*रंग मनीचे गुज निसर्गाचे*


       आज इंदापूरहून पुण्याला येतांना रंगानी फासलेली,
 चेहरा हरवलेले युवक युवती बघत आलो,
मागे सातारा -कास-बामणोली -प्रतापगड केल्याने  रंगांची
त्या निर्मिकाने मुक्त हस्ते  केलेली उधळण डोळ्यात साठवली होती. शाल्मलीचा अर्थात काटे सावरीचा नितळ तांबुस,
पळसाचा गर्द शेंदरी,


 निलमोहोराचा नाजुक निळा, कोयनेच्या जलसाठयाचा निळसर , सुर्योदयाचा मोहक गुलाबी तांबुस, बेटावरच्या रात्रीचा काळकभिन्न ,  पौर्णिमेच्या चंद्राचा मोहक पिवला, सह्याद्रीच्या हिरव्या पोपटी  नाना छटा ,
 प्रतापगडाचा उंच आकाशी फडफडणारा भगवा,
भवानी मातेच्या मंदिरातल्या शाळीग्रामाचा पांढरसा धवल,
 मातेच्या गंडगी शिळेच्या मुर्तीचा  कृष्ण रंग,
किती रंगांची मिजासखोरी,

रंगपंचमीला राधाकृष्णाची आठवण हमखास येते.
राधा हे कृष्णाचे स्त्रैण रूप असावं.

 मनातल्या रंगाच्या उधळणीला उधाण देण्यांच जमलं पाहिजे.
किती मोहक,
 कल्पक रंग मनाचे,
ठाव लागणार नाही इतुके,
नवपिढी भडकलीय ती कर्मकांडात,
 एकमेकांना रंग फासण्यात,
रंगमनीचे कुणी समजुनच घेत नाही. रंगांना जातीची बिरूदं लावल्यापासुन तर फारच घोळ झालायं,

चला मनाच्या रंगांत न्हावून जाऊ या . होलीकोत्सव, धुलवड व रंगपंचमीच्या शुभेच्छा

*संजय चाकणे*
ज्ञानसुत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट