पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
*ज्ञान लुटण्याचा दसरा*               दसरा '  विजया दशमी दहा दिवसांच्या मातीच्या उत्सवाचा आनंद, पृथेला पाण्याची आच , घटाला लागणारे तृणधान्य  त्यातून टरारून येणारे कोंभ, माती परीक्षण, पाणी परीक्षण , धान्य परीक्षण , सगळं दहा दिवसात कमी खर्चात. पुण्यात म्हणे घटाची माती पण विकतच आणतात. कर्मकांड उरलीत.  का ? कशासाठी , प्रश्नच पडत नाहीत.        आपट्याची पानं म्हणून सर्रास अंजन वा कांचन वृक्षाची  मोठया प्रमाणात कत्तल होतीय , आपट्या ला पर्याय शोधता येतील का ? आपट्याची रोपेच ,बिया लुटल्या तर ? चला,  विचार तर करु या ? गेला बाजार ज्ञानच लुटलं तर विजया दशमीच्या निमित्ताने इानपिपासु अर्थात ज्ञानलुटेरे होऊ या . दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संजय ज्ञानेश्वर चाकणे  ( *ज्ञानसुत* )
इमेज
सर काय वाचू,? सर काय वाचू ? असे अनेकजण विचारतात, मी मात्र काय वाट्टेल ते वाचा,! ज्यात मन रमतय ते वाचा! असे सांगत असतो  अगदी बाबा कदम किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीपासून सुरुवात करून  *हिंदू एक जगण्याची अडगळ* पर्यंत काहीही वाचावे, कुठलेही लिखाण वर्ज्य असता कामा नये, कप्तान बेलवळकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पासून श्रीमान योगी मृत्युन्जय , जिप्सी, ययाती, छावा , मूकनायक, युगंधर, काळेपाणी , बुद्ध व त्याचा धम्म, समग्र फुले, उचल्या, झोंबी, अक्करमाशी, बलुतं,  निळी पहाट, समग्र पुलं, समग्र व पु, दमा,  धनंजय कीरांची सगळी चरित्र, गो निदांच बये दार उघड, तुंबाडचे खोत ताम्रपट, पानिपत, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, बुधभूषण, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण,संत तुकारामांची गाथा, भारुड सर्व संत साहित्य दासबोध, अच्युत गोडबोले  यांचे मनात, किमयागार,अर्थात, अर्थाच्या शोधात, पूर्वरंग, अपूर्वाई, माझी गडगिरी, राष्ट्रीय सेवा योजना वरची पुस्तक, आपत्ती व्यवस्थापनाची पुस्तक, दलित साहित्य ग्रामीण साहित्य अशा  लिखानापासून महेंद्र कदमाच्या आगळ सारख्या, पुपुल जयक...
*भांडगाव म्हसोबा चे तेल*                   माझे मित्र प्रा. उत्तम माने यांच्या आग्रहा खातर मी भांडगावच्या म्हसोबाला गेलो होतो. वास्तविक भांडगाव हे नॉनव्हेज टुरिझम अर्थात  मांसाहारी पर्यटनासाठी पुणे जिल्हयातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत धार्मिक गाव. गेल्या सात वर्षात भांडगावला जाण्याचा माझा हा दुसरा प्रसंग. यावेळी मात्र देवस्थानात जाता आले. खोबरेल तेल जळाल्याचा वास येत होता करवंट किंवा शेंडी जाळल्यानंतर येतो तसा, अर्थात एखादा यज्ञ चालू असावा असे वाटले ,परंतू लक्षात असे आले की मंदीरा शेजारीच लोखंडी बंब ढॅन् ढॅन ' पेटलेले होते आणि त्यातूनच हा वास येत होता पावले आपसूकच तिकडे वळली देवस्थानच्या मंडळींनी कुणीतरी उत्सुकता दाखवतय?  म्हणून अतिशय तन्मयतेने प्रकल्प समजावून सांगितला एकंदरीतच सगळ्या देवस्थानांनी आदर्श घ्यावा असा हा प्रकल्प देवाला फोडलेले नारळ एकत्र करूण ते एका ड्रायरमध्ये टाकले जातात मग शेंडी व करवंट्या वेगळ्या केल्या जातात , खोबरे व त्याचे तुकडे  क्रशरमध्ये घालून घाण्यात आणले जातात त्यातून पेंड वेगळी होत...
*नव्याने नयी तालीम* हे थोर महात्म्या, म्हणता म्हणता एकशे पन्नास वर्षे होऊन गेली. तुझ्या नई तालीम ची पुन्हा नव्याने उजळणी करणे गरजेचे आहे, वास्तविक आम्ही पुन्हा नयी तालीम कडे वळलो आहोत,  स्वच्छता अभियान असेल, खेड्याकडे चला चा नारा असेल, खेडी स्मार्ट किंवा विकसित करण्याचा प्रयत्न असेल, पंचक्रोशी विकसित करण्याचा प्रयत्न असेल शैक्षणिक बाबींचा विचार असेल समाज एकत्र करण्याचा विचार असेल,  तुझ्याच विचारांची आम्हा सगळ्यांना नाळ जोडावी लागणार आहे,  नव्हे नव्हे सगळं विश्व एकत्र करण्याची ताकद फक्त तुझ्या त्या अहिंसा वादात आहे, तुझे विचार कधीच संपले नाहीत, संपले नव्हते,  संपणारही नाहीत,  एक ना एक दिवस बुद्ध, महावीर, आणि  हे महात्म्या, तुला अंगीकारावेच लागेल, 150 व्या जयंती निमित्ताने मनपूर्वक अभिवादन *ज्ञानसुत* 🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱