बीजमटका


बीज मटका

आम्ही जुलै २००४ साली मोठया प्रमाणात वृक्षारोपन करायचे असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही मोठे नियोजन केले होते. तथापी,जेथे माणसालाही पोहचता येत नाही अशा ठिकाणी कसे वृक्षारोपन  करायचे यावर खुप खल झाला सहाजिकच अशा डोंगर उतारावर बीजारोपन करायचे अशी टूम निघाली व मटका बीजाचा जन्म झाला . *दिवाळीच्या लक्ष्मीपुजनातील बोळकी व संक्रांतीतील ओवसायची सुगडी,खण* ही घरोघरी, माजघरात किंवा अडगळीच्या ठिकाणी छतावर वर्षानुंवर्षे तशीच पडून असतात.
आम्ही २० जुलै रोजी वेगवेगळया महाविद्यालयांनी गड ,देवस्थाने ,किल्ले अशा ठिकाणी मटका बीजाच्या साहयाने बीजारोपन करावयाचे ठरले.
मटका बीज तयार करण्यासाठी आदल्या दिवसी बियां कोमट पाण्यात तासभर भिजवून मातीत व शक्य असल्यास खतामध्ये एकजीव करून मटक्यात भरून मटका  शेणाने किंवा मातीने लींपून रात्रभर तसाच ठेवला जातो. व दुसऱ्या दिवशी उंच कड्यावरून अशी अनेक मडकी दऱ्याखोऱ्यात फेकली जातात . त्यावेळी आम्ही तीन ते चार हजार विद्यार्थांनी सप्तशृंगी गड,भीमाशंकर ,कळसूबाई, सिंहगड,तिकोणा,लोहगड, शिवनेरी,राजगड अशा अनेक ठिकाणी ख प्रकारचे बीजारोपन मटका बिजाच्या सहाय्याने केले होते .
 आज आय कॉलेजतर्फ इंदापूरने अशाच प्रकारचे बीजारोपन मटका बिजाच्या साहयाने करण्यात आले. जवळ जवळ एक हजार मडक्यामधून वाटले गेले. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बियां रुजवण्यासाठी ठेवण्यात आल्या चला तर मग मडक्यांचा वापर करून मटकाबीज तयार करून बीजारोपनासह वृक्षारोपन करूयात.
                               
   ज्ञानसुत
13 मे 2018

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट