पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 एका टक्क्यांच काय करायचं?         सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले  असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात.           गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच?      वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं,  पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत.         मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो.         थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंबून राहतं.         समाजातही असेच असेल का ? समाजात ५ टक्के लोक सच्चे असतील, तर ५ टक्के लुच्चे असावेत, उरलेल्या ९०
*लहानपणचा दिवाळसण* लहाणपणचा दिवाळसण लहानपणी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला किंवा आमच्या मूळच्या गावी चांडगावला  जाताना कोण आनंद असायचा. दिवाळीच्या आधी तीन-चार दिवस जळगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने श्रीगोंदा स्टेशनला उतरायचं. तो रात्री आणि दिवसभराचा प्रवास, श्रीगोंदा स्टेशनला मामा घ्यायला येई, किंवा आजोबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो ते बैलगाडीने यायचे आणि बैलगाडीने बाबुर्डी ला अर्थात बोरुडे वाडीला वाडीला जायचं, दिवाळीची सुरुवात मोठ्या दिमाखात व्हायची सर्व सात  मावश्या त्यांची मुलं, आजी आजोबा मामा मामी असा मोठा गोतावळा तयार व्हायचा, तसंच काहीसं चांडगाव ला व्हयचं मोठे चुलते आम्ही ज्याना दादा म्हणायचो, अण्णा, आप्पा, त्यांची मुलं सगळी चुलत भावंडे सगळा मेळ जमायचा. वसुबारसेला मामांच्या अर्थात आजोबांच्या घरी धमाल असायची. त्यांच्या त्या काळ्या करड्या पांड्या पांढऱ्या कृष्णधवल अशा गावरान गाई. मेंढ्या. शेळ्या मोठा बारदाना होता. हे सगळं वसुबारसेला खूप मजा करण्यासाठी असायचं. अण्णा मोठ्या आवाजात अर्थात खरडया पट्ट्यात खालील गाणे म्हणायचे आम्ही त्यांच्या मागे सर्व नातवंड लयीत गायचो
इमेज
हे राम , हे महात्मा, गांधी मनामनातला आजही जिवंत आहे, गांधी शिक्षण धोरणातला, गांधी स्वच्छ अभियानातला, गांधी टोपीतला, खादीतला, शेळीच्या दुधाचा, सत्याच्या प्रयोगातला, गोलमेज, पुणे करारातला, खेड्यातला, गांधी पंचक्रोशीचा गांधी साध्या रहाणीचा सत्याग्रहाचा, चले जाव चा, करके तो देखो म्हणणारा, तू गांधी विज्ञानातील गांधी अंशाअंशाने कणा कणाने आजही टिकून आहे,. मनात गांधी असला की अहिंसा सांगावी लागणार नाही, हे महात्मा तुझ्यावर, आज सहज विनोद करतात, तुझ्या अर्ध नग्नतेवरून तुझ्या उपासावरून, मजबुरीवरून, तर काठीही सुटत नाही अपवाद नाही तुझे केसरहित डोके, कारण,  तू आजही मनांत खोलवर रुजलायस, पुन्हा नव्या अंकुरानी क्षणोक्षणी कोंभारुन येतोस, थोरले झाड होऊन कोलमोडतोस पण, अब्जावधी बिजांकुरांनी, पुनः उभारी घेतोस, तू महा आत्मा आहेस हे वारंवार सिद्ध करतोस, आज दिडशे वर्षांचा तरुण झालास तू नाही बुढ्ढा होणार, जगाच्या विनाशापर्यंत, तू तेजाने तळपत राहणार, तू अवतारी होतास की नाही माहीत नाहीस पण सामान्यांच्या मनातला देव आहेस तुझी तालीम नव्याने मांडतील नयी तालीम