पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
*भांडगाव म्हसोबा चे तेल*                    खूप दिवसांनी पुन्हा एकदा मित्राच्या  आग्रहाखातर मी भांडगावच्या म्हसोबाला गेलो होतो. वास्तविक भांडगाव हे नॉनव्हेज टुरिझम अर्थात  मांसाहारी पर्यटनासाठी पुणे जिल्हयातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत धार्मिक गाव . गेल्या सात वर्षात भांडगावला जाण्याचा माझा हा दुसरा प्रसंग. यावेळी मात्र देवस्थानात जाता आले. खोबरेल तेल जळाल्याचा वास येत होता करवंट किंवा शेंडी जाळल्यानंतर येतो तसा, अर्थात एखादा यज्ञ चालू असावा असे वाटले ,परंतू लक्षात असे आले की मंदीरा शेजारीच लोखंडी बंब ढॅन् ढॅन ' पेटलेले होते आणि त्यातूनच हा वास येत होता पावले आपसूकच तिकडे वळली देवस्थानच्या मंडळींनी कुणीतरी उत्सुकता दाखवतय?  म्हणून अतिशय तन्मयतेने प्रकल्प समजावून सांगितला एकंदरीतच सगळ्या देवस्थानांनी आदर्श घ्यावा असा हा प्रकल्प देवाला फोडलेले नारळ एकत्र करूण ते एका ड्रायरमध्ये टाकले जातात मग शेंडी व करवंट्या वेगळ्या केल्या जातात , खोबरे व त्याचे तुकडे  क्रशरमध्ये घालून घाण्यात आणले जातात त्यातून पेंड वेगळी होते व तेलाचे गाळप होते.
पुण्याचे पावन पवित्र पाणी पुणेकरांना आपलं काय चाललंय, कुठे गेला आपला पुणेरी बाणा, आपलं मूळ कशात आहे, तर दुसऱ्याचे एकायचे नाही, हल्ली तुम्ही म्हणे तज्ज्ञाचे ऐकता, तुम्ही चक्क जलतज्ज्ञांचे ऐकता, पाणी कमी वापरा!  गाड्या पाण्याने नळी वापरून धुऊ नका! शॉवर खाली आंघोळ करू नका! बाथटप वापरू नका! गळके नळ दुरुस्त करा! असं सगळं तुम्ही ऐकता! बरं नव्हे हे! अजिबात ऐकू नका!      *पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांकडे जाऊ या, पुणेकरांनो ऐकाच* भरपूर पाणी वापरा, मनसोक्त अंघोळ करा, मायदांळ पाणी वापरा, कुठेही कमतरता नको, कपडे बादलीने नका धुवू, सरळ नळाखाली धुवा, शॉवर खाली भरपुर वेळ अंघोळ करा, टॉयलेटचा प्लश वापरा, अंगणात पाणी मारा थंडावा येईल, कुत्री मांजरं रोज धुवून काढा, रोज स्वतः दोनदा अंघोळ करा, गळके नळ गळू द्या, नळ मोकळे सोडा, आजचे पाणी उद्या शिळे होणार त्यामुळे रोज भांडी ओतून द्या, नव्याने पाणी भरा, कारण, कारण, उजनी उघडं पडलंय, धरण आटलयं, गुरढोरं तडफडतायेत, माणसं पाण्यासाठी वणवण हिंडतायेत, शेती फाटलीय, जमीन तापलीय, उजनी धरण तुम्हा पुणेकरांच्या वापरलेल्या पाण्यावर भरते
*अक्षयऊर्जा* न क्षयती इती अक्षय: क्षय म्हणजे ऱ्हास, आपण सहज म्हणतो त्याला क्षय झालाय, याच्याच उलटअक्षय म्हणजे  वाढ,, आज अक्षय तृतीया. आयुष्यात ठरवलेल्या गोष्टींची वाढ करून घेण्याचा दिवस. धन, धान्य, पशू वृध्दी तर होते राहिलंच. अक्षय झाली पाहिजे ती स्व ऊर्जा अक्षय झाले पाहिजे ज्ञान. मागच्या काही दिवसांपासून एक मेसेज फिरतोय तो म्हणजे  मला माहित आहे.अशी मान्यता आहे की, या शुभदिनी,आपण जे काही (सोने,चांदी,हिरे) देवघरात ठेवू, त्यात अक्षय वाढ होत असते. त्या गोष्टींची कधी कमतरता भासत नाही. 💧💧सध्या पाणी ही सर्वांचीच नितांत गरजेची गोष्ट आहे.💦💦 तेव्हा यंदाच्या अक्षय तृतीयेला आपण पाण्याने भरलेला कलश देवघरात स्थापन करू या आणि  परमेश्वराला प्रार्थना करून मागणं मागूया की आपल्या देशात मुबलक पाऊस पडू देत.....🌧🌧🌧* मेसेज छानच आहे तो viral सुध्दा उत्तम व मोठ्या प्रमाणात झालाय. असे पाणी वाढले तर किती छान पण असे करणे सोप्पे असते. सगळं कसं देवावर ढकलून मोकळं व्हायचं. बरं वाईट देवावर भरोसा.  पाणीच अक्षय करायचे तर, मातीत मुरावावे लागेल, जमिनीत गाडावे लागेल, पडणाऱ्या पाण्याला थांबवावे ल