*अक्षयऊर्जा*


न क्षयती इती अक्षय:

क्षय म्हणजे ऱ्हास, आपण सहज म्हणतो त्याला क्षय झालाय, याच्याच उलटअक्षय म्हणजे  वाढ,,
आज अक्षय तृतीया. आयुष्यात ठरवलेल्या गोष्टींची वाढ करून घेण्याचा दिवस. धन, धान्य, पशू वृध्दी तर होते राहिलंच.
अक्षय झाली पाहिजे ती स्व ऊर्जा
अक्षय झाले पाहिजे ज्ञान.
मागच्या काही दिवसांपासून एक मेसेज फिरतोय तो म्हणजे

 मला माहित आहे.अशी मान्यता आहे की, या शुभदिनी,आपण जे काही (सोने,चांदी,हिरे) देवघरात ठेवू, त्यात अक्षय वाढ होत असते. त्या गोष्टींची कधी कमतरता भासत नाही.
💧💧सध्या पाणी ही सर्वांचीच नितांत गरजेची गोष्ट आहे.💦💦
तेव्हा यंदाच्या अक्षय तृतीयेला आपण पाण्याने भरलेला कलश देवघरात स्थापन करू या आणि  परमेश्वराला प्रार्थना करून मागणं मागूया की आपल्या देशात मुबलक पाऊस पडू देत.....🌧🌧🌧*

मेसेज छानच आहे तो viral सुध्दा उत्तम व मोठ्या प्रमाणात झालाय.
असे पाणी वाढले तर किती छान पण असे करणे सोप्पे असते. सगळं कसं देवावर ढकलून मोकळं व्हायचं. बरं वाईट देवावर भरोसा.
 पाणीच अक्षय करायचे तर, मातीत मुरावावे लागेल, जमिनीत गाडावे लागेल,
पडणाऱ्या पाण्याला थांबवावे लागेल
थांबलेल्या ला अडवावे लागेल,
अडलेले जिरेल,
जिरलेले मुरेल,
मुरलेले टिकेल
टिकलं की अक्षय होईल.
माती व पाण्याचे संस्कार व सोपस्कार केले तर जिवित्वा कडे अक्षत्व जाईल.
बऱ्याचदा स्थूलता येते.
माणसांनी असमाधानी राहिले पाहिजे.
समाधान म्हटले की क्षयाकडे वाटचाल.
एखादा माणूस कायम झाला की stagnant होतो. प्रगती खुंटते, तो समाधानी होतो, काही वर्षात पोट सुटते, मग व्याधी सुरू होतात.
जो पुढच्या पोस्ट  वा वरच्या पदाच्या विचार करतो, तो काम करत राहतो अक्षय असतो, निरोगी असतो.

ऊर्जा अक्षयतेचा नियम नेहमी ऊर्जा देतो.
चला तर ऊर्जा वृद्धिंगत करूया
ज्ञान वाढवू या
स्वप्न अक्षय करू या
अक्षय तृतीया
पवित्र रमझान
महात्मा बसवेश्वर जयंतीच्या
शुभेच्छा

*ज्ञानसुत*
*संजय चाकणे*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट