पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
माझी गडगिरी भाग १९  पवित्र पावनखिंड :  हिरव कच्च जंगल                   उन्हाळ्याचे दिवस, विशाळ गडावरून पावनखिंडीकडे जाताना हिरव कच्च जंगल नजरेस पडतं, भर उन्हात गार शीतलता, थंडावा देत. लहानपणापासून पावनखिंडीचे आकर्षण राहिलेल. चौथीच्या पुस्तकातील ते चित्र कायम कोरुन राहिलेलं. मागे विशाळ गडावर तोफांचे बार - खिंडीत बाजी प्रभू मावळ्यांच्या  मांडीवर पडून तोफेच्या आवाजाकडे कान देऊन आहेत. हे व मोगलांना अडवणारे पाच-पन्नास मावळे उंच कातळ, प्रपाताचा परिसर हे दुसरे चित्र- तसेच भालजी पेंढारकरांचा तो गाजलेला चित्रपट डोळ्यासमोरून हळूहळू पुढे सरकत होता.       शहापूरहून विशाळगड व परत पावन खिंडीकडे जाताना अनेक ठिकाणी पलाश वृक्ष अर्थात पळस फूललेला दिसतो. इंग्रजीत याला खूप सार्थक नाव आहे "जंगलफायर"जंगलात आग लागल्या सारखी दिसते नारंगी रंगाची पोपटाच्या आकाराची ही फुले सहजी लक्ष वेधतात. या भागात पळसाची खूप झाडे आहेत, त्यामुळे सह्याद्रीची उपरांग जागोजागी पेटल्या सारखी दिसते. पुढे पुढे जाताना अतिशय मऊ- मुलायम अशी शाल्मलीची झाडे दिसतात. ही वास्तविक काटेसावर, शिवरी च्या जातीची, गुलाबी रंगा
इमेज
माझी गाडगिरी भाग 18 विषण्ण विशाळगड :            आय कॉलेजचे नॅक नुकतेच संपले, आणि कुठेतरी गडावर जायचं अशी टूम निघाली, खूप वर्षात विशाळगडला गेलो नव्हतो, म्हणून विशाळगडला जायचे घाटले. बांधाबांध झाली आता पर्यंतपाच जण  तयार झाले. इंदापूर वरून निघून कोल्हापूरला पहिला मुक्काम आणि पन्हाळ्यावरून विशाळगडला रवाना झालो.          आधी पावनखिंडीत जायचं की विशाळगडावर जायचं अशी आपपसात खलबतं झाले आणि आधी विशाळगड गाठायचा आणि मग पुन्हा पावनखिंडीत यायचं जमलं तर धबधब्यात तुडूंब आंघोळी करायच्या असा एक विचार झाला. आणि एकदाचं विशाळगडाकडे कूच केलं. विशाळगड नावाप्रमाणेच विशालकाय. कातळ खडकाचा बनलेला हा गड. गडावर जायला एकमेव वाट गडाच्या मुख्य दरवाजाच्या समोरच मोठी खोल दरी अगदी नैसर्गिक छत्रपती शिवरायांच्या गडांना जसा खंदक असतो अशा पद्धतीची ही नैसर्गिक दरी. हिच ती वाट जिथून दोन नद्या एक उजवीकडे व डावीकडे उगम पावते उजवीकडची दरी कोकणात जाते तर डावीकडची कोल्हापूरकडे दरीवर आणल्यानंतर ओलांडल्यानंतर आपण एका छोटेखानी खोबणीत या मंदिराकडे आकर्षिले जातो हे मंदिर म्हणजे देवीचा मुखवटा असलेले खोकलाई देवीचे म