इन्दापुरची माती
*इन्दापुरची माती* इंदापूरच्या मातीत एकदा आलं की इथल्या मातीशी आपसुक नाळ जुळते. नाळ जुळली की प्रेमात रूपांतर होतं. दूरदेशीचा फ्लेमिंगो इथल्या मातीवर, उजनी धरणावर प्रेम करणारा, यांच्या जोड्या प्रेमाची उपमा सार्थ करणाऱ्या. इंदापूरच्या मातीत प्रेम कुणावरही करावं! पळसनाथाच्या मंदिरातील शिलालेखावर करावं, अहिल्यादेवींनी बांधलेल्या पिटकेश्वराच्या बारवेवर करावं, नंदिकेश्वराच्या गळ्यातील घंटीवर करावं ! उजनीच्या विस्तीर्ण जलशयावर करावं! कर्मयोगीवर जसं करावं, तसं दानशूर नाराबाप्पावर करावं. शहीदांच्या स्तंभावर करावं, नेहरू चौकातल्या भाषणांवर करावं , इथल्या भिमथडीच्या वडापांवर करावं, चिलापीवर जसं करावं तसं भांडगावच्या म्हसोबावर करांव रूईच्या बाबीरावर तर करावंच पण चाँदशाहवलीवर पण करावं, पठाणाच्या विहीरीवर कराव, व्यंकटेशावर जसं करावं तसं मालोजीराजांच्या फतेहमंगल गढीवर करावं, मोरोपंत पिंगलेंच्या वाड्यावर करावं, इंदेश्वराच्या शिखरावर करावं, इथून जाणाऱ्या शंभूमहादेवाच्या कावडीवर करावं तसंच जानवर्धन करणाऱ्या माणसांवर करावा. प्रेम ...