उर्जा संवर्धन करताना सर्वात महत्वाची काळजी
माझा ऑस्ट्रेलिया दौरा
पु णे विद्यापीठात विद्यावाचस्पती पदवीसाठी संशोधन करीत असताना मी करीत असलेल्या संशोधन संदर्भात मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथून मला बोलावण्यात आले. पहिलाच विमान प्रवास म्हटल्यावर पहलटकरणीचा आनंद झाला होता. पासपोर्ट (पारपत्र), व्हिसा अशा शब्दांची ओळख व्हायला लागली. या सगळ्या धामधुमीत जाण्याच्या आदल्या दिवशी व्हिसा मिळाला. "व्हिसा' म्हणजे पारपत्रावर मारलेला एक शिक्का असतो हे पहिल्यांदाच कळले. अर्थात तोपर्यंत पासपोर्टची किंमत कळली होतीच. जसजसे जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले. तसतसे लग्न जमलेल्या मित्राला, त्याचे मित्र अनेक विविधांगी सल्ले देतात व तो बावचळून, गोंधळून जातो, तसेच माझेही काहीसे व्हायले लागले. कारण यापूर्वी विमानाने प्रवास न केलेले असे मित्र सल्ला देत होते. अर्थात ते फुकटचेच, कारण त्यात त्यांच्या बापाचं काहीच जात नव्हतं. मी मात्र पटेल तोच सल्ला अत्यंत गांभीर्याने घेत होतो. सल्ले तरी काय? पारपत्र ठेवण्यासाठी बंडीवजा बनियान विकत घ्या, मी कापड बाजारात हिंडून दोन तास घालवून तशा प्रकारची बंडी मिळविली. लाडू, चिवडा, पुरणपोळ्या, शंकरपाळ्या , रव्याचे लाडू असं काय-काय बायकोने आणि आईने ...