पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*माझी गडगिरी भाग :- ११* *भिमाशंकरची भुतं:-* भिमाशंकर म्हणजे भिमा नदीचे उगमस्थान. वास्तविक हा महादेवाचा डोंगर म्हणून प्रसिध्द. बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिध्द असलेले ठिकाण. त्यामुळे कायम गजबजलेले. *शिवपुराणातील* २० व्या अध्यायात ०१ ते २० श्लोकामध्ये या ज्योतिलिंगाची महती वर्णीली आहे  २१ व्या  अध्यायात श्लोक ०१ ते ५४ मध्ये माहिती आहे. त्याचप्रमाणे *भिमा पुराणात* याच्या पहिल्या ०३ अध्यायात भिमाशंकरचा उल्लेख येतो. एकदा आम्हा मित्रांनी डॉ प्र.के. घाणेकर सरांचे भाषण ऐकले होते. आणि त्यात भिमाशंकरला भुते बघायला मिळतात असे त्यांनी सांगितल्याने १९८७ साली आम्ही भिमाशंकरला भुतं बघायला गेलो. भिमाशंकरला जायला तशा अनेक वाटा त्यातील महत्वाच्या ०२ वाटा एक म्हणजे राजगुरुनगर व वरून भोरगिरी किल्ल्यापासून वर जाता येते, किंवा मंचर वरुन  घोडेगांव मार्गे जाता येते. डॉ. प्र. के. घाणेकर यांच्या कडून एकदा भिमाशंकरच्या भुतांबद्दल ऐकलं होतं. तेच मनात ठेऊन आम्ही १० – १२ जणांनी भिमाशंकरला जाण्याचं ठाण मांडलं. शिवाजीनगर वरुन दुपारच्या एस.टी. ने डिंभे धरणाचा रम्य परिसर न्याहाळत भिमाशंकर गाठले. वन ...