जगण्याचा धर्म

*चौकट राजा चौसष्ट कला*

जगण्याचा धर्म ज्याचा त्याचा

राजाने राजासारखा राहावे,
गरज भासली की एक घर चालावे,
उगीच इकडं तिकडं उच्छाद मांडू नये,

हत्तीने जड पावली सरळ जावे,
उंट चालतील की तिरक्या चाली,

प्यादी उत्साहात दोन घर मारतील उड्या ,
आरंभशूर होऊन,
पुढे फक्त एकेक घर चालायाचे,
त्यांना कुठे माहितीये पहिला बळी त्यांचाच जाणार आहे,

दुडक्या चालीने अडीच घर अश्व धुमाकूळ घालतील,
वजीर मारेल बाजी,
राजाला वाचावण्या फिरत राहील चौसष्ट घरे,
अडवा, तिडवा, सरळ, उभा, मागे, पुढे कितीही घरे,
शह देण्यासाठी,

मनुष्याने चौसष्ट कला शिकाव्यात म्हणे,
कधी राजा बनून ,
तर कधी प्याद्याच्या भूमिकेत,
पण,. ....
असं कसं होईल?
माणसं फार बेरकी झालीत,
राजालाच तोफेच्या तोंडी देतात,
उंट अडीच घर चालतोय,
घोडे हत्तीच्या पायांनी,
तर
अश्व तुफान वेगाने वजिराच्या भूमिकेत,
 सगळो कसा सावळो गोंधळ झालोय,
भूमिकेचा धर्म समजायला हवा.
प्रत्येकाने तो पाळायला हवा....

*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट