आज विज्ञान दिन .......
सर सी व्ही रामन यांच्या रामन effect च्या शोधाचा दिवस.
आकाश निळ का दिसत, ? हा प्रश्न या शोधाचे उगम स्थान,
विज्ञान वाद अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली पिढी तयार झाली पाहिजे.बालवाडी पासून
सायंटिफिक appoach विकसीत करण्यासाठी शिक्षक पालक याच्यातला सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल
      दहावी नंतर प्रत्येक पालकाला वाटंत आपला पाल्य अकरावी सायन्स ला जावा.
बारावी नंतर FYBSc ला प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढली आहे कदाचित कुठेच प्रवेश  मिळाला नाही कीं वा Engineering/ DEd ची क्रेझ कमी झाली असेही असेल.
    FYBSc  चा मागचा काही वर्षांचा निकाल पाहिला तर 50% च्या वर जात नाही , हो with ATKT,
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात आम्ही कमी तर पडत नाही ना?
     प्रश्नाच्या मुळाशी जाण?
मुळात प्रश्न विचारू देणं?
Theory पेक्षा practical वर भर देणं
कारण मीमांसा करण
कार्यकारण भाव असणं,  कमी पडतंय का,
European Union जो initiative घेतला तो आपल्याकडे यायला हवा,
रिसर्च बेस्ट पेडागोजी, अर्थात संशोधनाधिष्टीत शिक्षण पद्धती आपल्याला अमलातच नव्हे तर अवलंबावी लागेलच , लहानपणापासून म्हणजेच पहिली दुसरी पासून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा लागेल. आपण खूप गोष्टी  अवैज्ञानिक करतो अंधश्रद्धा निर्मूलन नुसतं करून चालणार नाही तर आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीत या छोट्या-छोट्या अंधश्रद्धा  बाजूला ठेवाव्या लागतील. काही वेळा 35 ,45, किंवा पंचावन्न मिनिटांचे तास न घेता सलग काही तास आपणाला शिकवावे लागेल. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची उत्सुकता जी आपण मारून टाकतो ! ती आपल्याला वाढवावी लागेल. लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तर देत देत पुढे जावे लागेल. प्रयोगातून विज्ञान किंवाप्रकल्पावर आधारित शिक्षण याकडे आपल्याला भर द्यावाच लागेल. आपण जर बदललो नाही तर पुन्हा परदेशी विद्यापीठे आली आणि त्यांनी जर शैक्षणिक क्षेत्र पादाक्रांत केलं तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असू. म्हणून आपल्याच मातृभाषेतून शिक्षण द्यावेच लागेल आपण psudo science अर्थात छदमी विज्ञानाकडे जातोय , खुपदा  देवादिकांच्या गोष्टी सांगत असतो त्या ऐवजी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावे लागतील आपल्याकडेच वेदांपासून श्रुती वेदांत  प्रत्येक गोष्टीत इतकं सुंदर विज्ञान आहे पण ते आपण नीट मांडू शकलो नाही ते आपल्याला मांडावे लागेल मूर्तीशास्त्र पासून तर वास्तुशास्त्र पासून मंदिरांचे विज्ञान नानक विज्ञान अशा अनेक बाबी आपल्याला विद्यार्थ्यांना पोहोचवता येतील छोट्या छोट्या गोष्टीतले विज्ञान आपल्याला सांगावे लागेल अगदी भाषा समाजशास्त्र वाणिज्य यातही विज्ञान आहे हे रुजवाव लागेल
   चला वैज्ञानिक होऊ या वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करू या
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा .....

ज्ञानसुत
....संजय चाकणे
२८ फेब्र. २०.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट