*नव्याने नयी तालीम*

हे थोर महात्म्या,
म्हणता म्हणता
एकशे पन्नास वर्षे होऊन गेली.
तुझ्या नई तालीम ची पुन्हा नव्याने उजळणी करणे गरजेचे आहे, वास्तविक आम्ही पुन्हा नयी तालीम कडे वळलो आहोत,
 स्वच्छता अभियान असेल, खेड्याकडे चला चा नारा असेल,
खेडी स्मार्ट किंवा विकसित करण्याचा प्रयत्न असेल,
पंचक्रोशी विकसित करण्याचा प्रयत्न असेल
शैक्षणिक बाबींचा विचार असेल
समाज एकत्र करण्याचा विचार असेल,

 तुझ्याच विचारांची आम्हा सगळ्यांना नाळ जोडावी लागणार आहे,

 नव्हे नव्हे सगळं विश्व एकत्र करण्याची ताकद
फक्त तुझ्या त्या अहिंसा वादात आहे,

तुझे विचार कधीच संपले नाहीत, संपले नव्हते,
 संपणारही नाहीत,

 एक ना एक दिवस

बुद्ध,
महावीर,
आणि
 हे महात्म्या,
तुला अंगीकारावेच लागेल,


150 व्या जयंती निमित्ताने मनपूर्वक अभिवादन

*ज्ञानसुत*
🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा ऑस्ट्रेलिया दौरा