
*वारी ते वारी*......... .............२००४ ते २०१९ श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती. यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही विचार करू लागलो होतो. कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री. भ...