
*एका शिक्षकाचे जगणं* आज एका कामानिमित्त तळेगाव दाभाडे ला जाण्याचा योग आला, तसा तळेगाव दाभाडे ला खूपदा गेलो होतो. परंतु माझे प्राध्यापक मित्र बाळासाहेब काळे यांनी प्राध्यापक बोराडे प्रमोद यांच्याविषयी सांगितलं होतं. ज्या कामासाठी गेलो होतो, ते काम सुरू व्हायला वेळ होता म्हणून सहजच प्राध्यापक रोहित लोंढे यांना म्हणालो आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ आणि आम्ही त्यांनी उभारलेली शिवसृष्टी पाहायला गेलो. होय शिवसृष्टी खरा शिवकाळ. एखादा शिक्षक त्याच्या आयुष्यात काय करू शकतो? याचा उत्तम नमुना म्हणजे प्राध्यापक बोराडे. स्वतच्या घराच्याच बंगल्याच्या एका मजल्यावर त्यांनी ही शिवसृष्टी साकारली आहे खऱ्या अर्थाने शिवसृष्टी. शिवकाळातील अनेक वस्तू जशाच्या तशा मिळवलेल्या इथे मांडल्या आहेत. अत्यंत परिश्रमातून कष्टातून मिळवलेल्या या वस्तू. या वस्तू म्हणजे काय ? तर इथे बघायला मिळते, ती म्हणजे लाकडाची वीरगळ, इथे बघायला मिळतो लाकडाचा सतीचा हात. अत्यंत दुर्मिळ माझ्या पाहण्यात अशा पद्धतीच्या लाकडी वीरगळी, लाकडी हात...