*एका शिक्षकाचे जगणं*


आज एका कामानिमित्त तळेगाव दाभाडे ला जाण्याचा योग आला,  तसा तळेगाव दाभाडे ला खूपदा गेलो होतो. परंतु माझे प्राध्यापक मित्र बाळासाहेब काळे यांनी प्राध्यापक बोराडे प्रमोद यांच्याविषयी सांगितलं होतं. ज्या कामासाठी गेलो होतो, ते काम सुरू व्हायला वेळ होता म्हणून सहजच प्राध्यापक रोहित लोंढे यांना म्हणालो आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ आणि आम्ही त्यांनी उभारलेली शिवसृष्टी पाहायला गेलो. होय शिवसृष्टी खरा  शिवकाळ. एखादा शिक्षक त्याच्या आयुष्यात काय करू शकतो? याचा उत्तम नमुना म्हणजे प्राध्यापक बोराडे.
             स्वतच्या घराच्याच बंगल्याच्या एका मजल्यावर त्यांनी ही शिवसृष्टी साकारली आहे खऱ्या अर्थाने शिवसृष्टी. शिवकाळातील अनेक वस्तू जशाच्या तशा मिळवलेल्या इथे मांडल्या आहेत. अत्यंत परिश्रमातून कष्टातून मिळवलेल्या या वस्तू.

       या वस्तू म्हणजे काय ? तर इथे बघायला मिळते, ती म्हणजे लाकडाची वीरगळ,
इथे बघायला मिळतो लाकडाचा सतीचा हात. अत्यंत दुर्मिळ माझ्या पाहण्यात अशा पद्धतीच्या  लाकडी वीरगळी, लाकडी हात कधी आले नव्हते. सुरुवातीलाच गेल्यागेल्या केळकर म्युझियम ची आठवण येते केळकरांनी आयुष्य वेचले.  तसंच बोराडे यांनी अत्यंत कष्टाने या सगळ्या वस्तू मिळवलेल्या आहे. अनेक प्रकारची कुलुपे, विशेषत:  शिवकालीन कुलपे, अडगळीला अर्थात आगळीला लावायची कुलुपे आजही सुस्थितीत आहेत.
 नाना प्रकारचे अडकित्ते,  सू-या, चाकु,  तलवारी. तलवारींच्या केलेल्या विळ्या.  इंग्रजांनी कायदा केल्यानंतर अनेक घराघरांमध्ये तलवारींच्या विळ्या झाल्या.  काही भांडी, जुन्या काळातील विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी इंटरनॅशनल स्टेशन्स लागणारा रेडिओ स्वतःसाठी मागवला होता, आणि तो रेडिओ यांच्याकडे आहे.
           अनेक चित्रे आहेत, या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे मुघल कालीन अनेक विषय असलेली कॅनव्हासवर काढलेली ही चित्रे. औरंगजेब, अकबर यांच्या काळातील त्यांच्या दरबारातील ही चित्रे, आजही अत्यंत सुबक आहेत,
        याचबरोबरीने जुन्या काळातील उखळ-मुसळ,  जुन्या काळातील आभूषणे हे सगळं बघण्यासारखे आहे, हे प्रदर्शन मोठ्या स्वरुपात ठेवता  येणे आवश्यक आहे.
त्यासाठी निधीची पण करायची गरज असेल, केवळ पुस्तकी ज्ञान वर्गात शिकवण्यापेक्षा इतिहास घडला तिथे जाऊन इतिहास शिकला पाहिजे हे मत मी सातत्याने मांडत आलेलो आहे.  आणि डॉक्टर बोराडे यांनी ते प्रत्यक्षात अमलात आणलेले हे अनेकांना खऱ्या अर्थाने शिवकाळात गेल्यासारखं वाटत. भवानी तलवारीशी साधारण साधर्म्य  साधणारी एक तलवार अतिशय चांगल्यारितीने ठेवलेली आहे. नानाविध प्रकारचे दिवे, दिवे ठेवण्यासाठी ची आसने ही बघण्यासारखे आहेत.  सगळ्यात उत्कृष्ट बघण्यासारख आहे ती म्हणजे पालखी.






   बिचवे आहेत किंवा आणखीन काही प्राण्यांच्या शिंगांची हत्यारे. बीचवे   दाखवतात  ज्यावर इंग्रजांच्या आलेल्या त्यांचे काही त्याला ट्रेडमार्क.  पंतप्रतिनिधी चा कट्यार व शिक्का तयार करणारी एक चीज बघण्यासारखी आहे.
   शिवसृष्टी अवश्य बघा ,

ज्ञानसुत
संजय चाकणे
21Jan 2019

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट