरांना जन्म देण्यासाठी काल चक्र पुढे नेण्यासाठी सावित्री तू फुलायलाचं हवं सदाफुली सारखं ज्ञानसुत २८ डिसें २०१८