ज्ञानाई*

बयो सावित्री
आमची मोठ्याई,
तूच खरी ज्ञानाई,

तुझी महती
सांगताना
तुला अडकवतात
शेण्या, साडी, यातच गोष्टीरूप,

पण तुझं महत्तम कार्य
कळण्यासाठी,
केवळ तसबिरित्  न अडकवता
काव्य फुलांच पूजन झाले पाहिजे,
त्याची गाणी झाली पाहिजेत,
ती ओठी सहजी गायली गेली पाहिजेत,

सुबोध रत्नाकराचे पवाडे गायले पाहिजेत
सहजी ओठी गुणगुण ले पाहिजेत,

हे माते
हे माई
हे कवियित्री,
हे ज्ञानाई ,
तू नसतीस तर
????????
आज,
कन्या शिकल्या असत्या का?
पंतप्रधान ते राष्ट्रपती
संशोधक ते अंतराळ
पायलट ते डॉकटर झाल्या असत्या का?

तुला मूर्तीत अडकवनारे,
तुझे पुतळे उभे करत
पूजा बांधून कर्मकांडात
अडकनारे आम्ही ,
करंटे तर नाही ना?

तुझ्या ज्ञानपिपासू वृत्तीपासुन,
दूर तर जात नाही ना?

बयो तुला समजून घ्यायला काही तपं लागतील'
पण
तुला समजुन घ्यावचं लागेल '
माते सावित्री '
तुझ्या विचाराना पुढ न्यावेच लागेल .
आम्ही ते नेणारच.
विनम्र अभिवादन .

*संजय चाकणे*
*ज्ञानसुत*
10 मार्च 2020

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट