*शिरगोळे अर्थात गारगोटी* रांगोळीचे दर्शन आपणा सर्वांना अत्यंत मनमोहक नेत्रसुखकारक असते, हल्ली तर नानाविध प्रकारच्या रांगोळ्या काढ्ल्या जातात. रांगोळीचे वर्ग असतात. त्यात भडक रंग भरले की नजारा आणखी उठावदार, प्रफुल्लीत चित्ताकर्षक होतो. आपण कधी विचार केलाय का ? रांगोळी कशी बनते ? रंग कसे तयार होतात ? वापरले जाणारे रंग बहुतांशी मेटॅलोथॅलोसायनाईडचे बनतात जे विषारी असतात आमच्या लहाणपणी दिवाळीच्या आधी, रानोमाळ हिंडून शिरगोळे / गोटे गोळी करण्याची अहमहमिका लागायची. ते गोळा करायचे, उखळात किंवा बत्त्यात घणाने किंवा दगडाने कुठायचे त्याची जाङ धोतरातून वस्त्र गाळ पुड करायची ' अंगण शेणाने सारवायचे व सुबक रांगोळी रेखाटायची. हळदी, कुंकुं, अबीर, बुक्का, काव जागोजागी पेरायची. असा शिरस्ता ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हे सर्व पडद्याआड गेले नुकतेच सिन्नर जवळील गारगोटी संग्रहालय पाहिले, व खुप हळहळ वाटली की आजपावेतो आपण निसर्गाचा किती ऱ्हास केलाय . प्रत्येक निसर्गसपन्न गारगोटीला केव्हढी किंमत आहे . नानाविध आकाराच्या या गारगोटी पाचू , निलम , पुष्कराज, माणि...
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझी गडगिरी भाग:- 17 पांडे पेडगांवचा धर्मवीर गड - मी तसा मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील चांडगांव या गावचा पेडगांव आमच्यापासून हाकेच्या आंतरावर पण तरीसुध्दा कधी जाणं झालं नव्हतं इंदापूरला आल्यानंतर कधीतरी एकदा या धर्मवीर गडावर अर्थात बहाद्दर गडावर किंवा अर्थात पांडे पेडगांवच्या किल्ल्यावर जाव असं ठरवत होतो परंतु होत नव्हतं. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असं दरवर्षी कुठल्यातरी किल्ल्यावर शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवरीला कुठल्यातरी किल्ल्यावर सायकलने प्रवास करतो. मागच्या वर्षी हा प्रवास बहाद्दुरगड अर्थात पांडे पेडगांवला करायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे इंदापूर ते पांडे पेडगांव हे आंतर 70 कि.मी. पांडे पेडगांव म्हटलं की, पेडगांवचा शहाणा ही म्हण आपल्या लक्षात येते हा वाक्यप्रचार जो पडलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बहाद्दुर खानाला जो चकवा दिला तेव्हापासून पेडगांवचा शहाणा असं संबोधलं जातं. पेडगांवचा धर्मवीर गड हा भिमेच्या काठावर आहे. त्याच्यातील दक्षिणेकडील तटबंदी भिमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या या किल्ल्याला तीन ते...
गडगिरी I6
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझी गडगिरी भाग:- 16 *शितल आल्हाददायी कळसुबाई* कळसुबाई म्हटलं की महाराष्ट्रातलं सहयाद्री रांगेतले सर्वात उंच शिखर अशी आपली धारणा होते आणि स्वाभाविकच आहे. अदमासे 1550 मीटर उंच अर्थात 5400 फुटावर असलेलं हे शिखर. महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेकर्सला कायम आकर्षित करणारं ठिकाण. तसा कळसुबाई शिखरावर मी चारदा गेलो. पण आठवणीत राहिलं ते श्रावणातलं वनसचेतन शिबिरा अतंर्गत केलेली गडगिरी आम्ही दोन गाडया करुन 150 जण भारतीय जैन संघटना महाविद्यालयातून 1997 साली कळसुबाईला गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. राजन वेळुकर यांनी वनसचेतन ही एक अफलातुन संकल्पना मांडली होती. आम्हाला आलं होतं ते भंडारदरा वन . भंडारदरा करुन कळसुबाई करायचं असा सगळा योजनेचा भाग होता. भारतीय जैन संघटनेचे कार्यवाहक श्री. डुंगरवाल आणि आम्ही 150 जण अस कळसुबाईला जायचं ठरलं. अतिशय उत्तम नियोजन आम्ही केलं होतं. आणि त्या प्रमाणे रात्री 11:00 वाजता पुण्याजवळच्या वाघोलीहुन आम्ही निघालो. पहाटे पोहोचलो संगमनेरमध्ये आन्हीके उरकल्यानंतर पहाटे पाच -सव्वापाचला भंडारदऱ्...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझी गडगिरी भाग :- 15 *हिरवा–पिवळा–लाल मल्हार गड* लहाणपणापासून जेजुरीला जाण्याचा अनेकदा प्रसंग आला, विशेषत : घरातील कोणाचेही लग्न झाले की आमची स्वारी नवरानवरी बरोबर हमखास असायची . गावातल्या नगाऱ्याला चामडं बसवायला बैलगाडीतून प्रवास केला होता . 2005 साली आम्ही पुणे – सासवड – निरा – फलटण रस्त्यावरील दौंडज या गावात सलग समपातळी चराची 10 दिवसांची साखळी पध्दतीने राष्ट्रीय सेवा योजनेची अनेक शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरातून दौंडजच्या पिण्याचा प्रश्न काळाच्या ओघात सुटला. तिथे चार महिने येणारे पाण्याचे टँकर बंद झाले. ही शिबिरे चालु असतांना सातत्याने जेजुरीवरुन दौंडजला जावे लागत होते. त्यामुळे दोन – तिन वेळा जेजुरीला गडावर जाणं झालं डॉ. राजकुमार रिकामे, प्राचार्या अर्चना ढेकणे बरोबर असायचे. एकदा भर दुपारी गड चढत असतांना चर्चा चालु होती की, गडावर झाडं लावणं फारच गरजेचे आहे. जेजुरीचा गड म्हणजे सोनेरी गड – नवलाख पायरीचा गड – देवी म्हाळसा बानुबाईचा गड, राजे शहाजी व छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट जिथे झाली व ज्या पितळी कासवामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिले तो मार्...
बीजमटका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बीज मटका आम्ही जुलै २००४ साली मोठया प्रमाणात वृक्षारोपन करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही मोठे नियोजन केले होते. तथापी,जेथे माणसालाही पोहचता येत नाही अशा ठिकाणी कसे वृक्षारोपन करायचे यावर खुप खल झाला सहाजिकच अशा डोंगर उतारावर बीजारोपन करायचे अशी टूम निघाली व मटका बीजाचा जन्म झाला . *दिवाळीच्या लक्ष्मीपुजनातील बोळकी व संक्रांतीतील ओवसायची सुगडी,खण* ही घरोघरी, माजघरात किंवा अडगळीच्या ठिकाणी छतावर वर्षानुंवर्षे तशीच पडून असतात. आम्ही २० जुलै रोजी वेगवेगळया महाविद्यालयांनी गड ,देवस्थाने ,किल्ले अशा ठिकाणी मटका बीजाच्या साहयाने बीजारोपन करावयाचे ठरले. मटका बीज तयार करण्यासाठी आदल्या दिवसी बियां कोमट पाण्यात तासभर भिजवून मातीत व शक्य असल्यास खतामध्ये एकजीव करून मटक्यात भरून मटका शेणाने किंवा मातीने लींपून रात्रभर तसाच ठेवला जातो. व दुसऱ्या दिवशी उंच कड्यावरून अशी अनेक मडकी दऱ्याखोऱ्यात फेकली जातात . त्यावेळी आम्ही तीन ते चार हजार विद्यार्थांनी सप्तशृंगी गड,भीमाशंकर ,कळसूबाई, सिंहगड,तिकोणा,लोहगड, शिवनेरी,राजगड अशा अनेक ठिकाणी ख प्रकारचे बीजारोपन मटका बिजाच्या सहाय्याने ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*माझी गडगिरी भाग :- ११* *भिमाशंकरची भुतं:-* भिमाशंकर म्हणजे भिमा नदीचे उगमस्थान. वास्तविक हा महादेवाचा डोंगर म्हणून प्रसिध्द. बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिध्द असलेले ठिकाण. त्यामुळे कायम गजबजलेले. *शिवपुराणातील* २० व्या अध्यायात ०१ ते २० श्लोकामध्ये या ज्योतिलिंगाची महती वर्णीली आहे २१ व्या अध्यायात श्लोक ०१ ते ५४ मध्ये माहिती आहे. त्याचप्रमाणे *भिमा पुराणात* याच्या पहिल्या ०३ अध्यायात भिमाशंकरचा उल्लेख येतो. एकदा आम्हा मित्रांनी डॉ प्र.के. घाणेकर सरांचे भाषण ऐकले होते. आणि त्यात भिमाशंकरला भुते बघायला मिळतात असे त्यांनी सांगितल्याने १९८७ साली आम्ही भिमाशंकरला भुतं बघायला गेलो. भिमाशंकरला जायला तशा अनेक वाटा त्यातील महत्वाच्या ०२ वाटा एक म्हणजे राजगुरुनगर व वरून भोरगिरी किल्ल्यापासून वर जाता येते, किंवा मंचर वरुन घोडेगांव मार्गे जाता येते. डॉ. प्र. के. घाणेकर यांच्या कडून एकदा भिमाशंकरच्या भुतांबद्दल ऐकलं होतं. तेच मनात ठेऊन आम्ही १० – १२ जणांनी भिमाशंकरला जाण्याचं ठाण मांडलं. शिवाजीनगर वरुन दुपारच्या एस.टी. ने डिंभे धरणाचा रम्य परिसर न्याहाळत भिमाशंकर गाठले. वन ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
jk”Vªh; lsok ;ks 19 uksOgsacj 2015 jksth ek- jk”Vªirh ;kaP;k gLrs jk”Vªh; lsok ;kstusps mRd`”B egkfo|ky; o bankiwj egkfo|ky;krhy izk- /kuat; Hkkslys ;kauk mRd`”B dk;Zdze vf/kdkjh iqjLdkj ?ksr vlrkuk ekxP;k 25 o”kkZapk lxGk vkys[k lkjhikVklkj[kk ljlj ljdr gksrk- iqjLdkjkph jaxhr rkyhe dj.;kiklwu iqjLdkj ?ksÅu fnYyhgwu iq.ks o ijr bankiwjyk ;sbZi;Zar ,d ,dk izlaxkr fdrhrjh osG eh jer gksrks- lxG;k dVw xksM vkBo.khauk eu lSjHkSj >kya gksra- iq.ks ftYgk f’k{k.k eaMGkP;k ckcqjkoth ?kksyi egkfo|ky;kr 1990 lkyh izk/;kid Eg.kqu :tw >kyks- izkpk;Z ds- ,l- ikVhy gksrs o jk”Vªh; lsok ;kstusps dk;Zdze vf/kdkjh bZ- ts- txrki gksrs- ck.ksjyk jkls;ks ps f’kfcj gksrs- vkEgh pkS?ks ldkGh dkWyst d:u lk;dyoj lkaxoh rs ck.ksj vla McyflV tk;pks- eqDdke djk;pks] mRlkgh vlk;pks- 1992 lkyh MkW- ,l- ,u- iBk.k vkeps izkpk;Z >kys o eyk dk;Zdze vf/kdkjh dsys- rlk eh jk”Vªh; Nk= lsuspk dWMsV] ...