*रुमालगुच्छ*


१ जानेवारीला सोलापूर विद्यापीठाचे प्रथम प्रकुलगुरू डॉ. एस् आय. पाटील अर्थात शंकर पाटील यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त सोलापूर विद्यापीठात जाण्याचा योग आला. तसा मी सोलापूर विद्यापीठात अनेकदा गेलेलो होतो. तथापि आज एक वेगळेच बघायला मिळाले ते म्हणजे, अनेक विभागातील लोकांनी, प्राचार्य, प्राध्यापक, किंवा इतर संघटनांनी माननीय कुलगुरूंचा जो सत्कार केला तो म्हणजे नॅपकिन बुके अर्थात *रुमाल गुच्छ* देऊन, नानाविध रंगाची, नजाकतीने आणि अतिशय सुबक पद्धतीने त्याची केलेली बांधणी, दिसायला अगदी पुष्पगुच्छासारखे दिसणारे हे रुमाल.
   सोलापूर हे हातमाग, कपडे, चादरी यासाठी जगप्रसिद्ध.

               सहज मनात विचार आला मागील काही वर्षांपासून आपण खूप ठिकाणी पाहुणा म्हणून वावरतो. लोक पुष्पगुच्छ देतात, तासाभराचे काम असते नंतर तो फेकून द्यावा लागतो.  वास्तविक पुष्पगुच्छ किती मोठा द्यावा याचीसुद्धा अहमहमिका लागलेली असते, विचारपीठावर लोकांच्या वीस पंचवीस जणांच्या घोळक्याला एकत्र गुंफणारा हार घालण्याच्या प्रथा आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. पुढे या गोष्टीच काय होतं.
स्मृतिचिन्ह देण्याचं तर पेवचं फुटलय.
यापेक्षा वाईट आहे ते म्हणजे स्मृतिचिन्ह तयार कशाची केली जातात. बऱ्याचदा ही स्मृतिचिन्ह झाडांच्या बुंध्यापासून अर्थात पर्यावरणाचा ऱ्हास करून किंवा एखाद्या धातूचा वापर करून आणि अगदीच स्वस्त म्हणजे प्लास्टिक पासून किंवा कचकड्यापासून बनवलेले असतात. याचा पुढे काय उपयोग होतो.
स्मृतिचिन्ह पुढे काय?  हा यक्षप्रश्न आहे घरात ठेवायला जागा नसते.  खरच ही स्मृती देण्याची आवश्यकता आहे का? अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्मृतिचिन्ह देण्याचा सर्रास वापर होतो हे थांबवता येईल का? पर्याय शोधावे लागतील! मागील आठ वर्षापासून इंदापूर महाविद्यालयामध्ये अर्थात आय कॉलेजमध्ये रोपे देण्याचा प्रघात पाडला आहे. सुरुवातीला खूप छान चाललं होतं की रोप द्यायचं कमवा शिकाच्या विद्यार्थ्यांनी ते घ्यायचं आणि त्या व्यक्तीच्या नावाने स्मृती म्हणून जतन करायच. अर्थात ती झाडं कॅम्पसमध्ये लावायची. आता कॅम्पसमध्ये एवढी गर्दी झाली आहे की काळाच्या ओघात ती वृक्षारोपण करण्याची कला मागे पडली. काही जण नेतात काही जण तशीच ठेवतात  या रोपांची खूपच हेळसांड होते ही रोपे वृक्षारोपण म्हणून किती ठिकाणी लावली जात असतील  प्रश्नच आहे.

                   इतर देशात विशेषत: युरोपियन देशांमधून अशा प्रकारचे चोचले पुरवले जात नाही. तिथे स्मृतिचिन्ह अर्थात सोव्हीनियर म्हणून अगदी छोटी एखादी तबकडी किंवा एखादा मग अशा वस्तू दिल्या जातात. आपणच स्मृतिचिन्ह चा आग्रह का धरतो? स्मृतीचिन्हावर काय असते? तर देणारयाचा पण फोटो असतो जयाला द्यायचे त्याचं नाव असतं.
फेटे, शाली याबद्दल न बोललेले बरे. या का पडाचा ना धडूत म्हणून ना बाळूत म्हणून उपयोग होतो पाय पुसनी काय पण पोथार्या साठी सुद्धा उपयोग होत नाही. संक्रातीच्या वाण, आहेर याविषयी  न बोललेले बरे

 बदलता येईल का? हे सगळं. यासाठी हा लेखन प्रपंच.
उपयोगी येणाऱ्या वस्तू, जसे नॅपकिन बुके, उत्तम कुंडीतील 🌵, किंवा बोन्साय, स्नेहवस्र, उपयोगी वस्तू यादी खूप वाढवता येईल असे काही दिले तर. लगेच नाही अमलात येणार, पण हळूहळू परिवर्तन शक्य आहे.

संजय चाकणे

*ज्ञानसुत*

5 जाने २०१९

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट