वारी म्हणजे विदयापीठ

*वारी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ*
   
              मी २००४ मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वक म्हणून रुजू झालो. राज्य संपर्क अधिकारी प्रा निलुफ़र अहमद, मा . कुलगुरू डॉ अशोक कोळस्कर व मी अशी आमची बैठक चालू होती, एखादा मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रम आयोजित करायचा असे ठरले .
      सकाळीच दिंडीच्या कार्यक्रमाची माहिती ओझरती वाचली होती. लहानपणापासून दिंडी बद्दल ऐकले होते. सासरे वर्षानुवर्ष दिंडीला जातात , मी सहज मुद्दा मांडला आपण पुणे ते पंढरपूर २०० स्वयंसेवक घेउन जायचे का ?
तत्काळ होकार . ,
कोळस्कर सर तर अत्यंत उत्साही होते, २० दिवसांचा अवधी हाताशी होता,
दुसऱ्याच दिवशी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर पायलट टिम घेऊन जायचे ठरले , पहिले भोजन प्राचार्य रावळ एच् ही देसाई महI, दुपारी नाश्ता डॉ नितीन घोरपडे संध्या मगर महा असं करत पंढरपूर पर्यंतचे नियोजन ठरले , सावंत सरांनी वृक्षारोपण दिंडी अर्थात वृक्षदिंडी अशी संकल्पना मांडली,
नियोजन चोख झाले
उद्घाटनास ११ कुलगुरू, सर्व कार्यक्रम समन्वयक (बाईंचा धाकच होता )
महामहिम राज्यपाल
फजल *अहमद*
शिक्षणमंत्री निहाल *अहमद*
निलुफर *अहमद* व
खलील *अहमद* ( टि ओ आर् सी )
असे अहमदीय उद्घाटन होते, प्रोटोकॉल कडून तपासणी राज्यपाल ऑफीसची तपासणी सगळ साग्रसंगीत  पार पडलं पत्रिका छापल्या , राज्यपाल असलयाने सुवर्ण किनारी देखणी सुबक वैगेरे , पहिली पत्रिका कुलगुरु साहेबांना देण्यासाठी बाळासाहेब नाईकांकडून वेळ घेतली, मी व मॅडम निलूफर रात्री आठ वाजता मुख्य इमारतीत गेलो , पत्रिका  बघुन सर खुष झाले कौतुक _ चहापान झाले ,


 सरांनी अचानक विदयापीठाची डायरी मागितली.
मला म्हणाले सगळ्या पत्रिका आता इथे मागवा, प्रोटोकॉल चे फॅक्स , सगळी फाईल , काहीच कळेना काय झालं ?
आम्ही आळी पाळीने एकमेकांकडे बघत होतो,

सर म्हणाले घाबरू नका पण पत्रिका बदलावी लागेल

का ?

सरांनी आमच्या समोर डायरी पुढे केली, सगळ्यां च्या चूक लक्षात आली वास्तवीक फजल मोहम्मद हवे होते चुकून अहमद झाले होते, चूक सगळ्यांचीच होती,
लागलो कामाला , रात्रीत पत्रीका बदलल्या या कानाची खबर त्या कामाला नव्हती, उद्धाटन संत ज्ञानेश्वर सभागृहात देखणे झाले, आम्ही वृक्ष पालखी बनविली होती सगळे पालखीचे भोई झालो, विदयापीठांचे कुलगुरू गेट पर्यंत वारकरी टोपी उपरणे या वेषात चालले, मी, डॉ नितिन घोरपडे , प्राचार्या अर्चना ढेकणे  प्रा कैलास सोनवणे , प्रा गिते , प्रा शेडगे प्रा फडतरे प्रा बगडाणे प्रा घोडके शेवटपर्यंत २० दिवस चालायचे ठरवले
२० विदयापीठांचे विद्यार्थी व त्यांचे संघनायक चांगलीच मांदियाळी जमली होती , महाराष्ट्रातील प्रा बिडवे , प्राधनंजय माने तुकाराम शिंदे , तितरमारे, काळे संजय ठिगळे असे अनेक जन होते .
परीक्षा च होती
पहिलाच प्रयोग फसू नये म्हूनन खुप आटापिटा केला होता, योजक दूर्लभ : ची जाण होतीच,
शेवटच्या दिवशी पंढरपूरला भाषणे झाली , किती शिकायला मिळाल
काय बदल झाला ?
जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलला ?
आजही सगळ ताजं वाटतयं, कारण आम्ही सगळे समाजव्रती वारकरी झालो होतो समरसुन गेलो होतो,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा बिनीचा अभंग झाला होता .
 पुढे प्रा इनामदार  प्रा  रिकामे प्रा चोळके प्रा शेळके ,माळी, भामे, डॉ देसाई  असे अनेकांनी धुरा सांभाळली प्रदिप,दिनेश , मनोज अमोल हे सहकारी  सर्व वाहन चालक, अनेक विदयार्थी मित्र स्वामी, भांगे, प्रेरणा , किशोर, किरण ( 3 ) बाप रे सगळे आठवायला लागलेत, इतरांनी माफ करा
मी स्वतः सहा वर्ष चाललो ज्ञानमय
झालो श्रीमंत झालो, या दिंडीला धार्मिकता येऊ दिली नाही,
या सगळ्या अनुभवाचे गाठोडं आहेच,
 पुस्तक करावं म्हणतोय !

*वारीस शुभेच्छा*



 संजय चाकणे
१८ जून २०१७
9890172857

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट