*Adjustment जगण्याची* 


           माणूस मेला की त्याची बॉडी होते बॉडी आली का? घाई करा  फुगेल, फुटेल, आंघोळ घाला उरका, सगळ्या adjustment मैताच्या वेळेस बघायला मिळतात, जसे नवा कपडा नाही, आरं चालतंय धडुक आण, साजूक तूप नाही ok डालडा तोही नाही रॉकेल चालत, चंदन कसलं मिळतंय कसलीही लाकडं चालतात तीही मिळाली नाही तर नुसत्या गोवऱ्यात भागवता येत, गुजरात भूकंपानंतर टायर मध्ये प्रेत जाळली होती आम्ही, हा तर ऍडजस्ट चा कळस ठरावा, सोन्याचा मणी नाही घशात घालायला विडयाच पान चालत नसल्यास तुळशीचं पान आहेच की इथे सगळ्याला पर्याय उपलब्ध असतात, कारण मेलेल्याची आकड नसते आधीच त्याची आकडी वळलेली असते,
  हे सगळं माहीत असूनही जिवंतपणी आपण मला असाच लागत अगदी ताटात लिंबू फोड इकडं तिकडं झालेली चालत नाही, change is the only constant  thing in life  पण system रन होताना थोडाही बदल सहन करायचा नाही अगदि चाकोरीत झापड लावूनच जगायचं,
   माणूस मेला की नाही हे चेक करण्याच्या पद्धती नव्हत्या त्या काळात, बघा गंमत येईल वाचताना
प्रेताला आंघोळ गरम पाण्याने घालायची त्यात वीसन नको
चटके बसल्यावर उठून बसला तर बसला
तोंडात मणी सरकवायचा पडजीभ श्वास नालिकेवर अडलेली असेल तर झाला मोकळा श्वास तर झाला
तिरडीवर करकचून बांधायचं, काचल्यामुळे उठला तर ठीकच,
विसव्याच्या ठिकाणी खांदेकरी बदलायचे प्रत्येकाने खरच मेलाय म्हणून चेक करायचे confirmation म्हणून एक दगड तिथं टाकायचा,
प्रेत सरणावर ठेवल्यावर प्रत्येकाने पाणी तोंडात घालून पुन्हा एकदा confirm करायचे खरच मेलाय म्हणून,
     सरण रचताना काळजी घ्यायची, अग्निडाग देताना धग , चटका आच लागल्याने झटका बसून उठून बसला तर विझवण्यासाठी मडक्यात पाणी घेऊन माणूस तयार ठेवायचा
   आता माणूस मेलाय हे ecg ची line सरळ आली की मेला हे कळत, आता तरी आपण जे करतो ती फक्त कर्मकांड उरलीयत,
   आता प्रेतयात्रा, सरण, विधी हे सगळ event झालाय मेल्याचे दुःख खरच कितीजणांना हा प्रश्न पडावा, स्मशानात शिळोप्याच्या गप्पा, whats up तर हवेच, माणूस जेव्हढा लौकिक अर्थाने मोठा तेव्हढी रडारड कमी होतीय , हाही adjustment चा भाग असावा,
   चला या धकाधकीच्या जीवनात आतापासून छोटया adujusment करू या जस भाजीत  मीठ कमी पडलय ok वानगीदाखल मीठ पुरे
आरडाओरड न करता चिडचिड न करता ऍडजस्ट करायचं
  ताण नाही घ्यायचा मस्तीत जगायचं,-------

 *संजय चाकणे*
*ज्ञानसूत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट