माझी गडगिरी भाग 21


रायांचा गड रायगड

मला जर कोणी विचारले, तुमचा आवडता गड / किल्ला कुठला तर माझ्या ओठी पटकन नांव येते ते रायगडाचे. होय स्वत: छञपतींनी त्यांच्या देखरेखीखाली हिरोजी इंदुलकरांकरवी बांधून घेतलेला. पूर्वीचा रायरी म्हणजेच रायरीचा डोंगर.रायगड वैशिष्टये म्हणजेच समुद्र व जमिनीवर गनिमांवर नजर ठेऊ शकणारा आहे.
खूप पूर्वी राजगड ते रायगड असा दुरचा रात्र दिवसाचा क ट्रेक कला होता. पाचाड वरुन
पायरीमार्गे महाव्दारावरुन खूपदा गड सर केला होता. परंतु रोप वे वरुन पहिल्यांदाच जात होतो. रायगड हा अत्यंत महत्वाचा किल्ला . रोपवेत बसल्यावर नजर जशी गडावर, डोंगर रांगांवर खिळून रहाते तशी ती खाली पाहिल्यावर गरगरते सुध्दा स्विझ्रलंडमधील रोप वे मध्ये दावोस ला बसलो होतो.त्यामुळे अनुभव होताच.
इतर उंच किल्ल्यांच्या मानाने कमी चढीच्या उंचीचा अर्थात अंदाजे 2800 फूट आहे. पाचाडमार्गे त्याला पाय-यांच्या बाजूने गेलेतर 1400 ते 1500 पाय-या चढावे लागतात.
यावेळी आम्ही रोप वे मार्गे गेलो होतो. येताना पाय-यांवरुन येऊन पाचाडचा जिजाऊ साहेबांचा वाडा बघायचे व परत यायचे असे नियोजन होते. रोप वे ने गेल्यानंतर जाताना ती हिरवाई मखमखली दुलाई बघत हरखून गेलो होतो. मी पत्नी रंजना, दोन्ही कन्या अदिती व अवंती सोबत होत्या. राजसभा, नगरखाना, बाजारपेठ मध्ये राणीवसा व वेगवेगळे दरवाजे जसे पालखी दरवाजा, मेना दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या डाव्याबाजूस शिरकाई देवीचे मंदीर आहे. होळी माळावर शिरकाईचा जुना घटका आजही चौथा-याच्या रुपात बघायला मिळतो. जगदेश्व्राचे मंदीर म्हणजेच रायगडाचे खास ठिकाण आहे. तिथे गेल्यागेल्या भव्य नंदी व दरवाज्यातून आत जाताना पाय-याशी “सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा शिलालेख आहे. जो स्वामी निष्ठेतेची साक्ष् देतो. सभा मंडपामध्ये  भव्य  कासव आहे. जेजूरीच्या खंडोबाच्या मंदीरा समोरील कासवाची आठवण ठेवून जाते. रायगडाची निर्मिती करताना हिरोजींनी जागोजागी विहिरी, तळे, बागा, रस्ते, स्तंभ, राजवाडे, गजशाळा, राजगृह, राजदरबार, सदर, अश्व
पागा यांची निर्मिती केली. महाराजांची समाधी बघताना अंगावर शहारे येत राहतात. आपण नकळत ञिवार मुजरा करण्यासाठी वाकतो. इथे स्त्ंभपणे उभे रहावे, नतमस्तक व्हावे, शांतपणे उभे रहावे, अवघा शिवकाळ सारिपाटासारखा नजरे समोरुन जातो. खरतर छत्रपतीवर कितीही लिहले, कितीही पुस्तके, कादंबरी लिहली तरी कमीच पडतील. समाधी समोर  कितीही वेळ थांबले किंवा बसल तरी वेळ कधी गेला हे समजत नाही.
खिन्न् मनाने वाघ्याची समाधी, टकमक टोक, हिरकणी बुरुज सगळ बघत गंगासागराकडे आपण येतो. कुशावर्त तलाव व तिथले महादेवाचे मंदीर हे एक शांत असणारे ठिकाण. गंगासागर तलाव इतका खोल, रमणीय आहे की, एक साहित्यिक तळे इतके सुंदर आहे की, जीव दयावसा वाटतो. रायगडावर दोन स्तंभ आहे. पूर्वी हे स्तंभ खूप उंच असावेत याची जाणीव होते.
सिंहासनाजवळ राजदरवाज्यातून बोलले, कागद पेटविला तरी आवाज येतो. हिच त्या रचनाकाराची खासीयत होय. अशाप्रकारची हीच अनुभूती विजापूरच्या गोलघुमटात व देवगिरीच्या भारतमातेच्या मंदीरात घेतलेली होती. रायगड कितीही वेळा बघितला तरी काहीतरी बघायच राहील्यासारखे वाटते. कधी  स्तंभ, राणीवसा, बाजारपेठ बघितली तरी बघायचे राहिल्यासारखे वाटते. याचमुळे रायगड बघण्यापेक्षा त्याची अनुभूती घेणे तिथली म़त्तीका भाळी लावण व शिवकाळात मावळा होऊन मनाने वावरुन अनुभवनं हेच जास्त चांगले राहिले. रायगड  धो धो पावसात बघावा तसा, हिवाळयात मखमख्लली झालर पांघ्रल्या सारखे बघावा किंवा भर उन्हात
व्रक्ष व निष्पर्ण अवस्थेत वेळी बघावा. पौर्णिमेच्या राञी लखलखटात चांदण्यात बघावा, अमावस्येला भिन्न् अंधारात पण चमचमणा-या चांदण्यात बघावा. माणसांनी फुलून आलेला बघावा. एकटयाने बघावा तसेच पाच पंन्नास पोरांना घेऊन बघावा असाच आहे. कितीही बघितला तरी मन भरुन पावत नाही. पुन्हा कधीतरी लवकर येऊ अस आश्वासन स्वत:ला देऊन गडाला वंदन करुन पाचाड मार्गे उतरण्यासाठी आम्ही सज्ज् होतो.

डॉ. संजय चाकणे
ज्ञानसुत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट