पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 एका टक्क्यांच काय करायचं?         सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले  असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात.           गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच?      वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं,  पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत.         मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो.         थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंबून राहतं.         समाजातही असेच असेल का ? समाजात ५ टक्के लोक सच्चे असतील, तर ५ टक्के लुच्चे असावेत, उरलेल्या ९०
*लहानपणचा दिवाळसण* लहाणपणचा दिवाळसण लहानपणी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला किंवा आमच्या मूळच्या गावी चांडगावला  जाताना कोण आनंद असायचा. दिवाळीच्या आधी तीन-चार दिवस जळगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने श्रीगोंदा स्टेशनला उतरायचं. तो रात्री आणि दिवसभराचा प्रवास, श्रीगोंदा स्टेशनला मामा घ्यायला येई, किंवा आजोबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो ते बैलगाडीने यायचे आणि बैलगाडीने बाबुर्डी ला अर्थात बोरुडे वाडीला वाडीला जायचं, दिवाळीची सुरुवात मोठ्या दिमाखात व्हायची सर्व सात  मावश्या त्यांची मुलं, आजी आजोबा मामा मामी असा मोठा गोतावळा तयार व्हायचा, तसंच काहीसं चांडगाव ला व्हयचं मोठे चुलते आम्ही ज्याना दादा म्हणायचो, अण्णा, आप्पा, त्यांची मुलं सगळी चुलत भावंडे सगळा मेळ जमायचा. वसुबारसेला मामांच्या अर्थात आजोबांच्या घरी धमाल असायची. त्यांच्या त्या काळ्या करड्या पांड्या पांढऱ्या कृष्णधवल अशा गावरान गाई. मेंढ्या. शेळ्या मोठा बारदाना होता. हे सगळं वसुबारसेला खूप मजा करण्यासाठी असायचं. अण्णा मोठ्या आवाजात अर्थात खरडया पट्ट्यात खालील गाणे म्हणायचे आम्ही त्यांच्या मागे सर्व नातवंड लयीत गायचो
इमेज
हे राम , हे महात्मा, गांधी मनामनातला आजही जिवंत आहे, गांधी शिक्षण धोरणातला, गांधी स्वच्छ अभियानातला, गांधी टोपीतला, खादीतला, शेळीच्या दुधाचा, सत्याच्या प्रयोगातला, गोलमेज, पुणे करारातला, खेड्यातला, गांधी पंचक्रोशीचा गांधी साध्या रहाणीचा सत्याग्रहाचा, चले जाव चा, करके तो देखो म्हणणारा, तू गांधी विज्ञानातील गांधी अंशाअंशाने कणा कणाने आजही टिकून आहे,. मनात गांधी असला की अहिंसा सांगावी लागणार नाही, हे महात्मा तुझ्यावर, आज सहज विनोद करतात, तुझ्या अर्ध नग्नतेवरून तुझ्या उपासावरून, मजबुरीवरून, तर काठीही सुटत नाही अपवाद नाही तुझे केसरहित डोके, कारण,  तू आजही मनांत खोलवर रुजलायस, पुन्हा नव्या अंकुरानी क्षणोक्षणी कोंभारुन येतोस, थोरले झाड होऊन कोलमोडतोस पण, अब्जावधी बिजांकुरांनी, पुनः उभारी घेतोस, तू महा आत्मा आहेस हे वारंवार सिद्ध करतोस, आज दिडशे वर्षांचा तरुण झालास तू नाही बुढ्ढा होणार, जगाच्या विनाशापर्यंत, तू तेजाने तळपत राहणार, तू अवतारी होतास की नाही माहीत नाहीस पण सामान्यांच्या मनातला देव आहेस तुझी तालीम नव्याने मांडतील नयी तालीम

जगण्याचा धर्म

*चौकट राजा चौसष्ट कला* जगण्याचा धर्म ज्याचा त्याचा राजाने राजासारखा राहावे, गरज भासली की एक घर चालावे, उगीच इकडं तिकडं उच्छाद मांडू नये, हत्तीने जड पावली सरळ जावे, उंट चालतील की तिरक्या चाली, प्यादी उत्साहात दोन घर मारतील उड्या , आरंभशूर होऊन, पुढे फक्त एकेक घर चालायाचे, त्यांना कुठे माहितीये पहिला बळी त्यांचाच जाणार आहे, दुडक्या चालीने अडीच घर अश्व धुमाकूळ घालतील, वजीर मारेल बाजी, राजाला वाचावण्या फिरत राहील चौसष्ट घरे, अडवा, तिडवा, सरळ, उभा, मागे, पुढे कितीही घरे, शह देण्यासाठी, मनुष्याने चौसष्ट कला शिकाव्यात म्हणे, कधी राजा बनून , तर कधी प्याद्याच्या भूमिकेत, पण,. .... असं कसं होईल? माणसं फार बेरकी झालीत, राजालाच तोफेच्या तोंडी देतात, उंट अडीच घर चालतोय, घोडे हत्तीच्या पायांनी, तर अश्व तुफान वेगाने वजिराच्या भूमिकेत,  सगळो कसा सावळो गोंधळ झालोय, भूमिकेचा धर्म समजायला हवा. प्रत्येकाने तो पाळायला हवा.... *ज्ञानसुत*
जपान: कर्तव्यदक्ष, जागृत, फिनिक्स==== मी पुणे विदयापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणुन नोव्हेंबर महिन्यात 2003 साली रूजू झालो. डॉ. अशोक कोळस्कर कुलगुरू होते. राष्ट्रीय सेवा योजनेने सलग सम पातळी चर व आपत्ती व्यवस्थापनाा या विषयात काही महिन्यात चांगलीच गती घेतली होती. जुन 2004 मध्ये सरांनी मला बोलावून घेतलं आणि "जपानला जाणार का ?", म्हणाले. नाही!, शब्दच माझ्या शब्दकोषात नसल्याने तात्काळ हो ! , म्हणालो. तात्काळ माझी व्हिसा काढण्यापासून तयारी सुरु झाली. वास्तविक ही परिषद जगभरातल्या 40 देशातील 80 कुलगुरूंची आंतरराष्ट्रीय परिषद होती. “ आपत्ती व्यवस्थापणात युवकांचा सहभाग ” असा विषय होता. शोधनिबंध लिहणे, तयारी करणे, जमलं तर थोडेफार जपानी शब्द शिकणे, असा चांगला धावपळीचा मामला होता.                    भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव तसा दांडगाच होता. मी स्वत: 26 जानेवारी 2001 च्या भुकंपानंतर 27 जानेवारीला 150 मुलांसह आपत्ती व्यवस्थापनेच्या कामासाठी टाचणीपासून सॅटेलाईट फोनपर्यंत सतर्कतेने मा. शांतीलालजींच्या नेतृत्वाखाली सज

करके तो देखो

इमेज
*करके तो देखो*            आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना.  महात्मा जी  'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते.  मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं  'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून  मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय.           आज करके तो देखो देखो ची ही नवी कडी पावसामुळे आठ दिवस पुढे
इमेज
*करके तो देखो*              आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना.  महात्मा जी  'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते.  मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं  'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून  मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय.           आज करके तो देखो देखो ची ही नवी कडी पावसामुळे आठ दिवस पुढ
इमेज
*वारी ते वारी*......... .............२००४ ते २०१९           श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती.           यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही  विचार करू लागलो होतो.                कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री.  भिकनराव भुजबळ यांच्याकडे गेलो होतो. गप्पांच्या ओघात ते कसे दिंडीला जाणार आहेत?, दिंडी मध्ये
इमेज
*भीमाशंकर ते भीमाशंकर*                    राष्ट्रीय सेवा योजनेचा मी कार्यक्रम समन्वयक झालो ती 2003 सालातली गोष्ट. काहीतरी मोठे काम उभे करायचे हा सर्वसामान्य सद्हेतू मनात ठेवून काम सुरु केले. डॉ. विवेक सावंत (MKCL) यांनी श्री श्री वसंत टाकळकरांची भेट घडवून आणली आणि सलग समपातळी चर, पाणीप्रश्न, जलव्यवस्थापन, जलसाक्षरता, पर्जन्य त्यांचे मोजमाप, अगदी थेंबा थेंबा चा हिशोब असे विषय रुंजी घालू लागले. डॉ. अशोक कोळसकर हे अत्यंत द्रष्टे कुलगुुरु कायम नव दृष्टी देणारे, काम करून घेणारे, सलग समपातळी चर  हा अत्यंत तांत्रिक प्रयोग रुजवायचा म्हणजे मोठी मेहनत - ताकत पणाला लागणार होती.  तत्पूर्वी वसंत टाकळकर स्वतःला जंगली माणूस म्हणायचे रोज चर्चेच्या फैरी झडत होत्या. शेवटी मला एक उपाय सुचला तो म्हणजे सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांना 5 दिवस एकत्र करून ट्रेनिंग द्यायचं विद्यापीठात एवढ्या लोकांना जागा मिळणार नाही म्हटल्यावर सप्तशृंगी गड, भीमाशंकर, बहाई इ अकॅडमी, अगदी बालेवाडी सह बऱ्याच नावांचा विचार झाला. घोडेगावला सन्मित्र डॉ. इंद्रजीत जाधव प्राचार्य होते. त्यांना फोन केला आणि ते लगेच हो म्