*तानाजी द अनसंग वॉरियर्*

        पहायलाच हवा, फार आधी छोटा चेतन पाहिला होता, तो आपल्याकडचा पहिला थ्रीडी चित्रपट. तानाजी हा फारच उत्तम चित्रित केलेला, सुरुवात होते तीच मुळात कुठूनसा एक बाण सरळ आपल्या डोळ्यात येतो. स्थिर-स्थावर न झालेले लोक घाबरून जातात नकळत चित्कारतात, सस्स चे फूत्कार चित्रपट गृहात बाहेर पडतात. उमरठच्या परिसरातून आपण राजगडावर तर कधी आग्राच्या लाल महालात नंतर शिरढोण व थोड्याच वेळात कोंढाण्यावर येतो तत्पूर्वी पुरंदरच्या तहात परत दिलेल्या किल्ल्यांचा उल्लेख होतो.
           एकदाचे कोंढाण्यावर आपण जातो. नागिन नावाची तोफ कोंढाण्यावर आणला जाणारा, खटाटोप, छत्रपती शिवाजी महाराजांची कोंढाणा  परत आऊसाहेबांच्या इच्छेखातर घेण्याची घालमेल.
          चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे, पण छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा.  त्याची काही कारणे म्हणजे तानाजींची एन्ट्री होते त्याच वेळी शिवगर्जना सुरू होतात. एखादा मावळा जोरात घोषणा देतो. काजोल ने केलेले मराठमोळ रुपड, नथ नऊवारी सह तिचं काम उत्तमच, अजय देवगन ची मेहनत तर अफलातून, शेलार मामा, जिजाऊ आऊसाहेब, छत्रपतींचे काम करणारा.  सूर्याजी पिसाळ चे काम करणारा  नागे, चुलत्या भाव खाऊन जातो, छोटा रायबा तर भलताच आवडतो. उदयभानचे काम करणारा सैफ  डोळ्यातून बोलत राहतो उत्तम अभिनयाच्या जोरावर तोही भाव खातो.
            दिग्दर्शकाने पटकथा, संवाद, थ्रीडी इफेक्ट व भव्यता यामुळे या चित्रपटाचा आपण नकळत भाग होऊन जातो. दोरी, बांबूचा वापर करून गनिमी कावा उत्तम रचलाय, आऊसाहेबांच्या तोंडी काही संवाद उत्तम दिलेत. किल्ला खाली करताना तहाबरहुकूम किल्ला आम्ही खाली करू,
     मोगल सरदार म्हणतो आपले जोडे तर घेऊन जा व मासाहेब करारी बाण्याने जोपर्यंत कोंढाणा परत स्वराज्यात येत नाही तोपर्यंत पायात जोडे घालणार नाही. अशी संवादफेक करतात व टाळ्यांचा गजर होतो. शेवटी तान्हा पडताना आऊसाहेबांना जोडे परत देण्याचा प्रसंग उठावदार वाटतो.
           यशवंत घोरपडे बंधू घोरपडी सारखे कातळाच्या प्रपातावर चढतात. दोर खंड खाली सोडले जातात. एका मावळ्याचा पाय घसरतो दुसऱ्या मावळ्यांसह ते दोराला लोंबकळतात वर ओढण्याच्या प्रयत्न अपुरा पडतोय म्हटल्यावर खालचा मावळा बीचव्याने दोर कापून स्वतःला संपवतो. *क्षणाचा प्रसंग पण स्वराज्य का टिकलं, वाढलं हे सांगून जातो.*

         छोट्या तानाजीच्या हातातलं कडे पुढे रायबाच्या हातात येतं छान चीत्रीत केलंय. सह्याद्रीच्या डोंगर रांग कॅमेराच्या डोळ्यातून बघताना आपले पारणे फिटत .
       कल्याण दरवाजा उघडण्याची जबाबदारी असणाऱ्या बुटक्या शिलेदाराची घालमेल छान जुळलीय.
      शंकरा रे शंकरा मधल्या नाचण्याचा स्टेप्स अफलातून प्रसंग. सुभेदार तानाजी मालुसरे कोंढाणा वर जाऊन कोंढाणेश्र्वरा पुढे गाणे गातात हे पटत नाही. पण याकडे केवळ फिल्मी स्टाईल म्हणून चक्क दुर्लक्ष करावे.
         सिंहगड ते राजगड तसे अंतर काही मैलाचे. पण नागिन तोफ वापरून राजगडावर मारा करायचे हज म होत नाही पण चलता है. उदयभान त्याचं तोफेसह खाली पाडला जातो हे ही पटत नाही. कारण उदयभान जिथे मारला गेला त्याची समाधी आजही ही सिंहगडावर अस्तित्वात आहे.
        सिंहगड मी कितीदा  पाहिला आहे याची गणती नाही, कैकदा मुक्कामही केला आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यासह पाहिलाय. सर्व वाटांनी सिंहगडची गडगिरी केली आहे. डोनजे, मणेर वाडी, कल्याण दरवाजा, कोंढणपूर व गाडरस्ता त्यामुळे कोंडाण्यावरचा चित्रपट पाहताना फारच मज्जा येते वास्तव व चित्रीकरण यात फरक तर पडतोच.
 
         इतिहासाची तोडफोड हा विषय डोक्यात आणायचा नाही. मस्त थ्रीडी स्टाइल ने मज्जा करायची. बाण डोळ्यासमोर आला की हात वर करुन लहान मुलांसारखे तो धरायला जायचे. चित्रपट जसा पाहायचा तसे उमरठला जाऊन माथा जसा टेकायचा तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावर च्या समाधीस्थळी जाऊन ती पवित्र माती भाळी लावायची देव टाक्याचे पाणी प्यायचे.

   बहिर्जी, येसाजी कंक, हंबीर राव सेनो पंत, मुरारबाजी, बाजीप्रभू, जीवा महाले, प्रतापराव गुजर, शिवा काशिद..............
      असे अगणित चित्रपट यावेत व स्वराज्याची मुहूर्त मेढ समजून घ्यायची  छत्रपती शिवाजी महाराज मनामनात रुजवावे म्हणून प्रयत्न करायचा.

संजय चाकणे
*ज्ञानसुत*
17 जानेवारी 2020

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट