पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*परीक्षेला पर्याय काय?* नुकत्याच परीक्षा संपत आल्यात 10 वी व 12 वी च्या परीक्षा पाहिल्या तर वास्तव भयानक आहे, कॉपी चे प्रमाण, करण्याच्या नानाविध पद्धती, पालकांचा दुर्दैवाने सहभाग व शिक्षकांचा सहभाग पाहिला की विषण्णता येते, कॉपी करण्याच्या क्लुपत्यांवर पीएचडी होईल, ओढणीवर नक्षीदार लिहिन्यापासून, शर्टच्या बाह्यांच्या मनगटात शिप्याकडून खास कप्पे शिवणे, भिंतीवर, बेंचवर पॅड वर लिहिणे, हे झालं पारंपारिक, नको तिथे मोबाइल लपवणे, स्मार्ट घडयाळात लिहून आणणे,m c q ला खाणाखुणा करून इशार्याने सांगणे , हे सगळं सृजनात्मक म्हणजे क्रूजनात्मक आहे, 12 वीचा निकाल सहज 90% लागतो , वर्षभर प्रात्यक्षिकाना न बसणारे विद्यार्थी पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा करतात, oral चा नावाखाली गूण वाढवणे एव्हढाच agenda दिसतो, हीच मुलं जेव्हा FY ला प्रवेश घेतात, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना आठवी / नववीत शिकलेल्या बाबी सुद्धा धडपणे सांगता येत नाहीत 8वी पर्यंत नापास न करण्याचा निर्णय योग्यच होता, त्याची अंमल बजावणी मध्ये दोष राहिले, आपण कमी पडलो. इतके दिवस आपण म्हणायचो मुलं परिक्षार्थी होतायेत आता तेही नाही   इंग्रज
इमेज
माझी गुढी माझी गुढी माझच राज्य, माझ्या पसाऱ्याचा मीच राजा मीच छत्रपतीं या शिवाराचा असतील तुमचे उंचउंच झेंडे रंगही नानाविध वा करडेबांडे माझी गुढी माझाच रंग असेल वाङ्गळा काळा सावळा माझी गुढी माझाच मळा माझंच पाणी माझ्याच आवारात नाही कुणाच्या बाला देणार माझी पंचक्रोशी माझा विकास माझी गुढी माझ्याच शेतास असतील तुमचे नाना पक्ष शेतात राबतो मी तो दक्ष माझच रान माझेच पक्षी दाणे दाणे टिपती वनात माझी गुढी माझ्याच रानात माझी गुढी माझेच राज्य जमिनीतला अंकुर झाडाची पालवी लवलवणरी पाती किती रंगसंगती याच अमुच्या गुढया हिच तोरणे निर्सगाची हिरवी पिवळी गुलाबी पाने लाल, शेंदरी, जांभळी फुले वसंतात आसमंत फुललेले याच गुढया हिच तोरणे शेतातला कोंभ भाजलेली माती तप्त शिवार मुद गंध हेच अत्तर आमुच्या गुढीचे *गुढीपाडवाच्या शुभेच्छा* *संजय चाकणे* *ज्ञानसुत*
* एका टक्क्यांच काय करायचं?*         सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले  असतात, तर पाच टक्के वाईट ,उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात.           गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्कयावर जाते ,ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच?      वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं,  पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत.         मोरीतून किंवा बेसीनच्या भांडयातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुडींत. पण हल्ली s1,s9किंवा तत्सम जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन ) काही तासांनी बंद होतो.         थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्कयावर अवलंबून राहतं.         समाजातही असेच असेल का ? समाजात ५ टक्के लोक सच्चे असतील, तर ५ टक्के लुच्चे असावेत, उरलेल्या
*रंग मनीचे गुज निसर्गाचे*        आज इंदापूरहून पुण्याला येतांना रंगानी फासलेली,  चेहरा हरवलेले युवक युवती बघत आलो, मागे सातारा -कास-बामणोली -प्रतापगड केल्याने  रंगांची त्या निर्मिकाने मुक्त हस्ते  केलेली उधळण डोळ्यात साठवली होती. शाल्मलीचा अर्थात काटे सावरीचा नितळ तांबुस, पळसाचा गर्द शेंदरी,  निलमोहोराचा नाजुक निळा, कोयनेच्या जलसाठयाचा निळसर , सुर्योदयाचा मोहक गुलाबी तांबुस, बेटावरच्या रात्रीचा काळकभिन्न ,  पौर्णिमेच्या चंद्राचा मोहक पिवला, सह्याद्रीच्या हिरव्या पोपटी  नाना छटा ,  प्रतापगडाचा उंच आकाशी फडफडणारा भगवा, भवानी मातेच्या मंदिरातल्या शाळीग्रामाचा पांढरसा धवल,  मातेच्या गंडगी शिळेच्या मुर्तीचा  कृष्ण रंग, किती रंगांची मिजासखोरी, रंगपंचमीला राधाकृष्णाची आठवण हमखास येते. राधा हे कृष्णाचे स्त्रैण रूप असावं.  मनातल्या रंगाच्या उधळणीला उधाण देण्यांच जमलं पाहिजे. किती मोहक,  कल्पक रंग मनाचे, ठाव लागणार नाही इतुके, नवपिढी भडकलीय ती कर्मकांडात,  एकमेकांना रंग फासण्यात, रंगमनीचे कुणी समजुनच घेत नाही. रंगांना जातीची बिरूदं लावल्यापासुन तर फारच घोळ झालायं, चला
ज्ञानाई* बयो सावित्री आमची मोठ्याई, तूच खरी ज्ञानाई, तुझी महती सांगताना तुला अडकवतात शेण्या, साडी, यातच गोष्टीरूप, पण तुझं महत्तम कार्य कळण्यासाठी, केवळ तसबिरित्  न अडकवता काव्य फुलांच पूजन झाले पाहिजे, त्याची गाणी झाली पाहिजेत, ती ओठी सहजी गायली गेली पाहिजेत, सुबोध रत्नाकराचे पवाडे गायले पाहिजेत सहजी ओठी गुणगुण ले पाहिजेत, हे माते हे माई हे कवियित्री, हे ज्ञानाई , तू नसतीस तर ???????? आज, कन्या शिकल्या असत्या का? पंतप्रधान ते राष्ट्रपती संशोधक ते अंतराळ पायलट ते डॉकटर झाल्या असत्या का? तुला मूर्तीत अडकवनारे, तुझे पुतळे उभे करत पूजा बांधून कर्मकांडात अडकनारे आम्ही , करंटे तर नाही ना? तुझ्या ज्ञानपिपासू वृत्तीपासुन, दूर तर जात नाही ना? बयो तुला समजून घ्यायला काही तपं लागतील' पण तुला समजुन घ्यावचं लागेल ' माते सावित्री ' तुझ्या विचाराना पुढ न्यावेच लागेल . आम्ही ते नेणारच. विनम्र अभिवादन . *संजय चाकणे* *ज्ञानसुत* 10 मार्च 2020