महामहीम अब्दुल कलामसाहेबांचे

.
स्वप्न पहा ...
.........स्वप्न पहा
..........आणी स्वप्न पहा ..
हे खुपदा ऐकले होते
परंतु त्यांच्याच मुखातुन ऐकण्याची संधी मिळाली ती 2001 साली जेव्हा ते भारतीय जैन संघटना भुकंपग्रस्त पुनर्वसन प्रकल्प वाघोली येथे आले होते .....मी प्रभारी प्राचार्य असल्याने प्रोटोकॉल प्रचंड धास्ती घेतली होती .
 त्यांच्या कार्यालयाने कळविल्याप्रमाणे विद्यार्थ्यान्ना प्रश्न विचारु द्यायचे आणी त्यान्नी उत्तरे द्यायची असा कार्य्क्रम होता. वेळ दिली होती ती 45 मिनिटे .
 आम्ही सगळे कामाला लागलो होतो पहिलाच प्रसंग असल्याने खुप तयारी केली होती अगदी कोणत्या मुलाने कोणता प्रश्न आणी कुठल्या क्रमाने विचारायचा हेही ठरवले होते .खर सांगतो पण रंगीत तालीम ही घेतली होती.
.मुलानी प्रश्न मराठीतुन विचारायचा व तो मी इंग्रजीतुन त्यान्न भाषांतरीत करुन सांगायचा. अस साध सरळ होत. .
.
.
ते आले ते सरळ व्यासपिठावर. सगळ्यान्नी उभे राहुन 7 ते आठ मिनीटे कडाडुन टाळ्या वाजवल्या तो आरव मी आजही विसरु शकत नाही .त्यांचे मिश्कील हसन हात उंचाउन अभीवादन करण ...
.
मी एकटाच व्यासपीठ आणी प्रेक्षाकान्मधल्या डी झोन मध्ये मी एकटाच ....कॉडलेस माइक माइक आणी कोटाच्या खिशात प्रश्नांच भेंडोळ ...अगदी बिनचुक क्रमाने लावलेल. .
.
प्रास्तावीक मा. शांतीलाल मुथ्था यान्नी अत्यंत मुद्देसुद वेळेत सम्पवल. माझ लक्ष कलाम साहेबांकडेच. ते प्रास्तावीक अत्यंत बारकाईने ऐकत होते .सुत्रसंचालक चकोर गांधी यानी जाहीर केले की आता कलाम साहेब बोलणार .

मी त्यांचाकडेच बघत होतो.
खर तर भान हरपुन मीच काय सगळा जमलेला मेळा त्यांच्याक्ग कडे बघत होता.
.
कोणाला काही कळायच्या आत साहेब पायर्यांवरुन धाड धाड खाली उतरले आणी ताड ताड माझ्याकडे चालत आले आणी हात पुढे जरुन माईक माझ्याकडुन घेतला .मला नाव विचारले मी  कसेबसे संजय एव्हढेच सांगितले
त्यानी सुरुवात केली
तुम्ही प्रश्न विचारा.
आणी पहिल्या रांगेतल्या मुलाकडे हात केला .
.= मुले पाचवी ते दहावीतील होती )
.एव्हाना आम्हा सगळ्यान्ना कळुन चुकल होत की आपल्या प्रश्नोत्तराच्या तयारीचा काहीच उपयोग नाही.
.
आम्हाला सावरावच लागल .
पहिलाच प्रश्न
.= तुम्ही एव्हढे मोठे शास्रद्न्य झालात तुम्हाला कधी विरोध झाला का
.
त्यांचे उत्तर फारच छान होते.
= साध कागदाच विमान उडवायचे असले तरी त्याला हवेचा विरोध होतो. आपण तर माणस. विरोध हा होणारच. फक्त तो लक्षात ठेवायचा नाही. या उलट काम ते कुठलेही असो करताना जर विरोध झाला नाही तर हमखास समजावे की काहितरी चुकते आहे. त्यामुळे विरोध ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रीया आहे.
.
=  तुम्ही लग्न का नाही केले ?
....लग्न करायचे विसरुन गेलो.
कारण वेळच मिळाला नाही.
.
 = तुम्ही केस का कापत नाही तुम्हाला कोणी रागवत नाही का?
=-....ते म्हणाले मी असा चांगला दिसत नाही का? (  प्रचड हशा आणी टाळ्या.)  केस कापायला वेळ जातो.

.
..
=, मलाही शास्रद्न्य व्हायचे आहे त्यासाठी मी काय करायला हवे .
.
तुम्ही आता विद्यार्थी आहात. खुप म्गणजे 10-12 तास अभ्यास करायला हवा. स्वप्न बघताय याचा आनंद आहे. गणित पक्क करा. कुठलाच विषय वाइट नसतो. समोर येइल ते वाचल पाहिजे नव्या कल्पना सुचल्या की त्या अस्तीत्वात आणन्यासाठी झगडल पाहीजे.
.
.
माझ स्वप्न 2020 साली हा भारत देश महासता होनार हे आहे. त्यात तुम्ही काय योगदान देणार ते बघा . दुसरे काय म्हण्तात याकडे नका लक्ष देउ.
मोठे व्हा हे राष्ट्र मोठे करण्यासाठी प्रयत्न करा .
.
जयहिंद

*ज्ञानसुत*
संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट