पुण्याचे पावन पवित्र पाणी

पुणेकरांना आपलं काय चाललंय,
कुठे गेला आपला पुणेरी बाणा,
आपलं मूळ कशात आहे,
तर दुसऱ्याचे एकायचे नाही,
हल्ली तुम्ही म्हणे तज्ज्ञाचे ऐकता,
तुम्ही चक्क जलतज्ज्ञांचे ऐकता,
पाणी कमी वापरा! 
गाड्या पाण्याने नळी वापरून धुऊ नका! शॉवर खाली आंघोळ करू नका!
बाथटप वापरू नका!
गळके नळ दुरुस्त करा!
असं सगळं तुम्ही ऐकता!
बरं नव्हे हे!
अजिबात ऐकू नका!
     *पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांकडे जाऊ या, पुणेकरांनो ऐकाच*
भरपूर पाणी वापरा,
मनसोक्त अंघोळ करा,
मायदांळ पाणी वापरा,
कुठेही कमतरता नको,
कपडे बादलीने नका धुवू,
सरळ नळाखाली धुवा,
शॉवर खाली भरपुर वेळ अंघोळ करा, टॉयलेटचा प्लश वापरा,
अंगणात पाणी मारा थंडावा येईल,
कुत्री मांजरं रोज धुवून काढा,
रोज स्वतः दोनदा अंघोळ करा,
गळके नळ गळू द्या,
नळ मोकळे सोडा,
आजचे पाणी उद्या शिळे होणार त्यामुळे रोज भांडी ओतून द्या, नव्याने पाणी भरा, कारण,
कारण,
उजनी उघडं पडलंय,
धरण आटलयं,
गुरढोरं तडफडतायेत,
माणसं पाण्यासाठी वणवण हिंडतायेत,
शेती फाटलीय,
जमीन तापलीय,
उजनी धरण तुम्हा पुणेकरांच्या वापरलेल्या पाण्यावर भरते, शेकडो गावे, लाखो लोक, आजुबाजुची जीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या पाण्याचा वापर वाढवा तुम्ही वापरले तरच धरणाला पाणी येणार.
कोणाचेही ऐकू नका,
भरपूर पाणी वापरा.
उजनी वाचवा

*ज्ञानसुत*

 संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट