
स्वर्णवर्ख रासेयोचा भाग 1 दिल्ली मध्ये19 नोव्हेंबर 2015 रोजी मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय भोसले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार घेत असताना, मागच्या 25 वर्षाचा सगळा आलेख सारीपाटा सारखा सरसर सरकत होता. पुरस्काराची रंगीत तालीम करण्यापासून पुरस्कार घेऊन दिल्लीहून पुणे व परत इंदापूरला येईपर्यंत एकएका प्रसंगात कितीतरी वेळा मिरवत होतो. सगळ्या कडू-गोड आठवणींनी मन सैरभैर झालं होतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात 1990 साली प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्राचार्य के एस पाटील होते, व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ई जे जगताप होते. बाणेर ला रासेयोचे शिबिर होते. आम्ही चौघे सकाळी कॉलेज करून सायकलवर सांगवी ते बाणेर असं डबल सीट जाय चो. मुक्काम करायचा उत्साह असायचा. 1992 लागले व डॉक्टर एस एन पठाण आमचे प्राचार्य झाले. त्यांनी मला कार्यक्रमाधिकारी केले. तसा मी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट. अकरावी ते टीवाय पर्यंत एनसीसी अतिशय उत्साहाने भान विसरू...