*Adjustment जगण्याची* माणूस मेला की त्याची बॉडी होते बॉडी आली का? घाई करा फुगेल, फुटेल, आंघोळ घाला उरका, सगळ्या adjustment मैताच्या वेळेस बघायला मिळतात, जसे नवा कपडा नाही, आरं चालतंय धडुक आण, साजूक तूप नाही ok डालडा तोही नाही रॉकेल चालत, चंदन कसलं मिळतंय कसलीही लाकडं चालतात तीही मिळाली नाही तर नुसत्या गोवऱ्यात भागवता येत, गुजरात भूकंपानंतर टायर मध्ये प्रेत जाळली होती आम्ही, हा तर ऍडजस्ट चा कळस ठरावा, सोन्याचा मणी नाही घशात घालायला विडयाच पान चालत नसल्यास तुळशीचं पान आहेच की इथे सगळ्याला पर्याय उपलब्ध असतात, कारण मेलेल्याची आकड नसते आधीच त्याची आकडी वळलेली असते, हे सगळं माहीत असूनही जिवंतपणी आपण मला असाच लागत अगदी ताटात लिंबू फोड इकडं तिकडं झालेली चालत नाही, change is the only constant thing in life पण system रन होताना थोडाही बदल सहन करायचा नाही अगदि चाकोरीत झापड लावूनच जगायचं, माणूस मेला की नाही हे चेक करण्याच्या पद्धती नव्हत्या त्या काळात, बघा गंमत येईल वाचताना प्रेताला आंघोळ गरम पाण्याने घालायच...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
माझी गाडगिरी भाग 18 विषण्ण विशाळगड : आय कॉलेजचे नॅक नुकतेच संपले, आणि कुठेतरी गडावर जायचं अशी टूम निघाली, खूप वर्षात विशाळगडला गेलो नव्हतो, म्हणून विशाळगडला जायचे घाटले. बांधाबांध झाली आता पर्यंतपाच जण तयार झाले. इंदापूर वरून निघून कोल्हापूरला पहिला मुक्काम आणि पन्हाळ्यावरून विशाळगडला रवाना झालो. आधी पावनखिंडीत जायचं की विशाळगडावर जायचं अशी आपपसात खलबतं झाले आणि आधी विशाळगड गाठायचा आणि मग पुन्हा पावनखिंडीत यायचं जमलं तर धबधब्यात तुडूंब आंघोळी करायच्या असा एक विचार झाला. आणि एकदाचं विशाळगडाकडे कूच केलं. विशाळगड नावाप्रमाणेच विशालकाय. कातळ खडकाचा बनलेला हा गड. गडावर जायला एकमेव वाट गडाच्या मुख्य दरवाजाच्या समोरच मोठी खोल दरी अगदी नैसर्गिक छत्रपती शिवरायांच्या गडांना जसा खंदक असतो अशा पद्धतीची ही नैसर्गिक दरी. हिच ती वाट जिथून दोन नद्या एक उजवीकडे व डावीकडे उगम पावते उजवीकडची दरी कोकणात जाते तर डावीकडची कोल्हापूरकडे दरीवर आणल्यानंतर ओलांडल्यानंतर आपण एका छोटेखानी खोबणीत या मंदिराकडे आकर्षिल...