पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
आज विज्ञान दिन ....... सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस. आकाश निळ का दिसत, ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान, विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे.बालवाडी पासून सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक याच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल       दहावी नंतर प्रत्येक पालकाला वाटंत आपला पाल्य अकरावी सायन्स ला जावा. बारावी नंतर FYBSc ला प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढली आहे कदाचित कुठेच प्रवेश  मिळाला नाही कीं वा Engineering/ DEd ची क्रेझ कमी झाली असेही असेल.     FYBSc  चा मागचा काही वर्षांचा निकाल पाहिला तर 50% च्या वर जात नाही , हो with ATKT, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात आम्ही कमी तर पडत नाही ना?      प्रश्नाच्या मुळाशी जाण? मुळात प्रश्न विचारू देणं? Theory पेक्षा practical वर भर देणं कारण मीमांसा करण कार्यकारण भाव असणं,  कमी पडतंय का, European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा, रिसर्च बेस्ट पेडागोजी, अर्थात संशोधनाधिष्टीत शिक्षण पद्धती आपल्याला अमलातच नव्हे तर अवलंबावी लागेलच , लहानपणापासून म्हणजेच
*माझ्या मऱ्हाठीचा जागर*               हल्ली लोक वाचत नाही असा काहीसा सुर काढला जातो. एक प्रयोग म्हणून मी 6000 लोकांना सध्या आपण काय वाचताय या विषयी लिहले. मी सध्या *रिच डॅड पुवर डॅड* हे पुस्तक वाचून पुर्ण केल्याने त्याचा उल्लेख केला होता. प्रतिक्रीयामध्ये जेव्हा 2500 पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, तेव्हा असं वाटलं की, लोक वाचतायेत. नुसतं वाचत नाहीत तर, भरभरुन वाचतायेत. विशेष म्हणजे मराठी साहित्यावर खुप भर आहे. आज जागतिक मराठी दिनानिमित्त सर्वेक्षणाचा उहापोह करणे प्रस्तुत वाटते. वाचणाऱ्यांमध्ये सर्व स्तरातील लोक आहेत. याचे विशेष कवतीक वाटते ते म्हणजे तरुण पिढी वाचते आहे याचे. तसेच जी पुस्तकं वाचली जातात त्यात ऐतिहासीक, चरित्रात्मक, यशस्वीतेचा मंत्र देणारी अशी अनेक पुस्तके वाचतो आहोत. असे रिप्लाय मिळाले.       त्यात स्वामी, मृत्युंजय, श्रीमानयोगी, छावा, आईनस्टाईन, माझी जन्मठेप, एडवीना ते नेहरु, नेपोलियन, अग्निपंख, हिंदु एक जगण्याची अडगळ, बुध्द आणि त्याचा  धम्म, समग्र फुले, बाबूराव अर्नाळकरांच्या कथा, काजळमाया ' पार्टनर, श्री, ती व तो, अमृतवेल, ययाती, रियासत इतपासून ते
*तानाजी द अनसंग वॉरियर्*         पहायलाच हवा, फार आधी छोटा चेतन पाहिला होता, तो आपल्याकडचा पहिला थ्रीडी चित्रपट. तानाजी हा फारच उत्तम चित्रित केलेला, सुरुवात होते तीच मुळात कुठूनसा एक बाण सरळ आपल्या डोळ्यात येतो. स्थिर-स्थावर न झालेले लोक घाबरून जातात नकळत चित्कारतात, सस्स चे फूत्कार चित्रपट गृहात बाहेर पडतात. उमरठच्या परिसरातून आपण राजगडावर तर कधी आग्राच्या लाल महालात नंतर शिरढोण व थोड्याच वेळात कोंढाण्यावर येतो तत्पूर्वी पुरंदरच्या तहात परत दिलेल्या किल्ल्यांचा उल्लेख होतो.            एकदाचे कोंढाण्यावर आपण जातो. नागिन नावाची तोफ कोंढाण्यावर आणला जाणारा, खटाटोप, छत्रपती शिवाजी महाराजांची कोंढाणा  परत आऊसाहेबांच्या इच्छेखातर घेण्याची घालमेल.           चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे, पण छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा.  त्याची काही कारणे म्हणजे तानाजींची एन्ट्री होते त्याच वेळी शिवगर्जना सुरू होतात. एखादा मावळा जोरात घोषणा देतो. काजोल ने केलेले मराठमोळ रुपड, नथ नऊवारी सह तिचं काम उत्तमच, अजय देवगन ची मेहनत तर अफलातून, शेलार मामा, जिजाऊ आऊसाहेब, छत्