पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
*एका शिक्षकाचे जगणं* आज एका कामानिमित्त तळेगाव दाभाडे ला जाण्याचा योग आला,  तसा तळेगाव दाभाडे ला खूपदा गेलो होतो. परंतु माझे प्राध्यापक मित्र बाळासाहेब काळे यांनी प्राध्यापक बोराडे प्रमोद यांच्याविषयी सांगितलं होतं. ज्या कामासाठी गेलो होतो, ते काम सुरू व्हायला वेळ होता म्हणून सहजच प्राध्यापक रोहित लोंढे यांना म्हणालो आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ आणि आम्ही त्यांनी उभारलेली शिवसृष्टी पाहायला गेलो. होय शिवसृष्टी खरा  शिवकाळ. एखादा शिक्षक त्याच्या आयुष्यात काय करू शकतो? याचा उत्तम नमुना म्हणजे प्राध्यापक बोराडे.              स्वतच्या घराच्याच बंगल्याच्या एका मजल्यावर त्यांनी ही शिवसृष्टी साकारली आहे खऱ्या अर्थाने शिवसृष्टी. शिवकाळातील अनेक वस्तू जशाच्या तशा मिळवलेल्या इथे मांडल्या आहेत. अत्यंत परिश्रमातून कष्टातून मिळवलेल्या या वस्तू.        या वस्तू म्हणजे काय ? तर इथे बघायला मिळते, ती म्हणजे लाकडाची वीरगळ, इथे बघायला मिळतो लाकडाचा सतीचा हात. अत्यंत दुर्मिळ माझ्या पाहण्यात अशा पद्धतीच्या  लाकडी वीरगळी, लाकडी हात कधी आले नव्हते. सुरुवातीलाच गेल्यागेल्या केळकर म्युझियम ची आठवण येते
इमेज
*पूर्णांनाची भोगी*                    महाराष्ट्र ओरिसा या दोन राज्यांमध्ये अदानप्रदान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र संघाबरोबर १९९६ साली भुवनेश्वरला गेलो होतो. या उपक्रमाअंतर्गत कटक, गोपाळपुरा, बेहरामपुर विद्यापीठ,  कोणार्क अशा ठिकाणी भेटीला गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्यातील एक एक जण त्यांच्यातील शिक्षकांच्या घरी राहणार  होता. मी ज्या महापात्रो  सरांकडे त्यांच्या गावाच्या घरी राहिलो होतो ते घर म्हणजे  सारवलेले नीटनेटके. संध्याकाळच्या जेवणात हातसडीच्या तांदळाचा भात व पूर्णांनाची भाजी असा बेत होता. पूर्णांन म्हणजे काय असे विचारल्यानंतर खूप सगळ्या भाज्या एकत्र करून गाडग्यामध्ये  गाळ होईपर्यंत शीजवल्या जातात. खोलात जाऊन विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे आजही गरिबाघरच्या घरचं खाणं मानलं जातं. श्रीमंत लोक याला कदान्न म्हणतात. पूर्णान्न हा आपल्या भोगीच्या भाजीशी साधर्म्य साधणारा पदार्थ.           परवा राजस्थानच्या एका मित्राने मला अशीच एक भाजी आणून दिली ती भाजी देताना हळदीची भाजी म्हणाला, ही भाजी करताना ओली हळद किसून उपलब्ध असलेल्या सर्व भाज्या एकत्र करून बरोबर शिजवल्या जातात साजूक तुपाती
इमेज
*रुमालगुच्छ* १ जानेवारीला सोलापूर विद्यापीठाचे प्रथम प्रकुलगुरू डॉ. एस् आय. पाटील अर्थात शंकर पाटील यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त सोलापूर विद्यापीठात जाण्याचा योग आला. तसा मी सोलापूर विद्यापीठात अनेकदा गेलेलो होतो. तथापि आज एक वेगळेच बघायला मिळाले ते म्हणजे, अनेक विभागातील लोकांनी, प्राचार्य, प्राध्यापक, किंवा इतर संघटनांनी माननीय कुलगुरूंचा जो सत्कार केला तो म्हणजे नॅपकिन बुके अर्थात *रुमाल गुच्छ* देऊन, नानाविध रंगाची, नजाकतीने आणि अतिशय सुबक पद्धतीने त्याची केलेली बांधणी, दिसायला अगदी पुष्पगुच्छासारखे दिसणारे हे रुमाल.    सोलापूर हे हातमाग, कपडे, चादरी यासाठी जगप्रसिद्ध.                सहज मनात विचार आला मागील काही वर्षांपासून आपण खूप ठिकाणी पाहुणा म्हणून वावरतो. लोक पुष्पगुच्छ देतात, तासाभराचे काम असते नंतर तो फेकून द्यावा लागतो.  वास्तविक पुष्पगुच्छ किती मोठा द्यावा याचीसुद्धा अहमहमिका लागलेली असते, विचारपीठावर लोकांच्या वीस पंचवीस जणांच्या घोळक्याला एकत्र गुंफणारा हार घालण्याच्या प्रथा आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. पुढे या गोष्टीच काय होतं. स्मृतिचिन्ह देण्याचं तर पेवचं
इमेज
*ज्ञानाई* बयो सावित्री आमची मोठ्याई, तूच खरी ज्ञानाई, तुझी महती सांगताना तुला अडकवतात शेण्या, साडी, यातच गोष्टीरूप, पण तुझं महत्तम कार्य कळण्यासाठी, केवळ तसबिरित्  न अडकवता काव्य फुलांच पूजन झाले पाहिजे, त्याची गाणी झाली पाहिजेत, ती ओठी सहजी गायली गेली पाहिजेत, सुबोध रत्नाकराचे पवाडे गायले पाहिजेत सहजी ओठी गुणगुण ले पाहिजेत, हे माते हे माई हे कवियित्री, हे ज्ञानाई , तू नसतीस तर ???????? आज, कन्या शिकल्या असत्या का? पंतप्रधान ते राष्ट्रपती संशोधक ते अंतराळ पायलट ते डॉकटर झाल्या असत्या का? तुला मूर्तीत अडकवनारे, तुझे पुतळे उभे करत पूजा बांधून कर्मकांडात अडकनारे आम्ही , करंटे तर नाही ना? तुझ्या ज्ञानपिपासू वृत्तीपासुन, दूर तर जात नाही ना? बयो तुला समजून घ्यायला काही तपं लागतील' पण तुला समजुन घ्यावचं लागेल ' माते सावित्री ' तुझ्या विचाराना पुढ न्यावेच लागेल . आम्ही ते नेणारच. विनम्र अभिवादन . *संजय चाकणे* *ज्ञानसुत* 10 मार्च 2020