पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*अक्षाताविना लग्न*    इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मुलाचे व गोकुळशेठ शहा यांच्या नातवाचे अर्थात निनाद - पूर्वा चे आज लग्न झाले. अदमासे २५ ते ३० हजार वऱ्हाडी पै पाहुणे, मान्यवर, शैक्षणिक, सामाजिक, व्यापार, नोकरी उद्योग क्षेत्रातील👥👥 मंडळी उपस्थित होती. या लग्नात काही ठळक गोष्टी होत्या एक म्हणजे जेवणासाठी आदल्या दिवशी जवळपास ३०००० लोकांना एका हॉल मध्ये उत्तम नियोजनाने सुग्रास भोजन 🍋🍌🥮🍥🍛🍲🥪🥙🍜🍝दिले गेले . मंडपात कुठेही भपकेबाजी नव्हती. फटाक्यांची आतिषबाजी💥 नावापुरतीच. लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाला वरबाप व वरमाय आवर्जून एक पिशवी 🛍देत होते ज्यात एक त्यांच्या स्वत:च्या नर्सरीत तयार केलेले देशी वानाच्या🌴 झाडाचे 🥦 रोप,🌵🌱 व पाण्याची बाटली 🍶होती.         लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली. अक्षता🍚 अजून कशा आल्या नाही? अक्षता पोचल्या का ? असा काकांचा👳🏻 आवाज🗣 नाही! की ओरडा नाही!. घटिका🕣 तर जवळ आलेली. लोक एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हढ्यात सूत्रसंचालन🎤 करणाऱ्याने जाहीर केले की या वर व वधू पक्षांकडील कुटुंबीयांनी ठरवल्या मुळे *अक्षता दिल्याने
इमेज
माझी गडगिरी भाग २२ *प्रतापगडाचा पारदर्शी शाळीग्राम*            महाबळेश्वर_ पाचगणीला जायचे म्हणजे प्रतापगड  हे अत्यंत आवडीचे माझे ठिकाण. प्रतापगडावर तसा मी अनेकदा गेलो. कधी कुटुंबाबरोबर, कधी मित्रांबरोबर तर कधी सहलिंमधून मुलांबरोबर गड फिरून दाखवणे हा माझा आवडीचा भाग. पूर्वी अफजलखानाच्या कबरीपासून अर्थात शिवप्रतापाची अत्यंत उत्सुकता आणणारा, शिवरायांनी शामियानात खानाची भेट घेतली ती जागा.           गड चढायला सुरुवात करण्यापूर्वी डाव्या बाजूची गुहा पाहणे गडाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात करायची, आजही  उत्तमावस्थेत असलेला दरवाजा ते या गडाचे वैशिष्ट्य आहे.     शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा गडाचे दरवाजे सूर्योदयाला उघडतात व सूर्यास्तानंतर बंद होतात दरवाजाची आगळ आजही उत्तम अवस्थेत आहे. दरवाजातून आत आलं की ओवऱ्यावर तोफा ठेवलेल्या दिसतात. थोड्या पायर्‍या चढून झालं की माणूस संभ्रमात पडतो उजवीकडे जावं की डावीकडे. उजव्या बाजूचा भगवा झेंडा डोलाने फडकत असल्यामुळे आपली पाऊले आपसूक भगव्याकडे वळतात. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचे कव्हर म्हणजे या चिलखती बु
माझी गडगिरी भाग 21 रायांचा गड रायगड मला जर कोणी विचारले, तुमचा आवडता गड / किल्ला कुठला तर माझ्या ओठी पटकन नांव येते ते रायगडाचे. होय स्वत: छञपतींनी त्यांच्या देखरेखीखाली हिरोजी इंदुलकरांकरवी बांधून घेतलेला. पूर्वीचा रायरी म्हणजेच रायरीचा डोंगर.रायगड वैशिष्टये म्हणजेच समुद्र व जमिनीवर गनिमांवर नजर ठेऊ शकणारा आहे. खूप पूर्वी राजगड ते रायगड असा दुरचा रात्र दिवसाचा क ट्रेक कला होता. पाचाड वरुन पायरीमार्गे महाव्दारावरुन खूपदा गड सर केला होता. परंतु रोप वे वरुन पहिल्यांदाच जात होतो. रायगड हा अत्यंत महत्वाचा किल्ला . रोपवेत बसल्यावर नजर जशी गडावर, डोंगर रांगांवर खिळून रहाते तशी ती खाली पाहिल्यावर गरगरते सुध्दा स्विझ्रलंडमधील रोप वे मध्ये दावोस ला बसलो होतो.त्यामुळे अनुभव होताच. इतर उंच किल्ल्यांच्या मानाने कमी चढीच्या उंचीचा अर्थात अंदाजे 2800 फूट आहे. पाचाडमार्गे त्याला पाय-यांच्या बाजूने गेलेतर 1400 ते 1500 पाय-या चढावे लागतात. यावेळी आम्ही रोप वे मार्गे गेलो होतो. येताना पाय-यांवरुन येऊन पाचाडचा जिजाऊ साहेबांचा वाडा बघायचे व परत यायचे असे नियोजन होते. रोप वे ने गेल्यानंतर जातान
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः । अथ ध्यानम्‌: ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ । वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचंद्रम । चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ । स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥ रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥ कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥ जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः । स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥ करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥ सु
*माझी गुढी*.  माझी गुढी माझच राज्य, माझ्या पसाऱ्याचा मीच राजा मीच छत्रपतीं या शिवाराचा असतील तुमचे उंचउंच झेंडे रंगही नानाविध वा करडेबांडे माझी गुढी माझाच रंग असेल वाङ्गळा काळा सावळा माझी गुढी माझाच मळा माझंच पाणी माझ्याच आवारात नाही कुणाच्या बाला देणार माझी पंचक्रोशी माझा विकास माझी गुढी माझ्याच शेतास असतील तुमचे नाना पक्ष शेतात राबतो मी तो दक्ष माझच रान माझेच पक्षी दाणे दाणे टिपती वनात माझी गुढी माझ्याच रानात माझी गुढी माझेच राज्य जमिनीतला अंकुर झाडाची पालवी लवलवणरी पाती किती रंगसंगती याच अमुच्या गुढया हिच तोरणे निर्सगाची हिरवी पिवळी गुलाबी पाने लाल, शेंदरी, जांभळी फुले वसंतात आसमंत फुललेले याच गुढया हिच तोरणे शेतातला कोंभ भाजलेली माती तप्त शिवार मुद गंध हेच अत्तर आमुच्या गुढीचे *गुढीपाडवाच्या शुभेच्छा* *संजय चाकणे* *ज्ञानसुत*
इमेज
माझी गडगिरी भाग 20 जयतु  जयगड           कोकणांत फिरतांना अनेक समुद्री  दुर्ग  पाहता येतात  अगदी, अर्नाळा,  कर्नाळा,  जंजिरा,  सिंधुदुर्ग, (मालवणचा किल्ला) विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग  हे सर्व जलदुर्ग प्रकारातले पण समुद्राच्या काठावर  असणारा जयगड हा अत्यंत दुर्मिळ  व वेगळ्या धारणीचा किल्ला  अंदाजे  दहा एकराच्या  या किल्ल्याचे बुरुज आजही सुस्थितीत आहेत.           तिन्ही बाजूनी असलेला समुद्र व शास्त्री नदीच्या खाडीमध्ये बेचक्यात तयार झालेल्या पठारावर वसलेला हा भुईकोट किल्ला, समुद्रातून कोणी पाहिले तर जलदुर्ग वाटावा. रत्नागिरी अर्थात पुढे पुळ्याच्या गणपती वरून माडगूळला केशवसुतांच्या स्मारकास भेट देऊन विशेषता स्टील फ्रेम मधला 'एक तुतारी द्या मज आणून  फुंकीन मी ती स्वप्राणाने' च्या अविर्भावातला पुतळा. केशवसुतांच्या साऱ्या कविता रेखीव  पूने  पणे  लिहिलेल्या. लहानपणी पाठ असलेल्या  वाचत, गुणगुणत पुढे जावे तर शेजारच्या दालनात सुसज्ज ग्रंथालय व प्रथितयश कवींच्या मराठमोळ्या, रांगड्या, नवकविता, दुर्बोध आडवळणाच्या अनघड कविता वाचून साहित्यिक मन असणाऱ्यांना मनस्वी आनंद होतो, खरे र