
माझी गडगिरी भाग १९ पवित्र पावनखिंड : हिरव कच्च जंगल उन्हाळ्याचे दिवस, विशाळ गडावरून पावनखिंडीकडे जाताना हिरव कच्च जंगल नजरेस पडतं, भर उन्हात गार शीतलता, थंडावा देत. लहानपणापासून पावनखिंडीचे आकर्षण राहिलेल. चौथीच्या पुस्तकातील ते चित्र कायम कोरुन राहिलेलं. मागे विशाळ गडावर तोफांचे बार - खिंडीत बाजी प्रभू मावळ्यांच्या मांडीवर पडून तोफेच्या आवाजाकडे कान देऊन आहेत. हे व मोगलांना अडवणारे पाच-पन्नास मावळे उंच कातळ, प्रपाताचा परिसर हे दुसरे चित्र- तसेच भालजी पेंढारकरांचा तो गाजलेला चित्रपट डोळ्यासमोरून हळूहळू पुढे सरकत होता. शहापूरहून विशाळगड व परत पावन खिंडीकडे जाताना अनेक ठिकाणी पलाश वृक्ष अर्थात पळस फूललेला दिसतो. इंग्रजीत याला खूप सार्थक नाव आहे "जंगलफायर"जंगलात आग लागल्या सारखी दिसते नारंगी रंगाची पोपटाच्या आकाराची ही फुले सहजी लक्ष वेधतात. या भागात पळसाची खूप झाडे आहेत, त्यामुळे सह्याद्रीची उपरांग जागोजागी पेटल्या सारखी दिसते. पुढे पुढे जाताना अतिशय मऊ- मुलायम अशी शाल्मल...