पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
माझी गडगिरी भाग :- 15 *हिरवा–पिवळा–लाल मल्हार गड* लहाणपणापासून जेजुरीला जाण्याचा अनेकदा प्रसंग आला, विशेषत : घरातील कोणाचेही लग्न झाले की आमची स्वारी नवरानवरी बरोबर हमखास असायची . गावातल्या नगाऱ्याला चामडं बसवायला बैलगाडीतून प्रवास केला होता .       2005 साली आम्ही पुणे – सासवड – निरा – फलटण रस्त्यावरील दौंडज या गावात सलग समपातळी चराची 10 दिवसांची साखळी पध्दतीने राष्ट्रीय सेवा योजनेची अनेक शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरातून दौंडजच्या पिण्याचा प्रश्न काळाच्या ओघात सुटला. तिथे चार महिने येणारे पाण्याचे टँकर बंद झाले. ही शिबिरे चालु असतांना सातत्याने जेजुरीवरुन दौंडजला जावे लागत होते. त्यामुळे दोन – तिन वेळा जेजुरीला गडावर जाणं झालं डॉ. राजकुमार रिकामे, प्राचार्या अर्चना ढेकणे बरोबर असायचे. एकदा भर दुपारी गड चढत असतांना चर्चा चालु होती की, गडावर झाडं लावणं फारच गरजेचे आहे. जेजुरीचा गड म्हणजे सोनेरी गड – नवलाख पायरीचा गड – देवी म्हाळसा बानुबाईचा गड, राजे शहाजी व छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट जिथे झाली व ज्या पितळी कासवामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिले तो मार्तंड गड, ज्या प

बीजमटका

इमेज
बीज मटका आम्ही जुलै २००४ साली मोठया प्रमाणात वृक्षारोपन करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही मोठे नियोजन केले होते. तथापी,जेथे माणसालाही पोहचता येत नाही अशा ठिकाणी कसे वृक्षारोपन  करायचे यावर खुप खल झाला सहाजिकच अशा डोंगर उतारावर बीजारोपन करायचे अशी टूम निघाली व मटका बीजाचा जन्म झाला . *दिवाळीच्या लक्ष्मीपुजनातील बोळकी व संक्रांतीतील ओवसायची सुगडी,खण* ही घरोघरी, माजघरात किंवा अडगळीच्या ठिकाणी छतावर वर्षानुंवर्षे तशीच पडून असतात. आम्ही २० जुलै रोजी वेगवेगळया महाविद्यालयांनी गड ,देवस्थाने ,किल्ले अशा ठिकाणी मटका बीजाच्या साहयाने बीजारोपन करावयाचे ठरले. मटका बीज तयार करण्यासाठी आदल्या दिवसी बियां कोमट पाण्यात तासभर भिजवून मातीत व शक्य असल्यास खतामध्ये एकजीव करून मटक्यात भरून मटका  शेणाने किंवा मातीने लींपून रात्रभर तसाच ठेवला जातो. व दुसऱ्या दिवशी उंच कड्यावरून अशी अनेक मडकी दऱ्याखोऱ्यात फेकली जातात . त्यावेळी आम्ही तीन ते चार हजार विद्यार्थांनी सप्तशृंगी गड,भीमाशंकर ,कळसूबाई, सिंहगड,तिकोणा,लोहगड, शिवनेरी,राजगड अशा अनेक ठिकाणी ख प्रकारचे बीजारोपन मटका बिजाच्या सहाय्याने केले होते