*अक्षाताविना लग्न*


   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मुलाचे व गोकुळशेठ शहा यांच्या नातवाचे अर्थात निनाद - पूर्वा चे आज लग्न झाले. अदमासे २५ ते ३० हजार वऱ्हाडी पै पाहुणे, मान्यवर, शैक्षणिक, सामाजिक, व्यापार, नोकरी उद्योग क्षेत्रातील👥👥 मंडळी उपस्थित होती.

या लग्नात काही ठळक गोष्टी होत्या एक म्हणजे जेवणासाठी आदल्या दिवशी जवळपास ३०००० लोकांना एका हॉल मध्ये उत्तम नियोजनाने सुग्रास भोजन 🍋🍌🥮🍥🍛🍲🥪🥙🍜🍝दिले गेले .

मंडपात कुठेही भपकेबाजी नव्हती.
फटाक्यांची आतिषबाजी💥 नावापुरतीच.
लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाला वरबाप व वरमाय आवर्जून एक पिशवी 🛍देत होते ज्यात एक त्यांच्या स्वत:च्या नर्सरीत तयार केलेले देशी वानाच्या🌴 झाडाचे 🥦 रोप,🌵🌱 व पाण्याची बाटली 🍶होती.
        लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली. अक्षता🍚 अजून कशा आल्या नाही? अक्षता पोचल्या का ? असा काकांचा👳🏻 आवाज🗣 नाही! की ओरडा नाही!. घटिका🕣 तर जवळ आलेली. लोक एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हढ्यात सूत्रसंचालन🎤 करणाऱ्याने जाहीर केले की या वर व वधू पक्षांकडील कुटुंबीयांनी ठरवल्या मुळे *अक्षता दिल्याने खूप मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते*, म्हणून अक्षता नाहीत, या ऐवजी आपण शेवटची मंगलाष्टक झाल्यानंतर टाळ्यांचा 👏👏👏गजर करावा.

अक्षता वाटल्या असत्या तर किमानपक्षी तीन ते चार क्विंटल धान्याची नासाडी झाली असती. ती वाचली. महात्मा फुल्यांनी १००_१२५ वर्षांपूर्वी मांडलेला विचार अशा पद्धतीने साकार झाला.

     महाराष्ट्रात एकूण होणाऱ्या लग्नांची व त्यात होणाऱ्या अक्षता रुपी अन्नाची मोजदाद केली तर केवढे नुकसान टाळू शकू.

          तिसरे वैशिष्ट्य म्हणजे जेवणासाठी उत्तम वानुकुलीत भल्या थोरल्या मंडपाची व्यवस्था.उत्तम प्रतीचे भोजन. आयोजकांनी सगळ्यात जास्त लक्ष भोजनावर दिले होते, तिखट, तेलकट तुपट काहीच नव्हते, जे होते ते उत्तम प्रतीचे. अप्रतिम वाणाचे.

 लग्न लागताना ५०X३० फुटी मंचावर वर-वधू व फक्त काका. दुसरे कोणीही नाही, कुलवऱ्या, वर बाप, वरमाय ,  असे कोणीही नाही.

हळू हळू समाजात परिवर्तन होते, या बदलांना चुकीच्या अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देऊयात, नव्या बदलांना सामोरे जाऊ या.


*ज्ञानसुत*
*संजय चाकणे*
२९एप्रिल २०१९

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट