*पूर्णांनाची भोगी*


                   महाराष्ट्र ओरिसा या दोन राज्यांमध्ये अदानप्रदान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र संघाबरोबर १९९६ साली भुवनेश्वरला गेलो होतो. या उपक्रमाअंतर्गत कटक, गोपाळपुरा, बेहरामपुर विद्यापीठ,  कोणार्क अशा ठिकाणी भेटीला गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्यातील एक एक जण त्यांच्यातील शिक्षकांच्या घरी राहणार  होता. मी ज्या महापात्रो  सरांकडे त्यांच्या गावाच्या घरी राहिलो होतो ते घर म्हणजे  सारवलेले नीटनेटके. संध्याकाळच्या जेवणात हातसडीच्या तांदळाचा भात व पूर्णांनाची भाजी असा बेत होता. पूर्णांन म्हणजे काय असे विचारल्यानंतर खूप सगळ्या भाज्या एकत्र करून गाडग्यामध्ये  गाळ होईपर्यंत शीजवल्या जातात.
खोलात जाऊन विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे आजही गरिबाघरच्या घरचं खाणं मानलं जातं. श्रीमंत लोक याला कदान्न म्हणतात. पूर्णान्न हा आपल्या भोगीच्या भाजीशी साधर्म्य साधणारा पदार्थ.
          परवा राजस्थानच्या एका मित्राने मला अशीच एक भाजी आणून दिली ती भाजी देताना हळदीची भाजी म्हणाला, ही भाजी करताना ओली हळद किसून उपलब्ध असलेल्या सर्व भाज्या एकत्र करून बरोबर शिजवल्या जातात साजूक तुपातील ही भाजी खाण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी आवर्जून जातात.

 अशाच प्रकारची आणखी भाजी खाण्याचा कोकणामध्ये योग येतो तो म्हणजे कोकणात उपलब्ध असलेल्या अनेक भाज्या एकत्र करून पोपटी अर्थात वालाच्या शेंगा एकत्र करून ही भाजी करतात ती अतिशय सुंदर लागते. आपल्याकडे जशा हुरड्याच्या पार्ट्या होतात त्याच धर्तीवर  पोपटीच्या पार्टी होतात.
उंधोऊ सुद्धा असेच काहीसे. व्हेज मिक्स भाजी सारखे
       भारतभर अशा प्रकारच्या पूर्णान्न वेगळ्या नावाने ओळखले जाते.


 आपल्याकडेसुद्धा हिवाळ्यात ही भाजी आवार्जुन खाल्ली जाते तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा रोडग्या बरोबर या भोगीच्या भाजीची चव म्हणजे स्वर्गसुख.
हिवाळ्यात या सर्व भाज्या व त्यातील जीवनसत्त्व ऊर्जा मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आपल्या सणांची शरीर धर्माशी केलेली अतिशय उत्तम सांगड घातली जाते. पर्यावरण पूरक हे सण केवळ कर्मकांड करायची म्हणून न उरता  आनंद उपभोगता आला पाहिजे.
 वाण देण्यासाठी अनेकदा महिला कचकड्याच्या वा प्लास्टिकच्या अत्यंत निरुपयोगी वस्तू विकतात. वास्तविक ज्ञान लुटायला हवे. पुस्तके उपलब्ध करून ज्ञान लुटले तर.
वास्तविक जी वस्तू द्यायची त्या वस्तू च्या किमतीपेक्षा अगदी मेथीच्या जुड्या वाण म्हणून दिल्या तर आपापल्या ऐपतीप्रमाणे तशा वस्तू देता येतील देणाऱ्याने व घेणाऱ्याने देण्यामागची भावना बघावी कशा पद्धतीने लुटले जावे याच्या चर्चा घडायला हरकत नाही.
     
        चला तर भोगीची भाजी सण म्हणून न खाता हिवाळा संपेपर्यंत खाल्ल्या गेल्या पाहिजेत. व संक्रांतीच्या निमित्ताने ज्ञानाचे वाण लुटले पाहिजे.

 संक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

संजय चाकणे
*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट