
*भांडगाव म्हसोबा चे तेल* खूप दिवसांनी पुन्हा एकदा मित्राच्या आग्रहाखातर मी भांडगावच्या म्हसोबाला गेलो होतो. वास्तविक भांडगाव हे नॉनव्हेज टुरिझम अर्थात मांसाहारी पर्यटनासाठी पुणे जिल्हयातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत धार्मिक गाव . गेल्या सात वर्षात भांडगावला जाण्याचा माझा हा दुसरा प्रसंग. यावेळी मात्र देवस्थानात जाता आले. खोबरेल तेल जळाल्याचा वास येत होता करवंट किंवा शेंडी जाळल्यानंतर येतो तसा, अर्थात एखादा यज्ञ चालू असावा असे वाटले ,परंतू लक्षात असे आले की मंदीरा शेजारीच लोखंडी बंब ढॅन् ढॅन ' पेटलेले होते आणि त्यातूनच हा वास येत होता पावले आपसूकच तिकडे वळली देवस्थानच्या मंडळींनी कुणीतरी उत्सुकता दाखवतय? म्हणून अतिशय तन्मयतेने प्रकल्प समजावून सांगितला एकंदरीतच सगळ्या देवस्थानांनी आदर्श घ्यावा असा हा प्रकल्प देवाला फोडलेले नारळ एकत्र करूण ते एका ड्रायरमध्ये टाकले जातात मग शेंडी व करवंट्या वेगळ्या केल्या जातात , खोबरे व त्याचे तुकडे क्रशरमध्ये घालू...