* एका टक्क्यांच काय करायचं?*


        सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले  असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात.
          गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच?      वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं,  पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत.

        मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो.

        थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंबून राहतं.

        समाजातही असेच असेल का ? समाजात ५ टक्के लोक सच्चे असतील, तर ५ टक्के लुच्चे असावेत, उरलेल्या ९० टक्यांना कच्चे म्हणूयात. सच्च्यांच प्रमाण १ टक्कयांनी वाढले की समाज सच्चा व्हायला लागेल. पण लुच्च्यांच प्रमाण १ टक्यांनी वाढल तर मात्र कच्चे सगळे लुच्चे व्हायला लागतील.
       चला तर सच्च्यांची संख्या फक्त १ टक्क्यांनी वाढवूया समाज सच्चा करूया.


पण,
 बरे झाले बा कोरोना तू हे रूप धारण करून आलास,
 तुझे स्वागत करावे असेच वाटते,
नाही तरी, या भूतलावरचे आम्ही जरा बावचळलोच होतो,
थांबायचे म्हणून नाव घेत नव्हतो,
निसर्ग सुद्धा सांगत होता,
अरे बापहो, थांबा ! प्रदूषण थांबवा,
पण ऐकतो कोण?
 पृथ्वीसुद्धा ओरडून सांगत होती! इशारा देत होती!
 कधी भूकंप घडवून ,
कधी नानाविध प्रकारच्या आपत्ती ओढवून,
 चक्रीवादळ व पूर,
विजांचा कडकडाट,
 डोंगरदऱ्यांच्या गडगडाटी
नानाविध ,
पण ऐकतो कोण ?
पण लक्षात कोण घेतो?
Plastic cha महाराक्षस
विषाणूंचा होणारा दरवेळी वेगळा मारा
*बाबा रे आमची रोजची धावपळ थांबवलीस*
मुळात आम्ही का पळतोय? हेच आम्ही विसरलोय,
जागेवर आणलेस ते बरे केलेस.
होय आम्ही एक दिवस पूर्ण घरातच थांबू.
नाही गर्दी करणार!
थांब बाबा आम्ही आता आयुष्यभर स्वच्छता पाळू!
नाही थुंकणार!
नाही शौचाला बाहेर जाणार !

 *संजय चाकणे*
      *ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट