*Adjustment जगण्याची* माणूस मेला की त्याची बॉडी होते बॉडी आली का? घाई करा फुगेल, फुटेल, आंघोळ घाला उरका, सगळ्या adjustment मैताच्या वेळेस बघायला मिळतात, जसे नवा कपडा नाही, आरं चालतंय धडुक आण, साजूक तूप नाही ok डालडा तोही नाही रॉकेल चालत, चंदन कसलं मिळतंय कसलीही लाकडं चालतात तीही मिळाली नाही तर नुसत्या गोवऱ्यात भागवता येत, गुजरात भूकंपानंतर टायर मध्ये प्रेत जाळली होती आम्ही, हा तर ऍडजस्ट चा कळस ठरावा, सोन्याचा मणी नाही घशात घालायला विडयाच पान चालत नसल्यास तुळशीचं पान आहेच की इथे सगळ्याला पर्याय उपलब्ध असतात, कारण मेलेल्याची आकड नसते आधीच त्याची आकडी वळलेली असते, हे सगळं माहीत असूनही जिवंतपणी आपण मला असाच लागत अगदी ताटात लिंबू फोड इकडं तिकडं झालेली चालत नाही, change is the only constant thing in life पण system रन होताना थोडाही बदल सहन करायचा नाही अगदि चाकोरीत झापड लावूनच जगायचं, माणूस मेला की नाही हे चेक करण्याच्या पद्धती नव्हत्या त्या काळात, बघा गंमत येईल वाचताना प्रेताला आंघोळ गरम पाण्याने घालायच...
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*परीक्षेला पर्याय काय?* नुकत्याच परीक्षा संपत आल्यात 10 वी व 12 वी च्या परीक्षा पाहिल्या तर वास्तव भयानक आहे, कॉपी चे प्रमाण, करण्याच्या नानाविध पद्धती, पालकांचा दुर्दैवाने सहभाग व शिक्षकांचा सहभाग पाहिला की विषण्णता येते, कॉपी करण्याच्या क्लुपत्यांवर पीएचडी होईल, ओढणीवर नक्षीदार लिहिन्यापासून, शर्टच्या बाह्यांच्या मनगटात शिप्याकडून खास कप्पे शिवणे, भिंतीवर, बेंचवर पॅड वर लिहिणे, हे झालं पारंपारिक, नको तिथे मोबाइल लपवणे, स्मार्ट घडयाळात लिहून आणणे,m c q ला खाणाखुणा करून इशार्याने सांगणे , हे सगळं सृजनात्मक म्हणजे क्रूजनात्मक आहे, 12 वीचा निकाल सहज 90% लागतो , वर्षभर प्रात्यक्षिकाना न बसणारे विद्यार्थी पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा करतात, oral चा नावाखाली गूण वाढवणे एव्हढाच agenda दिसतो, हीच मुलं जेव्हा FY ला प्रवेश घेतात, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना आठवी / नववीत शिकलेल्या बाबी सुद्धा धडपणे सांगता येत नाहीत 8वी पर्यंत नापास न करण्याचा निर्णय योग्यच होता, त्याची अंमल बजावणी मध्ये दोष राहिले, आपण कमी पडलो. इतके दिवस आपण म्हणायचो मुलं परिक्षार्थी होतायेत आता तेही नाही इं...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझी गुढी माझी गुढी माझच राज्य, माझ्या पसाऱ्याचा मीच राजा मीच छत्रपतीं या शिवाराचा असतील तुमचे उंचउंच झेंडे रंगही नानाविध वा करडेबांडे माझी गुढी माझाच रंग असेल वाङ्गळा काळा सावळा माझी गुढी माझाच मळा माझंच पाणी माझ्याच आवारात नाही कुणाच्या बाला देणार माझी पंचक्रोशी माझा विकास माझी गुढी माझ्याच शेतास असतील तुमचे नाना पक्ष शेतात राबतो मी तो दक्ष माझच रान माझेच पक्षी दाणे दाणे टिपती वनात माझी गुढी माझ्याच रानात माझी गुढी माझेच राज्य जमिनीतला अंकुर झाडाची पालवी लवलवणरी पाती किती रंगसंगती याच अमुच्या गुढया हिच तोरणे निर्सगाची हिरवी पिवळी गुलाबी पाने लाल, शेंदरी, जांभळी फुले वसंतात आसमंत फुललेले याच गुढया हिच तोरणे शेतातला कोंभ भाजलेली माती तप्त शिवार मुद गंध हेच अत्तर आमुच्या गुढीचे *गुढीपाडवाच्या शुभेच्छा* *संजय चाकणे* *ज्ञानसुत*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
* एका टक्क्यांच काय करायचं?* सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात. गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच? वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं, पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत. मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो. थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंबून...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*रंग मनीचे गुज निसर्गाचे* आज इंदापूरहून पुण्याला येतांना रंगानी फासलेली, चेहरा हरवलेले युवक युवती बघत आलो, मागे सातारा -कास-बामणोली -प्रतापगड केल्याने रंगांची त्या निर्मिकाने मुक्त हस्ते केलेली उधळण डोळ्यात साठवली होती. शाल्मलीचा अर्थात काटे सावरीचा नितळ तांबुस, पळसाचा गर्द शेंदरी, निलमोहोराचा नाजुक निळा, कोयनेच्या जलसाठयाचा निळसर , सुर्योदयाचा मोहक गुलाबी तांबुस, बेटावरच्या रात्रीचा काळकभिन्न , पौर्णिमेच्या चंद्राचा मोहक पिवला, सह्याद्रीच्या हिरव्या पोपटी नाना छटा , प्रतापगडाचा उंच आकाशी फडफडणारा भगवा, भवानी मातेच्या मंदिरातल्या शाळीग्रामाचा पांढरसा धवल, मातेच्या गंडगी शिळेच्या मुर्तीचा कृष्ण रंग, किती रंगांची मिजासखोरी, रंगपंचमीला राधाकृष्णाची आठवण हमखास येते. राधा हे कृष्णाचे स्त्रैण रूप असावं. मनातल्या रंगाच्या उधळणीला उधाण देण्यांच जमलं पाहिजे. किती मोहक, कल्पक रंग मनाचे, ठाव लागणार नाही इतुके, नवपिढी भडकलीय ती कर्मकांडात, एकमेकांना रंग फासण्यात, रंगमनीचे कुण...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ज्ञानाई* बयो सावित्री आमची मोठ्याई, तूच खरी ज्ञानाई, तुझी महती सांगताना तुला अडकवतात शेण्या, साडी, यातच गोष्टीरूप, पण तुझं महत्तम कार्य कळण्यासाठी, केवळ तसबिरित् न अडकवता काव्य फुलांच पूजन झाले पाहिजे, त्याची गाणी झाली पाहिजेत, ती ओठी सहजी गायली गेली पाहिजेत, सुबोध रत्नाकराचे पवाडे गायले पाहिजेत सहजी ओठी गुणगुण ले पाहिजेत, हे माते हे माई हे कवियित्री, हे ज्ञानाई , तू नसतीस तर ???????? आज, कन्या शिकल्या असत्या का? पंतप्रधान ते राष्ट्रपती संशोधक ते अंतराळ पायलट ते डॉकटर झाल्या असत्या का? तुला मूर्तीत अडकवनारे, तुझे पुतळे उभे करत पूजा बांधून कर्मकांडात अडकनारे आम्ही , करंटे तर नाही ना? तुझ्या ज्ञानपिपासू वृत्तीपासुन, दूर तर जात नाही ना? बयो तुला समजून घ्यायला काही तपं लागतील' पण तुला समजुन घ्यावचं लागेल ' माते सावित्री ' तुझ्या विचाराना पुढ न्यावेच लागेल . आम्ही ते नेणारच. विनम्र अभिवादन . *संजय चाकणे* *ज्ञानसुत* 10 मार्च 2020
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज विज्ञान दिन ....... सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस. आकाश निळ का दिसत, ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान, विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे.बालवाडी पासून सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक याच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल दहावी नंतर प्रत्येक पालकाला वाटंत आपला पाल्य अकरावी सायन्स ला जावा. बारावी नंतर FYBSc ला प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढली आहे कदाचित कुठेच प्रवेश मिळाला नाही कीं वा Engineering/ DEd ची क्रेझ कमी झाली असेही असेल. FYBSc चा मागचा काही वर्षांचा निकाल पाहिला तर 50% च्या वर जात नाही , हो with ATKT, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात आम्ही कमी तर पडत नाही ना? प्रश्नाच्या मुळाशी जाण? मुळात प्रश्न विचारू देणं? Theory पेक्षा practical वर भर देणं कारण मीमांसा करण कार्यकारण भाव असणं, कमी पडतंय का, European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा, रिसर्च बेस्ट पेडागोजी, अर्थात संशोधनाधिष्टीत शिक्षण पद्धती आपल्याला अ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*माझ्या मऱ्हाठीचा जागर* हल्ली लोक वाचत नाही असा काहीसा सुर काढला जातो. एक प्रयोग म्हणून मी 6000 लोकांना सध्या आपण काय वाचताय या विषयी लिहले. मी सध्या *रिच डॅड पुवर डॅड* हे पुस्तक वाचून पुर्ण केल्याने त्याचा उल्लेख केला होता. प्रतिक्रीयामध्ये जेव्हा 2500 पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, तेव्हा असं वाटलं की, लोक वाचतायेत. नुसतं वाचत नाहीत तर, भरभरुन वाचतायेत. विशेष म्हणजे मराठी साहित्यावर खुप भर आहे. आज जागतिक मराठी दिनानिमित्त सर्वेक्षणाचा उहापोह करणे प्रस्तुत वाटते. वाचणाऱ्यांमध्ये सर्व स्तरातील लोक आहेत. याचे विशेष कवतीक वाटते ते म्हणजे तरुण पिढी वाचते आहे याचे. तसेच जी पुस्तकं वाचली जातात त्यात ऐतिहासीक, चरित्रात्मक, यशस्वीतेचा मंत्र देणारी अशी अनेक पुस्तके वाचतो आहोत. असे रिप्लाय मिळाले. त्यात स्वामी, मृत्युंजय, श्रीमानयोगी, छावा, आईनस्टाईन, माझी जन्मठेप, एडवीना ते नेहरु, नेपोलियन, अग्निपंख, हिंदु एक जगण्याची अडगळ, बुध्द आणि त्याचा धम्म, समग्र फुले, बाबूराव अर्नाळकरांच्या कथा, काजळमाया ' पार...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*तानाजी द अनसंग वॉरियर्* पहायलाच हवा, फार आधी छोटा चेतन पाहिला होता, तो आपल्याकडचा पहिला थ्रीडी चित्रपट. तानाजी हा फारच उत्तम चित्रित केलेला, सुरुवात होते तीच मुळात कुठूनसा एक बाण सरळ आपल्या डोळ्यात येतो. स्थिर-स्थावर न झालेले लोक घाबरून जातात नकळत चित्कारतात, सस्स चे फूत्कार चित्रपट गृहात बाहेर पडतात. उमरठच्या परिसरातून आपण राजगडावर तर कधी आग्राच्या लाल महालात नंतर शिरढोण व थोड्याच वेळात कोंढाण्यावर येतो तत्पूर्वी पुरंदरच्या तहात परत दिलेल्या किल्ल्यांचा उल्लेख होतो. एकदाचे कोंढाण्यावर आपण जातो. नागिन नावाची तोफ कोंढाण्यावर आणला जाणारा, खटाटोप, छत्रपती शिवाजी महाराजांची कोंढाणा परत आऊसाहेबांच्या इच्छेखातर घेण्याची घालमेल. चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे, पण छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा. त्याची काही कारणे म्हणजे तानाजींची एन्ट्री होते त्याच वेळी शिवगर्जना सुरू होतात. एखादा मावळा जोरात घोषणा देतो. काजोल ने केलेले मराठमोळ रुपड, नथ नऊवा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एका टक्क्यांच काय करायचं? सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात. गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच? वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं, पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत. मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो. थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंब...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*लहानपणचा दिवाळसण* लहाणपणचा दिवाळसण लहानपणी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला किंवा आमच्या मूळच्या गावी चांडगावला जाताना कोण आनंद असायचा. दिवाळीच्या आधी तीन-चार दिवस जळगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने श्रीगोंदा स्टेशनला उतरायचं. तो रात्री आणि दिवसभराचा प्रवास, श्रीगोंदा स्टेशनला मामा घ्यायला येई, किंवा आजोबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो ते बैलगाडीने यायचे आणि बैलगाडीने बाबुर्डी ला अर्थात बोरुडे वाडीला वाडीला जायचं, दिवाळीची सुरुवात मोठ्या दिमाखात व्हायची सर्व सात मावश्या त्यांची मुलं, आजी आजोबा मामा मामी असा मोठा गोतावळा तयार व्हायचा, तसंच काहीसं चांडगाव ला व्हयचं मोठे चुलते आम्ही ज्याना दादा म्हणायचो, अण्णा, आप्पा, त्यांची मुलं सगळी चुलत भावंडे सगळा मेळ जमायचा. वसुबारसेला मामांच्या अर्थात आजोबांच्या घरी धमाल असायची. त्यांच्या त्या काळ्या करड्या पांड्या पांढऱ्या कृष्णधवल अशा गावरान गाई. मेंढ्या. शेळ्या मोठा बारदाना होता. हे सगळं वसुबारसेला खूप मजा करण्यासाठी असायचं. अण्णा मोठ्या आवाजात अर्थात खरडया पट्ट्यात खालील गाणे म्हणायचे आम्ही त्यांच्या मागे सर्व नातवंड लय...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे राम , हे महात्मा, गांधी मनामनातला आजही जिवंत आहे, गांधी शिक्षण धोरणातला, गांधी स्वच्छ अभियानातला, गांधी टोपीतला, खादीतला, शेळीच्या दुधाचा, सत्याच्या प्रयोगातला, गोलमेज, पुणे करारातला, खेड्यातला, गांधी पंचक्रोशीचा गांधी साध्या रहाणीचा सत्याग्रहाचा, चले जाव चा, करके तो देखो म्हणणारा, तू गांधी विज्ञानातील गांधी अंशाअंशाने कणा कणाने आजही टिकून आहे,. मनात गांधी असला की अहिंसा सांगावी लागणार नाही, हे महात्मा तुझ्यावर, आज सहज विनोद करतात, तुझ्या अर्ध नग्नतेवरून तुझ्या उपासावरून, मजबुरीवरून, तर काठीही सुटत नाही अपवाद नाही तुझे केसरहित डोके, कारण, तू आजही मनांत खोलवर रुजलायस, पुन्हा नव्या अंकुरानी क्षणोक्षणी कोंभारुन येतोस, थोरले झाड होऊन कोलमोडतोस पण, अब्जावधी बिजांकुरांनी, पुनः उभारी घेतोस, तू महा आत्मा आहेस हे वारंवार सिद्ध करतोस, आज दिडशे वर्षांचा तरुण झालास तू नाही बुढ्ढा होणार, जगाच्या विनाशापर्यंत, तू तेजाने तळपत राहणार, तू अवतारी होतास की नाही माहीत नाहीस पण सामान्यांच्या मनातला देव आहेस तुझी तालीम नव्याने मांडतील नयी ता...
जगण्याचा धर्म
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*चौकट राजा चौसष्ट कला* जगण्याचा धर्म ज्याचा त्याचा राजाने राजासारखा राहावे, गरज भासली की एक घर चालावे, उगीच इकडं तिकडं उच्छाद मांडू नये, हत्तीने जड पावली सरळ जावे, उंट चालतील की तिरक्या चाली, प्यादी उत्साहात दोन घर मारतील उड्या , आरंभशूर होऊन, पुढे फक्त एकेक घर चालायाचे, त्यांना कुठे माहितीये पहिला बळी त्यांचाच जाणार आहे, दुडक्या चालीने अडीच घर अश्व धुमाकूळ घालतील, वजीर मारेल बाजी, राजाला वाचावण्या फिरत राहील चौसष्ट घरे, अडवा, तिडवा, सरळ, उभा, मागे, पुढे कितीही घरे, शह देण्यासाठी, मनुष्याने चौसष्ट कला शिकाव्यात म्हणे, कधी राजा बनून , तर कधी प्याद्याच्या भूमिकेत, पण,. .... असं कसं होईल? माणसं फार बेरकी झालीत, राजालाच तोफेच्या तोंडी देतात, उंट अडीच घर चालतोय, घोडे हत्तीच्या पायांनी, तर अश्व तुफान वेगाने वजिराच्या भूमिकेत, सगळो कसा सावळो गोंधळ झालोय, भूमिकेचा धर्म समजायला हवा. प्रत्येकाने तो पाळायला हवा.... *ज्ञानसुत*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जपान: कर्तव्यदक्ष, जागृत, फिनिक्स==== मी पुणे विदयापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणुन नोव्हेंबर महिन्यात 2003 साली रूजू झालो. डॉ. अशोक कोळस्कर कुलगुरू होते. राष्ट्रीय सेवा योजनेने सलग सम पातळी चर व आपत्ती व्यवस्थापनाा या विषयात काही महिन्यात चांगलीच गती घेतली होती. जुन 2004 मध्ये सरांनी मला बोलावून घेतलं आणि "जपानला जाणार का ?", म्हणाले. नाही!, शब्दच माझ्या शब्दकोषात नसल्याने तात्काळ हो ! , म्हणालो. तात्काळ माझी व्हिसा काढण्यापासून तयारी सुरु झाली. वास्तविक ही परिषद जगभरातल्या 40 देशातील 80 कुलगुरूंची आंतरराष्ट्रीय परिषद होती. “ आपत्ती व्यवस्थापणात युवकांचा सहभाग ” असा विषय होता. शोधनिबंध लिहणे, तयारी करणे, जमलं तर थोडेफार जपानी शब्द शिकणे, असा चांगला धावपळीचा मामला होता. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव तसा दांडगाच होता. मी स्वत: 26 जानेवारी 2001 च्या भुकंपानंतर 27 जानेवारीला 150 मुलांसह आपत्ती व्यवस्थापनेच्या कामासाठी टाचणीपासून सॅटेलाईट फोनपर्यंत सतर्कत...
करके तो देखो
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*करके तो देखो* आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना. महात्मा जी 'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते. मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं 'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय. आज ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*करके तो देखो* आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना. महात्मा जी 'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते. मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं 'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय. ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*वारी ते वारी*......... .............२००४ ते २०१९ श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती. यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही विचार करू लागलो होतो. कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री. भ...