पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
*वारी ते वारी*......... .............२००४ ते २०१९           श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती.           यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही  विचार करू लागलो होतो.                कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री.  भिकनराव भुजबळ यांच्याकडे गेलो होतो. गप्पांच्या ओघात ते कसे दिंडीला जाणार आहेत?, दिंडी मध्ये
इमेज
*भीमाशंकर ते भीमाशंकर*                    राष्ट्रीय सेवा योजनेचा मी कार्यक्रम समन्वयक झालो ती 2003 सालातली गोष्ट. काहीतरी मोठे काम उभे करायचे हा सर्वसामान्य सद्हेतू मनात ठेवून काम सुरु केले. डॉ. विवेक सावंत (MKCL) यांनी श्री श्री वसंत टाकळकरांची भेट घडवून आणली आणि सलग समपातळी चर, पाणीप्रश्न, जलव्यवस्थापन, जलसाक्षरता, पर्जन्य त्यांचे मोजमाप, अगदी थेंबा थेंबा चा हिशोब असे विषय रुंजी घालू लागले. डॉ. अशोक कोळसकर हे अत्यंत द्रष्टे कुलगुुरु कायम नव दृष्टी देणारे, काम करून घेणारे, सलग समपातळी चर  हा अत्यंत तांत्रिक प्रयोग रुजवायचा म्हणजे मोठी मेहनत - ताकत पणाला लागणार होती.  तत्पूर्वी वसंत टाकळकर स्वतःला जंगली माणूस म्हणायचे रोज चर्चेच्या फैरी झडत होत्या. शेवटी मला एक उपाय सुचला तो म्हणजे सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांना 5 दिवस एकत्र करून ट्रेनिंग द्यायचं विद्यापीठात एवढ्या लोकांना जागा मिळणार नाही म्हटल्यावर सप्तशृंगी गड, भीमाशंकर, बहाई इ अकॅडमी, अगदी बालेवाडी सह बऱ्याच नावांचा विचार झाला. घोडेगावला सन्मित्र डॉ. इंद्रजीत जाधव प्राचार्य होते. त्यांना फोन केला आणि ते लगेच हो म्
इमेज
* चार दशकानंतर गुरुजींची भेट *        मे महिन्याच्या सुट्टीमध्ये फेसबुकच्या भिंतीवर एक  कविता झळकली. कविता वाचत असताना ती अत्यंत ओळखीची व जवळची वाटली. मी गुणगुणत एका दमात वाचून काढली लहानपणी ही कविता खूपदा तालासुरात गायली असे वाटत गेले. कवितेच्या शेवटी कवीचे नाव होते *कविवर्य उत्तम कोळगावकर* कविता संग्रह *छप्पापाणी* ती कविता म्हणजे गजबपूरचा अजब राजा त्याने केली काय मजा लोकांना म्हणाला, "नाचा खूप बसू नका कोणी चूप नाचता नाचता गाणं गा गाता गाता पेढे खा पेढे खाऊन हसा हसा खुशीत सगळे दिसा दिसा!" अजब राजाची गजब बात त्याने केले कायदे सात त्यातला होता एक असा प्रत्येकाने पाळावा ससा!           पुन्हा एकदा गुणगुणत कविता म्हटली लगेच शेअर केली. हे करत असताना मन चाळीस वर्ष मागे गेलं 1979 - 80 साली वडिलांची बदली जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव वरून धरणगावला झाली. त्यावेळी मी आठवीत होतो इंग्रजीच्या पहिल्या तासाला काहीच कळत नव्हतं. याचं कारण रिंगणगाव ला असताना पाचवी ते सातवी आम्हाला इंग्रजी नव्हतं. याचे कारण म्हणजे, शिकवायला कोणी नव्हतं. रिंगणगाव ला आठवीत पहिल