माझी गुढी

माझी गुढी
माझच राज्य,
माझ्या पसाऱ्याचा मीच राजा
मीच छत्रपतीं या शिवाराचा

असतील तुमचे उंचउंच झेंडे
रंगही नानाविध वा करडेबांडे
माझी गुढी माझाच रंग
असेल वाङ्गळा काळा सावळा
माझी गुढी माझाच मळा



माझंच पाणी
माझ्याच आवारात
नाही कुणाच्या बाला देणार
माझी पंचक्रोशी
माझा विकास
माझी गुढी माझ्याच शेतास

असतील तुमचे नाना पक्ष
शेतात राबतो मी तो दक्ष
माझच रान माझेच पक्षी
दाणे दाणे टिपती वनात
माझी गुढी माझ्याच रानात

माझी गुढी
माझेच राज्य
जमिनीतला अंकुर
झाडाची पालवी
लवलवणरी पाती
किती रंगसंगती
याच अमुच्या गुढया
हिच तोरणे निर्सगाची
हिरवी पिवळी गुलाबी पाने
लाल, शेंदरी, जांभळी फुले
वसंतात आसमंत फुललेले
याच गुढया हिच तोरणे
शेतातला कोंभ
भाजलेली माती
तप्त शिवार
मुद गंध
हेच अत्तर
आमुच्या गुढीचे

*गुढीपाडवाच्या शुभेच्छा*

*संजय चाकणे*
*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट